Success Story: देशात स्टार्ट्अपचे कल्चर वेगाने बदलत चालले आहे. काही तरुण व्यावसायिक या क्षेत्रात आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतायत. या तरुण व्यावसायिकांना देशातच नव्हे तर परदेशातून ही फंडिंग होत आहे. याच लिस्टमध्ये विदित आत्रेय आणि संजीव बरनवाल यांच्यासारख्या तरुण व्यावसायिकांचा समावे आहे. आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी राहिलेल्या या दोघांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशो ची सुरुवात केली. ग्रॅज्युएशन केल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी हाइपरलोकल, ऑन डिमांड फॅशन मार्केट प्लेस सुरु केले होते.
मात्र त्यांचा पहिला स्टार्टअप अपयशी ठरला खरा पण त्यामधून त्यांना एक मोठी शिकवण मिळाली. त्यांना असे कळले की, देशात काही लहान व्यवसायिक आहेत जे आपले प्रोडक्ट्स विक्री करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. मात्र अधिक यश त्यांना मिळत नाहीयं. हिच गोष्ट लक्षात घेता विदित आणि संजीव यांनी मीशो ची सुरुवात करण्याचे ठरविले.
खरंतर देशाातील काही लोक आणि लहान व्यावसायिक आपले प्रोडक्ट्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विक्री करतात. परंतु मर्यादित लोकांपर्यंत त्यांना पोहचता येणे शक्य होत नाही. अशातच सोशल मीडियात व्यवसायासंबंधित ही समस्या आणि मर्यादा ओळखत विदित आणि संजीव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक उत्तम प्लॅटफॉर्म देण्यासाठी मीशो ची स्थापना केली.
मीशो एका वेगळ्या मॉडेलवर काम करते. जेथे विक्रेत्याला अॅपवर मार्केट प्लेस बनवण्याची संधी मिलते. ते आपले फेसबुक पेज मीशो सोबत लिंक करतात, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांसोबत चॅट करतात. मीशो डिलीवरीची सुद्धा काळजी घेतो आणि विक्रेत्यांकडून कमीशन वसूल करुन कमाई करते. कोणताही व्यक्ती पला अकाउंट मीशो सोबत रजिस्टर करु शकतो. त्यानंतर तो मीशो अॅपवर असलेल्या प्रोडक्ट्ससाठी लिंक जनरेट करु शकतो.(Success Story)
हेही वाचा- Success Story: वयाच्या 17 वर्षी सोडले होते घर, आज आहेत यशस्वी व्यावसायिक
कंपनीचे फाउंडर आणि सीईओ विदित आत्रेय यांनी असे म्हटले की, Messho चा अर्थ “माझे दुकान” किंवा “आपले दुकान” असा होतो. आम्ही सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून १ कोटी ३० लाखांहून अधिक लोकांना ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्यास मदत केली आहे. त्यात बहुतांशकरुन महिला आहेत. मीशोचे वॅल्यूएशन जवळजवळ ५ बिलियन डॉलर म्हणजेच ४१ हजार कोटी रुपये आहे.