श्रावण महिना सुरु होऊन आता एक आठवडा झाला आहे. भगवान शंकराला समर्पित असलेला श्रावण महिना संपूर्ण हिंदू धर्मातील लोकांमध्ये अतिशय पवित्र आणि मोठा असतो. यावर्षीचा श्रावण हा अधिकच खास ठरला. कारण यंदा श्रावणाची सुरुवात सोमवार पासूनच झाली. सोमवार हा शंकराचा दिवस मानला जातो. त्यामुळे हा एक छान योग्य समजला गेला. श्रावण महिन्यात सृष्टीचे सर्जनहार असलेल्या शंकराची आराधना केली जाते.
या महिन्यात भगवान शंकराची उपासना करताना अनेक पूजा देखील केल्या जातात. श्रावण महिन्यात शंकराला दर सोमवारी शिवामूठ वाहण्याची फार जुनी पद्धत आहे. प्रत्येक सोमवारी विविध धान्य शंकराला मनोभावे अर्पण केले जाते. आज अर्थात १२ ऑगस्ट रोजी श्रवणातला दुसरा सोमवार असल्याने आज कोणते गोष्ट शिवामूठ म्हणून व्हायची आणि आज कशी पूजा करायची हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
आज श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी एक शुभ योग जुळून आला आहे. आजच्या दिवशी लक्ष्मी नारायण आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे. श्रावणातल्या सोमवारी भगवान शंकरांना रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून प्रसन्न केले जाते. आज दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा आहे.
आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे. आजच्या दिवशी श्रावण सोमवारी पूजा कशी करावी काय काय करावे जाणून घेऊया. सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. अनेक लोकं हा उपवास सोमवारी सूर्यास्ताच्या आधी सोडतात तर काही लोकं तो दुसऱ्या दिवशी सोडतात. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर शुचिर्भूत होऊन श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर शिवशंकरांचे ध्यान करावे.
‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रोच्चारासह भगवान शंकराची आणि ‘ॐ नमः शिवायै’ या मंत्रोच्चारासह देवी पार्वतीची षोडशोपचाराने पूजा करावी. जमल्यास शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शंकराला तिळाची शिवामूठ वाहावी. समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष भगवान शंकरानी प्राशन केले आणि मनुष्य जिवाचा धोका टाळला. त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी श्रावणात सोमवारी ही तिळाची शिवामूठ वाहिली जाते. संसारातील अडचणींना स्नेह भावाने सामोरे जायचे हाच तर संदेश या दुसऱ्या तिळाच्या शिवामुठीत लपला आहे. श्रावणी सोमवारी तीळाची शिवामूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ हा मंत्र म्हणावा.श्रावणी सोमवार. शिवामूठ, दुसरा श्रावणी सोमवार ,