Home » पहिल्यांदा शिवजयंती कधी साजरी केली गेली?

पहिल्यांदा शिवजयंती कधी साजरी केली गेली?

by Team Gajawaja
0 comment
Shiv Jayanti
Share

हिंदवी स्वराज्याची स्थापना करत मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज १९ फेब्रुवारीला जयंती आहे. परंतु ही जयंती तारखेनुसार आहे. कारण शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नेहमीच वाद होतो. पण तारखेनुसार आणि तिथीनुसार असलेल्या शिवजयंती शिवप्रेमी मोठ्या आनंदात  साजरी करतात. विविध कार्यक्रमांचे ही आयोजन होते. तर महाराष्ट्र सरकारकडून शिवनेरीवर शिवन्मोत्सव साजरा केला जातो. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी पोवाडे, पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा होतो. तर तुम्हाला माहिती आहे का सार्वजनिक रुपात पहिल्यांदा शिवजयंती (Shiv Jayanti) कोणी साजरी केली? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. 

पहिल्यांदा येथे साजरी केली शिवजयंती 

महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवजयंती सार्वजनिक रुपात साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८७० मध्ये सुरु केली होती. हा सोहळा प्रथमच पुण्यात पार पडला. त्याआधी १८६९ मध्ये फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली होती. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर पहिला पोवाडा ही रचला.  शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहचावे याच उद्देशाने ती साजरी केली गेली. 

त्यानंतर स्वतंत्रता सेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रात १८९५ मध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. तेव्हापासून शिवजयंती धुमधाडाक्यात साजरी करण्याची सुरुवात केली. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते. तसेच बाळ गंगाधर टिळक आणि विद्वानांनी शिवरायांच्या जन्मतिथीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दलचे आपले विचार ही मांडले. टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत १४ एप्रिल १९०० च्या दिवशी केसरीमध्ये छापलेल्या लेखात याबद्दल सविस्तर सांगितले होते.

टिळकांनी हे सुद्धा मानले होते की, महाराजांची जन्मतिथी ठरवण्यासंदर्भात ठोस माहिती नाही. तेव्हा काही लेखांच्या आधारावर शिवाजी महाराजांचा जन्म ६ एप्रिल १६२७ मानली गेली. याच आधारावर शिवाजी महाराज यांनी जयंती ६ एप्रिल पासून साजरी करण्यास सुरुवात झाली. 

एक तिथी ठरवण्यासाठी मिळाले नाही कागदपत्र 

महाराष्ट्र सरकारने १९६६ मध्ये इतिहासकारांची एक समिती गठन केली. त्यांना शिवाजी महाराजांची योग्य जन्म तारीख ठरवण्यास सांगितले होते. समितीने असा निष्कर्ष काढला होता की, शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वंद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० आहे.  परंतु समितीतील एक इतिहासकार एनआर फाटक यांनी असे म्हटले की, वैशाख शुक्ल द्वितीया शके १५४९ म्हणजेच ६ एप्रिल १६२७ रोजी झाला होता. (इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे)

परंतु समितीच्या दुसऱ्या बैठकीत इतिहासकारांनी मानले की, शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल एकच तारीख ठरवण्यासंदर्भात कागदपत्र मिळाली नाहीत. त्यामुळे जो पर्यंत इतिहासकारांमध्ये सहमति होत नाही तो पर्यंत जुनी तारीख म्हणजे ६ एप्रिलला शिवाजी महाराजांची जन्मतिथी मानली गेली होती.  (Shiv Jayanti)

२००० मध्ये विधानसभेत मंजूर झाला नव्या तारखेचा प्रस्ताव 

त्यानंतर १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात आली. खंरतर महाराष्ट्राचे माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी २००० मध्ये महाराष्ट्र सरकार समोर आधीच्या समितीचे रिपोर्ट्स आणि अन्य काही पुरावे सादर केले. त्यानंतर विधानसभेत १९ फेब्रुवारी १६३० संदर्भातील प्रस्ताव पास झाला. तत्कालीन देशमुख सरकारच्या कॅबिनेटने सुद्धा याला मंजूरी दिली. पण तेव्हा विरोधात असलेल्या शिवसेनेकडून याचा जोरदार विरोध केला गेला आणि ६ एप्रिलच शिवजयंती साजरी करण्याबद्दल आग्रह धरला.

हे देखील वाचा- वृंदावनचे प्रेम मंदिर केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध

आज ही वाद कायम 

शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी बद्दल १०० वर्षांपर्यंत शोध घेतला गेला तरीही आज ही त्या बद्दल एकमत नाही. काही ठिकाणी जुनी जन्म तारीख म्हणजच ६ एप्रिलला शिवजयंती साजरी केली जाते. तर काही ठिकाणी १९ फेब्रुवारीला ती साजरी होते. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.