Home » जगातील सर्वाधिक मोठी शंकराची मूर्ती या ठिकाणी आहे

जगातील सर्वाधिक मोठी शंकराची मूर्ती या ठिकाणी आहे

तुम्हाला माहितेय का, जगातील सर्वाधिक मोठी शंकराची मूर्ती कुठे आहे? खरंतर, या मूर्तीच्या समोर कुतुब मीनारही लहान वाटेल. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

by Team Gajawaja
0 comment
Spiritual
Share

Spiritual : जगभरात आपल्या उंचीसाठी आयफेल टॉवर आणि कुतुब मीनारला ओखळले जाते. दूरवरून पर्यटक ते पाहण्यासाठी येतात. पण तुम्हाला माहितेय का, भगवान शंकराची अशी एक मूर्ती आहे जी कुतुब मीनार आणि आयफेल टॉवरही त्याच्या समोर लहान दिसतील. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….

येथे आहे जगातील सर्वाधिक मोठी शंकराची मूर्ती
भगवान शंकराची सर्वाधिक मोठी मूर्ती नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर आहे. जगातील सर्वाधिक मोठी मूर्ती अतिशय अप्रतीम आहे. मूर्ती पाहून असे वाटते की, भगवान शंकरच जणू तेथे ध्यान मुद्रेत बसले आहेत. अशाप्रकारची मूर्ती अन्य ठिकाणी फार मुश्किल आहे. शंकराची ही मूर्ती राजस्थानमधील पिलानी येथे राहणारे मूर्तिकार नरेश कुमार यांनी तयार केली होती.

Shiva Statue at Nathdwara, Rajasthan

किती उंच आहे मूर्ती
जगातील सर्वाधिक मोठ्या शंकराची मूर्ती 369 उंचीची आहे. याआधी मूर्ती 251 फूट उंचीची तयार करण्यात येणार होती. पण नंतर याची उंची 351 फूट करण्याचा विचार करण्यात आला. (Spiritual)

मूर्तीची खासियत?
शंकराची मूर्ती 30 हजार टन पंचधातूची तयार करण्यात आली आहे. यासाठी 90 इंजिनिअर्स आणि 900 कारागिरांची मदत घेण्यात आली आहे. तुम्हाला ही मूर्ती 20 किलोमीटर दूरवरून पाहू शकता. या मूर्तीसमोर 25 फूट उंच आणि 7 फूट रुंद नंदी देखील तयार करण्यात आला आहे. याचा पाया 10 वर्षांपूर्वी मोरारी बापू यांनी घातला होता. खास गोष्ट अशी की, ही मूर्ती अशाप्रकारे तयार करण्यात आलीय एखादे वादळ आले तरीही कोणतेही नुकसान होणार नाही. याचे परिक्षण ऑस्ट्रेलियातील लॅबमध्येही करण्यात आले आहे.


आणखी वाचा :
शिवशंकराची पूजा आणि धोत्र्याच्या फळाचे महत्त्व
महाकालबाबांची महाशिवरात्र
भारत नव्हे जगातील ‘या’ ठिकाणी आहे प्रसिद्ध शंकराची मंदिरे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.