Home » ऑलिंपिक २०२४ वर दहशतवादी सावट ?

ऑलिंपिक २०२४ वर दहशतवादी सावट ?

by Team Gajawaja
0 comment
Olympics 2024
Share

इस्रायल आणि हमासमधील तणाव, फ्रान्सने घातलेली हिजाबवरील बंदी, आणि रशिया-बेलारूस संघांच्या ऑलिंपिक खेळण्यावर बंदी यामुळे पॅरिस ऑलिंपिकवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकची पुनरावृत्ती होऊनये त्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पण १९७२ ला म्युनिक ऑलिंपिक मध्ये नेमकं झालं काय होत ? ऑलिंपिक २०२४ वर सुद्धा दहशतवादी सावट आहे का? ऑलिंपिक १९७२ जेव्हा जर्मनीचे दोन भाग होते. पूर्व जर्मनी सोव्हिएत युनियनच्या ताब्यात होता, तर पश्चिम जर्मनीवर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सचे नियंत्रण होत. सप्टेंबर महिन्यात पश्चिम जर्मनीतील म्युनिक शहरात ऑलिंपिक खेळांना सुरुवात झाली. (Olympics 2024)

ऑलिंपिकच्या कुंभमेळयात जगभरातून खेळाडू आले होते, त्यात इस्रायल देशाचा संघही सहभागी झाला होता. त्यावेळी इस्रायल आणि अरब देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. दुसरीकडे, पॅलेस्टिनी अतिरेकी गट इस्रायल आणि इस्रायली नागरिकांनावर हल्ला करण्याचे तयारीत होते. आजच्या इतकं Advance लेवेलची सेक्युर्टी त्या काळात उपलब्ध नव्हती. ह्याचाच फायदा घेत ८ अतिरेकी खेळाडूंच्या हॉस्टेल मध्ये खेळाडूंसारखं रूप धारण करून घुसले. आणि त्यांनी इस्रायलच्या ११ खेळाडूना ताब्यात घेतलं.

पॅलेस्टिनच्या आतंकवादी संघटना ब्लॅक सप्टेंबरचे ८ अतिरेकी खेळाडूंच्या हॉस्टेल मध्ये खेळाडूंसारखं रूप धारण करून घुसल्यानंतर हॉस्टेल मधील सुरकक्षारक्षकांना हे लोक एखाद्या देशाचे खेळाडू असल्यासारखं भासलं. म्हणून त्यांना कोणीच अडवलं नाही. त्यांनी हॉस्टेलमध्ये घुसून इस्रायलच्या ११ खेळाडूना बंधक बनवलं. आणि इस्रायल सरकारसमोर त्यांनी एक अट ठेवली. ‘इस्रायलने अटक केलेल्या २३४ अतिरेक्यांची सुटका करण्यात यावी’अशी त्यावेळच्या इस्रायलच्या प्रधानमंत्री गोल्डा माएर यांनी ही अट पूर्ण करण्यास स्पष्टपणे नकार दिला. या नकार अतिरेक्यांना सहन झाला नाही. त्यांनी रागाच्याभरात दोन खेळाडूंची निर्दयीपणे हत्या केली आणि इस्रायल सरकारसमोर आणखी एक अट ठेवली ती म्हणजे इतर ९ खेळाडूंना आपल्या सोबत नेऊ देण्याची आणि “हॉस्टेल मधून बाहेर पडून एयरपोर्टवर जाईपर्यंत आम्हाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे नाही तर या ९ खेळाडूंना सुद्धा मारण्यात येईल” अशी धमकी ही त्यांनी दिली होती. अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी ही अट मान्य करण्यात आली. (Olympics 2024)

