असे म्हटले जाते की, पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर ते ठिकाण म्हणजे कश्मीर. कारण कश्मीर मध्ये असलेला नैसर्गिक देखावा हा सर्वांना मोहून टाकतोच पण तेथील सांस्कृतिक परंपरा आजही जपली जात असल्याचे दिसून येते. मात्र इतिहासांच्या पनांवर लिहिलेल्या गेलेल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीच कोणाला माहिती नसतात किंवा कधी ही ऐकलेल्या नसतात. अशाच कश्मिरी पंडितांच्या आस्थेचे पवित्र धर्मस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा पीठाबद्दल (Sharda Peeth Mandir) अधिक माहिती देणार आहोत. परंतु हे पीठ आता एका खडकाच्या रुपात दिसते.
पाकव्याप्त कश्मीर मध्ये काही मंदिर आहेत परंतु हे मंदिर प्राचीन मंदिर ५०० वर्ष जुनं आहे. हे एक प्रमुख शक्तीपीठांपैकी एक आहे. दरम्यान, आता त्याची झालेली अवस्था पाहून कश्मिरी पंडितांना त्यांच्या या संबंधितच्या वेदना खरोखरचं दुखावल्या जातात. तर जाणून घेऊयात शारदा पीठाच्या मंदिराच्या इतिहासाबद्दल अधिक.
कश्मिरी पंडितांच्या आस्थेचे केंद्र- शारदा पीठ
शारदा पीठाला आस्थेसह धार्मिक महत्व सुद्धा आहे. कारण अशी एक वेळ होती की, हे स्थान शिक्षणाचे प्रमुख केंद्र मानले जायचे. शारदी पीठ मुजफ्फराबाद पासून जवळजवळ १४० किमी आणि कुपवाडा पासून जवळजवळ ३० किमी दूर असलेल्या पाकव्याप्त कश्मीरच्या एलओसीजवळ नीलम नगींच्या अंतर्गत स्थित आहे. असे म्हटले जाते की, या मंदिराला महाराज अशोकाने २३७ ईसा पूर्व मध्ये बनवले होते.
एक वेळ अशी होती की, शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या या मंदिरांवर कश्मिरी पंडितांसह संपूर्ण देशभऱातील लोक येथे दर्शन घेण्यासाठी यायचे. इतिहासकारांच्या मते, शारदा पीठ मंदिर अमरनाथ आणि अनंतनागच्या मार्तंड सूर्य मंदिराप्रमाणे कश्मिरी पंडितांचया श्रद्धेचे स्थान राहिले आहे. कश्मिरी पंडितांसाठी अत्यंत पूजनीय शारदा देवी मंदिरात गेल्या ७० वर्षांपासून पूजाच झालेली नाही.
मंदिरासंबंधित धार्मिक मान्यता
असे मानले जाते क, शारदा पीठ शाक्त संप्रदायला समर्पित पहिले तीर्थस्थळ आहे. कश्मीर मधील याच मंदिरात सर्वप्रथम देवीची पूजा सुरु झाली होता. त्यानंतर खीर भवानी आणि वैष्णो देवी मंदिराची स्थापना झाली. कश्मिरी पंडितांचे असे मानणे आहे की, शारदा पीठाच्या येथे पूजा केल्या जाणारी देवी शारदा ही तीन शक्तींचे संगम आहे. पहिला शारदा (शिक्षेचे देवी), दुसरी सरस्वती (ज्ञानाची देवी) आणि तिसरी वाग्देवी (वाणीची देवी).
काय आहे शारदा पीठाच्या मंदिराची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शंकरांनी देवी सतीच्या देहत्यागानंतर त्यांच्या शवासंदर्भात ते फार दु:खी होते आणि सतीच्या शवासह तांडव केले होते. तेव्हा सतीचा डावा हात येथे येऊन पडला होता. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, याला देवी शक्तीच्या १८ महाशक्तीपीठांपैकी एक मानले जाते.(Sharda Peeth Mandir)
हे देखील वाचा- देवाला श्रीफळच का अर्पण करतात?
शंकराचार्य आणि रामानुचार्य यांनी येथे मोठी कामगिरी केली
हे मंदिर विद्येची देवी सरस्वतीला समर्पित आहे. एक वेळ अशी होती की, शारदा पीठ भारतीय उपमहाद्वीपमधील सर्वश्रेष्ठ मंदिर विश्वविद्यालयांपैकी एक होते. असे ही म्हटले जाते की, शैव संप्रदायाचे जनक म्हणून ओळखले जाणारे शंकराचार्य आणि वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक रामानुजाचार्य हे दोघे ही येथे आले होते. या दोघांनी येथे फार मोठी कामगिरी केली. शंकराचार्यांनी येथे सर्वज्ञ पीठावर बसले आणि रामानुजार्य हे येथेच श्रीविद्याचे भाष्य सादर केले.
१४ व्या शतकातापर्यंत बहुतांश वेळा नैसर्गिक संकट आल्याने मंदिराचे फार मोठे नुकसान झाले. त्यानंतर परदेशी आक्रमणांमुळे सुद्धा याचे फार नुकसान झाले. या मंदिराची अखेर डागडुजी ही १९ व्या शतकात महाराजा गुलाब सिंह यांनी केली होती.