Home » श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : राजेश टोपे

श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : राजेश टोपे

by Correspondent
0 comment
Share

कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेड वर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे.  ICU बेडवर लक्षणं नसलेल्यानं दिली नाही पाहिजे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावेळी ते म्हणाले की ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. 80 टक्के लोकांना लक्षण नाहीत. त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार करत आहोत. बरेच जण लक्षणं नसताना बेड अडवून ठेवत आहेत. लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवणाऱ्यांना थांबवावं लागेल, असंही ते म्हणाले.

पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करणार

यावेळी पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाबाबत बोलताना ते म्हणाले की,  या घटनेत अॅब्युलन्स न मिळाले हे दुर्देवी आहे. याचं समर्थन नाही. अशा घटना घडू नये म्हणून आपण नियम बनवलेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी सगळ्यांना सांगितलं आहे की, ही सुविधा मोफत द्या.  तरीही अशा घटना घडत आहेत जे  दुर्देवी आहे. पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करू तसेच माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ, असंही टोपे म्हणाले.
टोपे यावेळी म्हणाले की, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष दिले आहे. जम्बो रुग्णालय बनवली आहेत. तिथं अजून व्यवस्था तयार होत आहे. बेडची अडचण येऊ नये म्हणून कडक अंमलबजावणी करत आहोत, असं ते म्हणाले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.