जानेवारी २००६, लंडनमधील वुड ग्रीन परिसरातली एक इमारत. तिथे काही लोकं भाड़ जॉयस विंसेंट नावाच्या भाडेकरूकडे घरमालकाच्या आदेशानं तिच्या फ्लॅटचा दरवाजा तोडायला येतात. कारण? तिने सहा महिन्यांचं तब्बल अडीच लाख रुपये भाडं थकवलेलं होतं आणि ती कधीच घराचा दरवाजा उघडत नव्हती. त्यामुळे शेवटी मालकाने काही लोकांना दरवाजा तोडून तिच्याकडून घरभाड घेण्यासाठी पाठवलं होतं. आलेले लोकं दरवाजा वाजवतात आतून टीव्हीचा आवाज येतं असतो. पण दरवाजा कोणीच उघडत नाही. शेवटी बऱ्याच प्रयत्नांंनंतर ते दरवाजा तोडतात. घरात शिरतात तर काय? एक सांगाडा टीव्ही पाहत बसलेला त्यांना दिसतो. हा जॉयस विंसेंट जी या रूममध्ये भाडेकरू होती. त्या सांगड्याच्या बाजूला क्रिसमस गिफ्ट्स, शॉपिंग बॅग, होते. टीव्ही अजूनही चालूय! जॉयस विंसेंट जी गेली ३ वर्ष मेलीये, आणि कोणालाच याची खबर नाही! आणि तिचा सांगाडा टीव्ही पाहत बसला आहे. काय आहे ही संपूर्ण घटना जाणून घेऊ. (Story of Joyce Vincent)
जॉयस विंसेंट एक हुशार, आत्मविश्वास असलेली मुलगी होती. तिचे वडील आफ्रिकन वंशाचे, लंडनमध्ये कारपेंटर होते. जॉयसचा जन्म १९६५ मध्ये लंडनमध्येच झाला. ती अर्न्स्ट अँड यंग सारख्या मोठ्या कंपनीत ट्रेझरी डिपार्टमेंटमध्ये काम करायची. पण २००१ मध्ये तिनं नोकरी सोडली, राजीनाम्यात तिने कोणतंही कारण दिलं नव्हतं. त्यानंतर ती कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित एका शेल्टर होममध्ये राहायला लागली आणि एका बजेट हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करू लागली. या काळात तिने हळूहळू कुटुंब आणि मित्रमंडळींशी संपर्क तोडला होता. (Top Stories)
२००३ मध्ये तिनं वुड ग्रीन तो फ्लॅट रेंटवर घेतला आणि ती तिथे राहू लागली, ती एकटीच होती तिच्या आयुष्यात दुसरं कोणीही नव्हतं आणि असेल जरी, तरी ते तिच्या संपर्कात नव्हते किंवा ती त्यांच्यापासून लांब राहणं पसंत करत होती. त्यामागचं कारण जॉयस कौटुंबिक हिंसाचारामुळे खूप त्रस्त होती. तिला हे उघडपणे सांगायला लाज वाटायची आणि कदाचित म्हणूनच तिने एकटं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नोव्हेंबर 2003 मध्ये तिला रक्ताची उलटी झाली, त्यानंतर ती काही दिवस हॉस्पिटलमध्येही ती अॅडमिट होती.(Story of Joyce Vincent)
आणि डिसेंबर २००३ मध्ये जॉयस विंसेंटचा तिच्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला, कसा झाला? कोणी केला? याचं उत्तर कोणालाच माहित नाही. तिचा मृतदेह टीव्हीसमोर सोफ्यावर होता. टीव्ही सुरूच होती. मग दिवस, आठवडे, महीने बदलले. पण कोणालाच माहिती नव्हतं की जॉयसचा मृत्यू झाला आहे. ३ वर्ष उलटली तरी कोणालाच जॉयसच्या मृत्यूचा पत्ता नव्हता. तीन वर्षांपासून टीव्ही मोठ्या आवाजात चालू होता. ड्रग अॅडिक्ट्स अशा प्रकारे राहतात म्हणून शेजाऱ्यांनी तिच्या खोलीकडे कधी लक्षच दिलं नाही. (Top Stories)
घरमालकाच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. तिचं भाडं ऑटोमॅटिक बँक ट्रान्सफरमधून भरलं जात राहिलं. वीज बिलाचंही असंच काहीसं भरलं जात होतं. या दरम्यान जॉयसच्या घरच्यांनी तिला अनेक पत्रंही लिहिली, पण ती वाचणारं कोणीच या जगात नव्हतं. शेजाऱ्यांना कधी कधी कुजणाऱ्या शरीराचा वास यायचा, पण त्यांना वाटायचं की हा वास जवळच रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या ढिगातून येतोय. मग शेवटी जेव्हा जॉयसच्या बँकेतले पैसे संपले तेव्हा घरमालकाने भाड घेण्यासाठी अनेकांना पाठवलं पण घराचा दरवाजा कधीच उघडला गेला नाही. आणि शेवटी त्याने तो दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. आणि जेव्हा त्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. तेव्हा सत्य जगासमोर आलं.(Story of Joyce Vincent)
=================
हे देखील वाचा : Michael Rockefeller : आदिवासींनी खरंच त्याला खाऊन टाकलं होतं ?
=================
जॉयसचा मृत्यू कसा झाला, याबद्दल खूप तर्कवितर्क आहेत. काहींचं म्हणणं, तिला अस्थमाचा अटॅक आला. कारण तिला अस्थमा होता, आणि ती त्या आजाराशी झगडत होती. पण काही जण म्हणतात, ती घरगुती हिंसाचाराची बळी ठरली. तिच्या आयुष्यात काही गडबड होतीच. असं सांगितलं जातं की जॉयस जेव्हा मेली, तेव्हा ती एका व्यक्तीला डेट करत होती. पोलिसांनी त्या प्रियकराचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. जॉयसच्या बहिणीने एक खासगी गुप्तहेरही नेमला, पण तिथूनही काही हाती लागलं नाही. जेव्हा अधिकाऱ्यांनी जॉयसच्या घराचा दरवाजा तोडला, तेव्हा दरवाजा आतून डबल लॉक केलेला होता. त्यामुळे कोणत्याही बाहेरील व्यक्तीने आत येण्याचा-जाण्याचा कोणताही पुरावा नव्हता. (Top Stories)
जॉयसच्या मृत्यूनं सगळ्यांना हादरवून सोडलं. पण काही प्रश्न होते ते असे, तिचा सांगाडा झालेला मृतदेह ज्या सोफ्यावर होता, तिथे शॉपिंग बॅग्स christmas गिफ्टस सुद्धा होते. त्या गिफ्ट्सचा अर्थ काय? ती कोणासाठी आणली होती? की कोणी तिला दिली होती. तिचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा इतका खराब झाला होता की तो कोणाचा आहे, हे फक्त डेंटल रेकॉर्ड्सवरून कळलं. (Story of Joyce Vincent)
आजही जॉयस व्हिन्सेंटचं रहस्य तसंच आहे. एका शहरात, हजारो लोकांमध्ये, एक मुलगी ३ वर्ष मृत पडून आहे, आणि कोणालाच खबर नाही. यापेक्षा भयंकर गोष्ट काय असू शकते? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!