Home » Konkan : कोकणात वाघोबांचा वावर वाढला ! सह्याद्रीत हे १२ वाघ कुठून आले ?

Konkan : कोकणात वाघोबांचा वावर वाढला ! सह्याद्रीत हे १२ वाघ कुठून आले ?

by Team Gajawaja
0 comment
Konkan
Share

काही वर्षांपूर्वी असा काळ होता की, सह्याद्री आणि कोकण पट्ट्यातून वाघ नाहिसेच झाले की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. वनविभाग, प्राणिप्रेमी सगळेच अगदी चिंतेत होते. चिंता करण्याचं कारण केवळ वाघ नाही, तर सह्याद्रीचं जंगल कसं राहिल हे होतं. कारण सह्याद्री इथल्या जैवविविधतेवर अवलंबून आहे आणि वाघ त्यातला प्रमुख घटक आहे. मात्र आता अचानक कोकण पट्टा आणि सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये १२ वाघोबा दिसून आले आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा सहयाद्रीचा नैसर्गिक वारसा फुलतो आहे. जवळपास १४ वर्षांनंतर वाघोबांचा वावर आपल्या सह्याद्रीत वाढला आहे. पण हे वाघ इथे आले तरी कुठून ? आता पुढे वन विभाग वाघांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न करतंय ? जाणून घ्या…. (Konkan)

कोकण भागात राहणाऱ्यांकडून आपण अनेकदा ऐकलं असेल की, आमच्या गावात वाघ येऊन गेलाय. पण गेले काही वर्ष वाघाचा विषय कुणी काढलाच नाही, कारण सह्याद्रीतले वाघ अचानक गायब झाले होते. मात्र आता वाईल्ड लाईफ कॅान्झर्वेशन ट्रस्ट आणि वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये १२ वाघांची नोंद झाली आहे. कोकण ते चांदोली अभयारण्याच्या पट्ट्यात हे १२ वाघ दिसून आले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बछडे सुद्धा आहे, जी पॉझिटिव्ह गोष्ट मानली जात आहे. सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट हा पट्टा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ते केरळपर्यंत जातो. वाघांचं राज्यांच्या तुलनेत कॅलक्युलेशन केलं तर सध्या महाराष्ट्रात ४४४ वाघ आहेत. गोव्यात ५ वाघ आहेत. कर्नाटकात ५६३ वाघ आहेत आणि केरळमध्ये २१३ वाघ आहेत. (Animal Conservation)

ही संख्या सध्या वाढली असली तरी काही वर्षांपूर्वी इथल्या वाघांचं अधिवास धोक्यात आल्याची चिन्ह होती. २०२२च्या नॅशनल टायगर कॅान्झर्वेशन अथॅारिटीच्या स्टेटस ऑफ टायगर आणि कोप्रेडेटर्स इन इंडियाच्या रिपोर्टनुसार पश्चिम घाटांमध्ये १०८७ वाघांची नोंद झाली होती. पण वाघांची संख्या का कमी झाली होती ? तर त्यांचं मुख्य कारण शिकार आणि सुरक्षित अधिवास… यामध्ये जंगलांच्या जमिनी विकासकामांसाठी बळकावणं हेसुद्धा एक कारण मानलं जातं होत. याशिवाय शेतीचा बचाव करण्यासाठी इलेक्ट्रिक फेंसिंग लावणं, हेसुद्धा यातीलच एक कारण होत. (Konkan)

मात्र आता वाघांचा अधिवास सुधारण्यावर भर दिला गेला. व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावांचं पुनर्वसन केलं गेलं. वाघांना कोणताही त्रास होणार नाही, याचीही काळजी घेतली गेली आणि त्या दृष्टिकोनातून सह्याद्रीत सुविधा उभारली गेली, तसेच वाघांचं भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले, ज्यामुळे आता वाघोबा कोकणातही पोहोचले आहेत. हे सर्व करत असताना दोडामार्ग आंबोली आणि चांदोली या परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅप्सच्या माध्यमातून इथे वाघांचा वावर वाढल्याचं दिसून आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लार्जर लॅण्डस्केपमध्ये १२ वाघ दिसले आणि यात बछड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पूर्ण इकोसिस्टिमचं संरक्षण उत्तमरीत्या होतय, असच एकंदरीत दिसून येत आहे.(Animal Conservation)

वाघ हा तसा एका जागेवर स्वस्त न बसणारा प्राणी आहे. त्याला इथे तिथे भटकाव लागतच… कधी स्वतःसाठी ‘टेरिटरी’ शोधण्यासाठी तर कधी प्रजननासाठी…हाच त्याचा प्रवास असतो. आपल्या कोकणातले वाघसुद्धा असाच प्रवास करत असतात. सावंतवाडी विभागातही वाघ आहेत आणि कोल्हापूर विभागातही वाघ आहेत. आणि इथे असलेले एकूण 8 वाघ या दोन्ही भागात वावरताना दिसतात. बछडे असणं महत्त्वाचं का ? कारण हे बछडे सह्याद्रीलाच आपला अधिवास समजून इथेच राहतील आणि इथेच त्यांच्या प्रजननाने वाघांची संख्या आणखी वाढण्यास मदत होईल. तशी जी १२ वाघांची नोंद झाली आहे, ती केवळ आपल्या महाराष्ट्रातील कोकणापुरती आहे. महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत पसरलेल्या सह्याद्री वन्यजीव भ्रमणमार्ग परिसरात ३२ वाघांचा वावर असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काही वाघ कर्नाटकच्या भागातून वर आल्याचंही बोललं जातं आहे. (Konkan)

===================

हे देखील वाचा :Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की शिजतय तरी काय ?

===================

तरीही वाघांच्या या वावराला विकास आडवा येऊ शकतो. या भागात होणारे विविध प्रकल्प त्यांच्या अधिवासाला पुन्हा धोका पोहोचवू शकतात. त्यामुळे ज्या प्रकल्पांची गरजच नाही आणि जिथे वाघांचा वावर कमी होतोय तिथे वनविभागाने हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. कारण कोकणातल्या 12 वाघांमध्ये बछडे आणि वाघिणीही आहेत. पण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मात्र दोनच वाघ फिरत आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाने तेही निघून जाण्याची भीती आहे. विकासकामे हा तर वन्यजीव आणि प्रामुख्याने वाघांसाठी अडथळा आहेच… पण दुसरा अजून एक अडथळा म्हणजे इथे वाघिणींची संख्या कमी आहे. त्यामुळे आता एकंदरीत सर्व अडथळे दूर करून वन विभाग आणि महाराष्ट्र सरकार आपल्या कोकणातल्या वाघांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Animal Conservation)

 

 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.