Home » ChatGPT आणि Google Bard चा वापर करताय? होऊ शकते फसवणूक

ChatGPT आणि Google Bard चा वापर करताय? होऊ शकते फसवणूक

बॉलिवूडमधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने अन्य काही सेलिब्रेटींचे देखील डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. खरंतर या गोष्टीमुळे मानसिक आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते.

by Team Gajawaja
0 comment
ChatGPT
Share

Technology Tips : चॅटजीपीटी आणि गुगल बार्ड (Google Bard) लाँच झाल्यानंतर बहुतांशजण त्याच्यावर अवलंबून आहेत. अशातच गुगलच्या माध्यमातून सर्च करणारे युजर्स आता एआय टूलच्या मदतीने आपली कामे पूर्ण करत आहेत. याचा थेट परिणाम युजर्सच्या खासगी आणि प्रोफेशनल लाइफवर होत आहे. आगामी काळात चॅटजीपीटी आणि गुगल बार्डचा वापर सर्वाधिक वापरला जाणार आहे. अशातच तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

डीपफेक ठरलीय डोकेदुखी
बॉलिवूडमधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने अन्य काही सेलिब्रेटींचे देखील डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. डीपफेक व्हिडीओमध्ये सायबर गुन्हेगार सेलिब्रेटींचा चेहरा वापरून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर जोडतात. यामुळे पीडित व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पण तुम्हाला माहितेय का, डीपफेक व्हिडीओ किंवा फोटोमुळे तुम्हाला ब्लॅकमेल देखील केले जाऊ शकते. (Technology Tips)

चुकीची माहिती पसरली जाण्याची भीती
एआय चॅटबॉट तुम्हाला फार कमी वेळात मोठी माहिती देते. व्यक्तीच्या काम करण्याच्या तुलनेच्या क्षमतेत एआयची काम करण्याचा वेग सर्वाधिक आहे. एआयचे हे फीचर जगभरात सुरू असलेल्या फेक न्यूज, चुकीची माहिती अशा गोष्टी सहज पसरवू शकतो. हॅकर्स याचा फायदा घेत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात. याचा सर्वाधिक परिणाम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे
आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे आणखी एक समस्या उद्भवू शकते ती म्हणजे बेरोजगारी. काही कंपन्यांमध्ये स्मार्ट वर्कसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. याच कारणास्तव खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. सध्या डेटा एण्ट्री, बुक किपर, ट्रांन्सलेटर, कस्टमर केअर, कॉपी राइटिंग आणि सोशल मीडिया मॅनेजर्ससारख्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका आहे.

सुरक्षिततेचा धोका
वर्ष 2020 च्या रिपोर्टमध्ये सायबर सिक्युरिटीसाठी सर्वाधिक आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर केल्याचे समोर आले आहे. यामध्ये असेही म्हटले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस व्यक्तीच्या तुलनेत सर्वाधिक मोठ्या धोक्याबद्दल शोध लावू शकतो. यानुसार एआय व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतो. एआयवर निर्भर राहिल्या काही गोष्टींसंदर्भातील समस्या वाढू शकतात. दरम्यान, सुरक्षिततेच्या भीतीने इटलीने चॅटजीपीटी बॅन केले आहे. यानंतर आता जर्मनी देखील एआय चॅटबॉट बॅन करण्याच्या तयारीत आहे.


आणखी वाचा :
नोकरीमुळे मुलांकडे अधिक लक्ष देता येत नाही? दैनंदिन आयुष्यात वापरा या टिप्स
वारंवार Laptop गरम होतो का? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान
प्रॉपर्टीत भाडेकरुला ठेवण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.