Technology : टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क आता टेलिव्हिजनच्या जगात धमाका करण्यास तयारी करत आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, मस्क सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X च्या टीव्ही अॅपला लवकरच लाँच करू शकतात. कंपनीच्या या पावलामुळे युट्युबसारख्या प्लॅटफॉर्मला टक्कर मिळू शकते. एक्स टीव्ही लाँच झाल्यानंतर टीव्हीवरही एक्स प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे. याची माहिती @XNews या अकाउंटवरून देण्यात आली आहे. एक्स न्यूज अकाउंटवरून X TV चा 10 सेकेंदाचा एक टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सांगितले जातेय की, लवकरच स्मार्ट टीव्हीसाठी X TV अॅप लाँच होणार आहे.
एक्सच्या सीईओनीही केले पोस्ट
X प्लॅटफॉर्मच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी X Tv बद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, लहान पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत एक्स सर्वकाही बदलणार आहे. अशातच लवकरच X Tv अॅपसह तुम्हाला टीव्हीवर रियल टाइम आणि एंटरटेनिंग कंटेट पाहायला मिळणार आहेत. याशिवाय लिंडाने एक्स टीव्हीच्या खास गोष्टींबद्दलही सांगितले. (Technology)
Coming soon to a television near you: X TV 👀 pic.twitter.com/C7VWNa7jG5
— News (@XNews) April 23, 2024
दरम्यान, एक्सने एक्स टीव्हीच्या लाँचिंगबद्दल अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. पण आपल्या पोस्टमध्ये लवकरच येणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे अॅपच्या माध्यमातून युजर्सला आपल्या मोबाइलवर कंटेट टीव्हीवर पाहण्याची सुविधा मिळणार आहे.