२०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. त्यांच्याकडून एनसीपीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतलाय. त्याचसोबत आयोगाने तृणमुल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा सुद्धा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता शरद पवार यांना गोवा, मणिपुर आणि मेघालयातील राज्य पक्षाचा दर्जा सुद्धा मिळणार नाही आहे.
सोनिया गांधी यांच्या पक्षातून विभक्त होत शरद पवार यांनी २५ मे १९९९ रोजी माजी लोकसभा अध्यक्ष पीए संगमा आणि तारिक अनवरा यांच्यासोबत मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. पक्षाच्या स्थापनेनंतर पावर यांची राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर ही त्यांची ताकद वेळोवेळी वाढत गेलीय
पहिल्या निवडणूकीपूर्वीच मिळाले यश
१९९९ मध्ये पक्षाची स्थापना केल्यानंतर तेराव्या लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या पक्षाने एकूण १३२ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ८ जणांचा विजय झाला होता. तेव्हा एनसीपीने देशभरात एकूण २.२७ टक्क्यांनी मत मिळवली होती. हळूहळून एनसीपीच्या मतांचा आकडा मात्र घटत गेला.
आकडेवारीकडे लक्ष दिल्यास असे कळते की, लोकसभा निवडणूकीत पक्षाला १९९९ मध्ये जेथे २.२७ टक्के मत मिळाली होती तिच पाच वर्षानंतर म्हणजेच २००४ मध्ये कमी होऊन .८० टक्के, २०१९ मध्ये १.१९ टक्के, २०१४ मध्ये १.०४ टक्के आणि २०१९ मध्ये ०.९३ टक्के झाली. म्हणजेच स्थापनेनंतर पक्षाला कधीच दोन टक्क्यांहून अधिक मत मिळाली नाहीत.

महाराष्ट्रात काय स्थिती?
मराठी अस्मितेची लढाई लढणाऱ्या या शरद पवारांची (Sharad Pawar) महाराष्ट्रात दबदबा आहे. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री सुद्धा होते. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारपूर्वी उद्धव ठाकरे सरकारचे ते शिल्पकार राहिले आहेत. त्यांचे महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षानंतर कोसळले गेले.
राष्ट्रीय स्तरावर पवार हे पॉवरफुल
महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेत भले ही शरद पवार यांचा पक्ष सातत्याने मागे पडत होता. पण राष्ट्रीय स्तरावर शरद पवार हे एक मजबूत व्यक्तीमत्व म्हणून उभे राहिले. आज सुद्धा ते नॉन-कांग्रेस आणि नॉन-भाजप पक्षांदरम्यान सत्तेचे प्रमुख केंद्र आहेत. त्याचसोबत या दोन्ही पक्षांमध्ये त्यांना एक ताकदवान राजकीय नेता म्हणून मान दिला जातो. २०१९ च्या लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत त्यांनी हे दाखवून दिले होते की, ते किती ताकदवान आहेत.
हे देखील वाचा- संभाजीनगरात दोन गटात झालेल्या वादावरुन हिंसा, संजय राउतांनी दिली अशी प्रतिक्रिया
एनसीपीची सध्याची स्थिती
आज भले ही एनसीपीकडून राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. पण लोकसभेत त्यांचे पाच आणि राज्यसभेत चार खासदार आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र विधानसभेत ५४, केरळ विधानसभा दोन आणि गुजरात विधानसभेत एक आमदार आहे. पक्षाचे एकूण २० लाखांहून अधिक सदस्य आहेत.