आपण नेहमीच ऐकतो ‘कोणतेही काम हे लहान नसते’ किंवा ‘काम हे काम असते’. त्यामुळे प्रत्येक जण हा आपल्यासा सुखी-समाधानी आणि उत्तम आयुष्य जगता यावे यासाठी आपल्याला मिळेल ते काम करण्यास तयार असतात. त्याचसोबत हे काम करत असताना आपण पाहिलेले एक स्वप्न पूर्ण करण्याची सुद्धा त्यांची इच्छा असते. याच पार्श्वभूमीवर बिहारची राजधानी पटना मधील शाजिया कैसर या महिलेने कपड्यांऐवजी शू लॉन्ड्री सुरु केली. शू लॉन्ड्री (Shoe laundry) मध्ये तुमचे जुने, नवे शू हे तुम्हाला स्वच्छ करुन दिले जातात. शाजिया या महिलेने सुरु केलेल्या या व्यवसायाला बहुतांश लोकांनी नावं ठेवलीच पण तिची खिल्ली उडवणे ही सोडले नाही. पण आज ती व्यावसायिकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
पटना येथे राहणारी शाजिया ही एका कंपनीत नोकरी करत होती. दररोजचा दिनचर्या तिची सुरुच होती. पण शाजिया हिला आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे असे नेहमीच वाटत होते. अशातच तिने एका मॅग्जीनमध्ये भारतातील शू लॉन्ड्री संदर्भात सुरुवातीला वाचले. येथूनच तिने आपली सुद्धा शू लॉन्ड्री असावी असे ठरविले. याबद्दल तिने लोकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी तिचे बोलणे हे हास्यास्पद घेतले. कारण पटना मध्य़े कोणालाही शू लॉन्ड्री संदर्भात काहीच माहिती नव्हते. अखेर नवऱ्याच्या पाठिंब्याने शाजियाने २०२१ मध्ये शू लॉन्ड्री सुरु केली.
हे देखील वाचा- भारतातील अनोखे रेस्टॉरंट जेथे पैसे नव्हे तर प्लास्टिकच्या बदल्यात दिले जाते जेवण
शू लॉन्ड्री तर सुरु केलीच होती पण सुरुवातीचे काही महिने कोणीही तिच्याकडे आले नाही. या दरम्यान तिलाच उलट फुकटात शूज साफ करुन द्यावे लागले. परंतु जेव्हा लोकांना हळूहळू याबद्दल कळू लागले तेव्हा अधिकाधिक लोक तिच्याकडे येऊ लागले. शू लॉन्ड्रीसाठी त्यांना फक्त शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागत होते. शाजियाने या कामासाठी आपल्यासोबत अन्य पाच-सहा जणांना सुद्धा हाताखाली घेतले आहे. आज शाजिया या कामातून एका वर्षभरात ५-६ लाख रुपये कमवते. शाजियाबद्दल खास गोष्ट अशी की, तिच्या राज्यातील ती एकमेव महिला आहे तिने असा वेगळा प्रयोग केला असून आता तिचे एक वेगळेच व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे.(Shoe laundry)
शाजिया असे सांगते की, जेव्हा लोकांना यावर विश्वास बसला तेव्हा लोक चप्पलांची पॉलिश ते स्वच्छता सुद्धा करण्यास येतात. शोरुम मधील जे शूज ज्यावर धुळ लागली असते किंवा घाण झालेले असतात ते सुद्धा साफ करण्याची ऑर्डर येऊ लागली. सध्या करत असलेल्या कामामुळे शाजिया ही अत्यंत खुश आहे.