Home » जालन्यात दोन गटात दगडफेक, पोसिसांकडून हवेत गोळीबार

जालन्यात दोन गटात दगडफेक, पोसिसांकडून हवेत गोळीबार

by Team Gajawaja
0 comment
Jalna
Share

जालना जिल्ह्यातील एका गावात दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. दगडफेकीच्या या घटनेत 5 पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. मात्र पाहता पाहता प्रकरण पेटले आणि मोठा राडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी 20-25 आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात प्रवेश करणार होती. आणि ज्या ठिकाणी ती मुर्ती बसवणार होते त्याला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात येणार होते, मात्र या विषयावर चर्चा न होता दोन समाजात वाद निर्माण झाला. वाद इतका वाढला की दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.दरम्यान पोलिसांनी सुमारे 20 ते 25 जणांना अटकही केली आहे.

====

हे देखील वाचा: संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

====

चांदई येथे दोन गटात हाणामारी झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच आरोपींवर कडक कारवाईची तयारी सुरू आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.