मूळ भारतीय असलेले ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी (Salman Rushdie) यांच्यावर शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये जीवघेणा हल्ला झाला. या कार्यक्रमादरम्यान मंचावरच रुश्दी यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यांना एअरलिफ्टच्या माध्यमातून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु ७५ वर्षीय रुश्दी यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र रुश्दी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला का झाला आणि ते कोण आहेत? याबद्दलच आपण अधिक जाणून घेऊयात.
-एका कादंबरीसाठी इस्लामवादी दहशतीच्या निशाण्यावर
सलमान रुश्दी यांनी १९८८ मध्ये एक कादंबरी ‘द सेटेनिक वर्सेज’ लिहिली होती. जी इस्लामिक धर्मावर आधारित आहे. आजपर्यंत ही वादाच्या कचाट्यात अडकलेल्या पुस्तकांपैकी एक असल्याचे मानले जाते. तसेच बहुतांश देशांमध्ये यावर बंदी सुद्धा घालण्यात आली आहे. ही कादंबरी लिहिल्याने ते सातत्याने इस्लामी दहशतीच्या निशण्यावर राहिले आहेत.
-रुश्दी यांना मारण्यासाठी ३० लाख डॉलर्सचे बक्षीस
द सेटेनिक वर्सेज कादंबरीसाठी ईरानचे दिवंगत सर्वोच्च नेते अयात्तुल्लाह रुहोल्लाह खोमैनी यांनी १९८९ मध्ये त्यांना मारण्यासाठी एक फतवा काढला होता. या फतव्यात रुश्दी यांना मारण्यासाठी ३० लाख डॉलरचे बक्षीस ही ठेवले होते आणि ते आजही सुरु आहे.
-फतव्यामुळे १० वर्ष लपून राहिले रुश्दी
आपल्या डोक्यावर मारण्याच्या फतवा असल्याने रुश्दी जवळजवळ १० वर्ष जगापासून अलिप्त राहिले. या दरम्यान काही गंभीर घटना सुद्धा झाल्या, रुश्दी यांच्या ट्रांन्सलेटर्सवर हल्ले झाले. त्याचसोबत पुस्तकांची विक्री केल्या जाणाऱ्या बुकस्टोअर्सवर ही बॉम्ब हल्ला करण्यात आला.
-इरानच्या सरकारकडून वरवर फतव्याला नकार पण…
इरानचे सरकार खोमैनी यांच्या फतव्यापासून दीर्घकाळ लांब राहिले. परंतु रुश्दी यांच्या विरोधात भावना भडकवल्या जात होत्या. अखेर २०१२ मध्ये अर्ध्दसरकारी इरानी धार्मिक संगठनने रुश्दी यांना बक्षीसाची रक्कम २८ लाख रुपये वाढवून ३३ लाख डॉलर केली होती.
हे देखील वाचा- पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ताबा मिळवणारी लेखिका एलिना फरांते कोण आहे?
-रुश्दी यांनी फतव्याची नेहमीच उडवली खिल्ली
सलमान रुश्दी (Salman Rushdie) यांनी आपल्याला मारण्यासाठी निघालेल्या फतव्याची नेहमीच खिल्ली उडवली. त्यांचे असे म्हणणे होते की, या गोष्टीबद्दल कोणताही पुरावा नाही. लोकांना या बक्षीसमध्ये काहीही इंटरेस्ट नाही.
-रुश्दी यांची एक कादंबरी झाली होती प्रसिद्ध
रुश्दी यांची आणखी एक कादंबरी ‘मिडनाइट चिल्ड्रन’ सुद्धा फार प्रसिद्ध झाली होती. कादंबरीला १९८१ मध्ये बुकर प्राइजने गौरवण्यात आले होते. ब्रिटेनने त्यांना नेहमीच आपले सन्मानित नागरिक म्हणून मानले. याच कारणामुळे साहित्याच्या सेवेसाठी १६ जून २००७ मध्ये महाराणी एलिजाबेथ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना नाइट (सर) या उपाधीने पुरस्कार देण्यात आला होता.