इस्रायल आणि पश्चिम जर्मनीने खेळाडूंना वाचवण्यासाठी एक प्लॅन आखला. अतिरेकी एयरपोर्टमध्ये घुसताच क्षणी त्यांना गोळ्या घालण्यात येतील आणि खेळाडूंना वाचवण्यात येईल असा हा प्लॅन होता. त्यासाठी एयरपोर्ट मध्ये ‘शार्प शूटर्स’ नेमण्यात आले. पण हा प्लॅन सपशेल अपयशी ठरला. अतिरेकी एयरपोर्टवर पोहचताच क्षणी शार्प शूटर्स ने अतिरेक्यांवर गोळीबार केला. या गोळीबाराला उत्तर म्हणून अतिरेक्यांनी ९ खेळाडूंची गोळ्याघालून हत्या केली. या चकमकीत ब्लॅक सप्टेंबरचे पाच दहशतवादी ठार झाले. तिघांना अटक करण्यात आली. पुढे हे प्रकरण एवढं वाढलं की, काही काळानंतर ब्लॅक सप्टेंबरच्या दहशतवाद्यांनी त्या तिघांच्या सुटकेसाठी एका जर्मन एयरलाइनच विमान हायजॅक केले. बदल्यात तिघांची सुटका करण्यात आली.इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे अध्यक्ष एव्हरी ब्रउंडेज यांनी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. पण “शो मस्ट गो ऑन” म्हणतं १९७२ ची ऑलिंपिक स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. (Olympics 2024)

म्युनिक ऑलिंपिकला आणि त्या भ्याड हल्ल्याला आता ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यानच्या काळात १२ वेळा ऑलिंपिक स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. पण तरीही १९७२ सारख्या घटनेचं सावट फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होणाऱ्या यंदाच्या ऑलिंपिक वर आहे. त्याचं कारण म्हणजे फ्रान्सने ऑलिंपिकमध्ये हिजाब वर घालण्यात आलेली बंदी, फ्रान्सचं देशाअंतर्गत सुरू असलेलं राजकारण आणि मुख्य म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध. पॅरिस ऑलिंपिकमध्ये इस्रायली संघाच्या सहभागाला पॅलेस्टिनी समर्थकांचा विरोध आहे. सामन्यापूर्वी एक धमकीचा व्हिडिओही Viral करण्यात आला होता. ज्यामध्ये हमास ऑलिंपिक आयोजकांना बदला घेण्याची धमकी देत असल्याचा आरोप होता. पण हमासने हा व्हिडिओ फेटाळून लावला आहे. आमची बदनामी केली जात आहे. या व्हिडिओशी आमचा काहीही संबंध नाही असं म्हणतं हमासने या धमकीतून माघार घेतली.असं असून देखील धोका कायम आहे. इस्रायलने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी गुप्तचर संस्था शिन बेटचे एजंट तैनात केले आहेत. या शिवाय फ्रान्स सरकारने सुद्धा ७५ हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. (Olympics 2024)

==========

हे देखील वाचा :  जाणून घ्या ऑलिंपिक खेळांची इत्यंभूत माहिती

==========

फ्रान्सने स्वत:च्या ऑलिंपिक संघातील महिला खेळाडूंच्या हिजाबवर बंदी घातली आहे. म्हणजेच फ्रान्सची कोणतीही महिला खेळाडू हिजाब परिधान करून ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. फ्रान्सच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानेही यावर टीका केली होती. खरं तर फ्रान्सने या ऑलिंपिकला ‘स्त्री-पुरुष समानता’ ही थीम दिलीये. मग महिला खेळाडूंच्या हिजाब घालणं किंवा न घालण्याच्या Choice ला का डावललं जात आहे? असे प्रश्न सर्व बाजूने विचारेले जात आहेत.

त्याशिवाय रशिया आणि बेलारूस या देशांच्या संघांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच कारण रशिया युक्रेन युद्ध. या युद्धासाठी बेलारूसने रशियाला मदत करत आहे. त्यामुळे त्यांच्या संघावर बंदीही घालण्यात आली आहे. पण या दोन्ही देशांतील एकूण ३२ खेळाडू तटस्थ म्हणून वैयक्तिक प्रकारात सहभाग घेऊ शकतात. पण त्यांना त्यांच्या देशाच्या क्रीडा संघटनांकडून मान्यता मिळणे आवश्यक असेल. दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमक्या आणि गेल्या काही वर्षांत पॅरिसमध्ये घडलेल्या दहशतवादी घटना या सगळ्यामुळे कुठले ही विघ्न न येता हे ऑलिंपिक यशस्वी रित्या पार पडेल का? अशी चींता संपूर्ण जगाला लागलीये. (Olympics 2024)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.