Home » आपलं लाडकं फेसबुक आज सज्ञान झालं

आपलं लाडकं फेसबुक आज सज्ञान झालं

by Team Gajawaja
0 comment
Story of Facebook Marathi info
Share

फेसबुकने साऱ्या जगभर आपलं जाळं पसरवलं आहे. मार्क झुकरबर्गने २००४ साली फेसबुक (Facebook) विकसित केलं. अल्पावधीतच ते लोकप्रिय झालं. आपल्या खास फिचर्समुळे फेसबुकने मोठी भरारी घेतली. सध्या, फेसबुकने आपलं नावं बदललं असून ‘मेटा’ ठेवलं आहे. 

जगभरात १२० कोटींहून अधिक वापरकर्ते या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात. गेल्या काही वर्षात या सोशल नेटवर्किंग साइटने जी लोकप्रियता मिळवली, तशी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याही नेटवर्किंग साइटला मिळालेली नाही. सध्या फेसबुकला ट्विटर आणि तशाच प्रकारच्या इतर नेटवर्किंग साइट्सकडून स्पर्धा निर्माण झाली आहे. 

फेसबुकच्या आधीही तशा प्रकारच्या काही वेबसाइट्स निर्माण झाल्या असल्या तरीही सोशल नेटवर्किंग ही संकल्पना लोकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रुजवणारी फेसबुक ही पहिली वेबसाइट आहे आणि या वेबसाइटची वाटचाल थक्क करणारी आहे.

आज फेसबुक (Facebook) माहिती नाही अशी व्यक्ती शोधणे कठीण आहे. हे सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्क आहे ज्याने जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना एकत्र केले आहे. वापरकर्त्यांची संख्या दररोज वाढत आहे. फेसबुकचा संस्थापक आज एक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती आहे.

फेसबुक (Facebook) ही एक स्टुडंट डिरेक्टरी होती ज्यात फोटो आणि मूलभूत माहिती असे. जानेवारी २००४ मध्ये झुकरबर्ग यांनी ‘द फेसबुक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका नवीन वेबसाइटसाठी कोड लिहिण्यास सुरवात केली. त्यांनी हार्वर्डचा विद्यार्थी एडुआर्डो सावरीन यांच्याशी भेट घेतली आणि त्यांनी या साइटवर १००० डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली. 

४ फेब्रुवारी २००४ रोजी झुकरबर्गने ‘द फेसबुक’ सुरू केले. २००५ मध्ये सीन पार्कर यांच्या सांगण्यावरून ‘द फेसबुक’ या नावामधील ‘द’ काढून टाकले व नवीन डोमेन ‘फेसबुक’ विकत घेतले. 

साइट लॉन्च झाल्यानंतर अवघ्या ६ दिवसानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे कॅमेरून विंकलेव्हस, टायलर विंकलेव्हस आणि दिव्या नरेंद्र यांनी झुकरबर्गवर हार्वर्डकॉन्सीकेशन डॉट कॉम नावाचे सोशल नेटवर्क तयार करण्यात मदत करेल, असा विश्वास देऊन जाणूनबुजून दिशाभूल केल्याचा आरोप केला. तिघांनी क्रिमसनकडे तक्रार केली आणि वर्तमानपत्राने तपास सुरू केला. झुकरबर्गला अनौपचारिक सल्ला देणारे उद्योजक सीन पार्कर कंपनीचे अध्यक्ष झाले. 

मार्कने फेसबुकच्या ‘लाइक’ या बटणाचे नाव प्रथम ‘ऑसम’ (Awesome)’ ठेवण्याचे ठरवले होते, पण त्यांच्या सहकाऱ्यांना ‘लाईक’ हे नाव जास्त रुचले आणि नंतर मार्कने ‘लाईक’ नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. 

Mark Zuckerberg

फेसबुकवर असलेल्या प्राइवेसी सेटिंग्सद्वारे कोणत्याही फेसबुक वापरकर्त्याला तुम्ही ब्लॉक करू शकता. पण फेसबुकचे फाऊंडर मार्क जुकरबर्ग यांना तुम्ही ब्लॉक करू शकत नाही आणि ते करण्याचा प्रयत्न जरी तुम्ही केला तर तुम्हला फेसबुककडून एक एरर मेसेज दिसेल.

फेसबुकवर जवळ जवळ ३० मिलियन मृत व्यक्तींच्या प्रोफाईल्स आहेत. जर एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तरीही त्याची प्रोफाइल अशीच चालू राहते का? तर, याचे उत्तर आहे, नाही! जर तुमच्या ओळखीमध्ये अशा कोणत्या व्यक्तीची प्रोफाइल असेल, तर तुम्ही ती प्रोफाइल फेसबुकला रिपोर्ट करू शकता. त्या प्रोफाइलला स्मृती स्मारकामध्ये (memorialized account) बदलले जाऊ शकते.

=====

हे देखील वाचा: WhatsApp Vs Telegram: स्पर्धा फिचर्सची! तंत्रज्ञानाच्या विश्वात या दोन ॲप्समध्ये प्रचंड स्पर्धा

=====

फेसबुकने आपलं जाळं जगभर पसरवलं तसंच व्हाट्सएप, इंस्टाग्राम यासारखे प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स विकत घेतले. सॉफ्टवेअर आणि कोडींग करून, दिवस रात्र वेबसाईट वर काम करणाऱ्या मार्क झुकरबर्ग यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याचे व्यवसाय धोरण, नेतृत्वकौशल्य, ध्येयवेडेपणा आणि जोखीम घेण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.  

मित्र व मैत्रिणींनो, या माहितीतून तुम्हाला फेसबुक (Facebook) कसे निर्माण झाले हे समजले असेलच. हे सर्व आज लिहिण्याचे कारण म्हणजे, आज फेसबुकचा १८ वा वाढदिवस आहे. आपलं लाडकं फेसबुक आज सज्ञान झालं म्हणायला हरकत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.