सध्या संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकांचे पडघम वाजताना दिसत आहे. राज्यात २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी निवडणुका संपन्न होत आहे. सगळीकडे जोरदार प्रचार सुरु झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत असून उमेदवारांकडून जोरदार प्रचारही सुरू आहेत. यंदाची निवडणूक अनेक अर्थाने खास ठरणार आहे. यंदा महानगरपालिकेत होणारी निवडणूक ही प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यामुळे एका प्रभागात चार उमेदवारांचे पॅनल असणार आहे. अशावेळी चार उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावे लागणार आहे. अर्थात प्रत्येक नागरिकाला चार वेळा मतदान करावे लागणार आहे. (Election 2026)
आता नक्की चार वेळा मतदान करावे लागणार म्हणजे नक्की कसे करायचे? अनेकांना यंदाचे मतदान कसे करावे हे समजत नसल्याने आज आम्ही तुम्हाला याचीच माहिती देणार आहोत. हे मतदान कसे करावे यासाठी निवडणूक आयोगाने लोकांना मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रभाग रचनेत मतदान कसे करावे? हे अतिशय उत्तम पद्धतीने समजून सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने प्रसारित केलेल्या या व्हिडिओनुसार प्रत्येक नागरिकाला चार उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावे लागणार आहे. स्टेप बाय स्टेप पद्धतीने जाणून घ्या मतदन कसे करणार. (Marathi News)
मतदान कसे करावे?
– यावेळी मतदान केंद्रावर कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतील. तुम्हाला मतदान एकूण चार म्हणजेच जागा अ, ब, क, ड अशा चार जागांसाठी मतदान करणं आवश्यक आहे. (Todays Marathi Headline)

– उमेदवारांच्या संख्येनुसार या चारही जागांची आखणी ईव्हीएम मशीनवर करण्यात येणार आहे. यासाठी एकतर चार स्वतंत्र ईव्हीएम असतील, किंवा दोन मशीनवर या जागा विभागण्यात येईल. (Top Marathi Headline)
– चारही जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे दिलेले जाणार आहे. अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी गुलाबी रंग, क जागेसाठी पिवळा रंग व ड जागेसाठी निळा रंग असणार आहे.
– प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह असेल. त्यासमोरील बटन दाबताच लाल रंगाचा लाईट लागेल. याचा अर्थ त्या जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया ब, क आणि ड जागेसाठीही असेल. (Latest Marathi News)
– एखाद्या मतदाराने पसंतीच्या उमेदवाराला मत देण्यास किंवा वरीलपैकी एकही नाही, ‘नोटा’या पर्यायासमोरील बटण दाबण्यास नकार दिला तर मतदान केंद्राध्यक्षांनी बॅलेट युनिटवरील उमेदवारांचे नावासमोरील दिवे एखादा पुठ्ठा अथवा पुस्तक ठेवून झाकावेत.
– मतदान केंद्रात उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधींना बरोबर घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण राहिले आहे, त्या मतपत्रिकेवरील ‘वरीलपैकी एकही नाही’ (नोटा) या पर्यायासमोरील बटण स्वतः दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी. (Top Trending Headline)
– शेवटचं म्हणजे, ड जागेसाठी मतदान केल्यावर बजर वाजेल. याचा अर्थ तुम्ही चारही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण केली आहे.
========
========
लक्षात ठेवा
प्रभागात चार उमेदवार असताना एखाद्या मतदाराला तीनच उमेदवारांना मते द्यायचे असल्यास चौथे ‘नोटा’चे बटण दाबावे लागेल, त्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करताना मतदाराने तीनच उमेदवारांना मतदान केले आणि चौथे बटण हे ‘नोटा’ दाबले तर ते मत कोणत्याही उमेदवारांना झाले नसून ते गणले जात नाही. त्या मताची गणना ‘वरीलपैकी एकही नाही’ अशी केली जाते. मतदान यंत्राच्या बॅलेट युनिटवर शेवटचे १६ वे ‘नोटा’ बटण ठेवले आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
