जगभरात अशी काही ठिकाणं आहेत जेथे अधिकृतरित्या लोक किडे-मुंग्या अगदी आनंदाने खातात. याच लिस्टमध्ये आता सिंगापुरचे सुद्धा नाव जोडले जाणार आहे. सिंगापुर मधील खाद्य एजेंसीने सरकारच्या खाद्य आणि पशू चारा उद्योगाला या संदर्भात अशा १६ किड्यांच्या प्रजितीची लिस्ट पाठवली आहे. त्यांना खाण्याची परवानगी मिळू शकते. असे सांगितले जात आहे की, सरकारनेच स्वत:हून अशी लिस्ट मागितली होती आणि आता त्याला लवकरच हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. (Singapore Food)
नियमात बदल करण्याची प्रक्रिया
खरंतर सिंगापुरच्या न्यूज एजेंसीच्या मते, नियमात बदल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशातच लवकरच फुलपाखरु, भुंगा, किडे, मधमाशा सारख्या प्रजाति खाण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. याचे थेट सेवन केले जाऊ शकता. तळलेल्या किटकांपासून स्नॅक्स किंवा प्रोटीन बार सारख्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. सिंगापुर फूड एजेंसी सध्या याच प्रकरणी तज्ञांशी संवाद साधत आहेत.
खाणाऱ्यांची संख्या वाढतेय
रिपोर्ट्सनुसार, सिंगापुर खाद्य एजेंसीने युरोपीय संघ आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि थायलंड सारख्या देशांचा संदर्भ घेतला होता, ज्यांनी काही खास प्रजातिंच्या किटकांना खाण्याची परवानगी दिली आहे. असा सुद्धा तर्क दिला होता की, खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे अशातच त्या किड्या-मुंग्यांचा समावेश होऊ शकतो ज्यामध्ये पोषक तत्व अधिक असतात.(Singapore Food)
हे देखील वाचा- न्यूझीलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘या’ कारणास्तव मृत व्हेल आढळतायत
सिंगापुरच्या फूड इंडस्ट्रीमध्ये आनंद
सध्या या निर्णयानंतर सिंगापूरच्या फूड इंडस्ट्रीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही काळापूर्वी सुद्धा युरोपीय खाद्य सुरक्षा एजेंसीने सुद्धा असेच म्हटले होते. युरोपात पिवळ्या रंगाचे कीडे खाणे हे सुरक्षित मानले जात होते. तेथे या किड्यांचा वापर आता बिस्किट्स, पास्ता आणि ब्रेड तयार करणाऱ्या पिठात ही होत आहे.
या अशा विचित्र खाद्यपदार्थांमध्ये वियतनाम येथ सुद्धा सापापासून तयार करण्यात आलेली वाइन प्यायली जाते. खरंतर सापच्या वाइनमध्ये अत्यंत विषारी साप हे बॉटलमध्ये बंद करुन ठेवले जातात. त्यामध्ये सापाचे रक्त मिसळल्यानंतर पाणी थोडे हलके गुलाबी होते. खरंतर इथेनॉल सापाचे विष हे बिनविषारी करते. त्यामुळेच ते धोकादायक नाही. या वाइनला औधष म्हणून सुद्धा प्यायले जाते. तसेच चीन मध्ये पक्ष्यांच्या घरट्यांपासून तयार करण्यात आलेले सूप ही आवडीने प्यायले जाते. या सूपला कावीयार असे सुद्धा म्हटले जाते. चीनी लोक असे म्हणतात की, या सूपमध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. तर १ कप सूपची किंमत ही जवळजवळ ५-६ हजारांपर्यंत असते.