Home » 29 वर्षात पहिल्यांदाच दाउद इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस, पण NIA ने असे का केले?

29 वर्षात पहिल्यांदाच दाउद इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस, पण NIA ने असे का केले?

by Team Gajawaja
0 comment
NIA
Share

मुंबईत १९९३ मध्ये झालेला बॉम्बस्फोटानंतर दाउद इब्राहिम याला देशातील मोस्ट वॉटेंट आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर जवळजवळ २९ वर्षानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पहिल्यांदाच दाउद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.१८ ऑगस्टला एनआयए केस क्रमांक RC- 01/2022/NIA/MUM अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या बक्षीसांच्या लिस्टमध्ये दाउद व्यतिरिक्त शकील शेख उर्फ छोटा शकीलवर २० लाख रुपये तर डी कंपनीच्या अन्य खास गुर्गों हाजी अनीस उर्फ अनीस इब्राहिम शेख, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टायगर मेमन मधील प्रत्येक एकावर १५-१५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.(Reward on Dawood Ibrahim)

डी कंपनीच्या विरोधात २९ वर्षानंतर अचानक तपास यंत्रणा अॅक्टिव्ह झाल्यानंतर सर्व हैराण झाले आहेत. अखेर ऐवढ्या वर्षानंतर भारतीय यंत्रणा अचानक पुन्हा सक्रिय झाल्याचे कारण काय आहे? तर जाणून घेऊयात अधिक.

जाणून घ्या बक्षीसच्या लिस्टमध्ये लावण्यात आलेले सर्व आरोप
एनआयएने डी कंपनीवर भारतात पुन्हा सक्रिय टोळी बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचसोबत या टोळीच्या माध्यमातून हत्यारे, ड्रग्ज आणि बनावट नोटांची भारतात स्मगलिंग करणे आणि देशात दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाकिस्तानी गुप्त यंत्रणा आयएसआयच्या व्यतिरिक्त दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांनी सुद्धा आपल्या स्लीपर सेल्सला अॅक्टिव्ह करुन ठेवले आहे. दाउदने या नव्या टोळीला प्रभावशाली भारतीय उद्योगपती आणि नेत्यांना निशण्यावर ठेवण्याचे निर्देशन दिले आहेत.

दरम्यान, मे मध्ये एनआयएच्या टीमने जवळजवळ २९ ठिकाणी रेड टाकली होती. ज्यामध्ये दाउदच्या या नव्या सिंडिकेट संबंधित खुप पुरावे मिळाले होते. ही छापेमारी मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दरगाह आणि माहिम दरगाचे एक ट्रस्टी समीर हिंगोराह यांच्या व्यतिरिक्त छोटा शकीलच मेव्हणा सलीम कुरैशी आणि काही अन्य लोकांच्या ठिकाणांवर टाकले होते. समीरचा संबंध मुंबईती बॉम्ब स्फोटात सुद्धा आढळून आला होता. त्यासाठी त्याला शिक्षा सुद्धा झाली होती.

या छापेमारीत मिळालेल्या पुराव्यांच्या माहितीनुसार, ही नवी टोळी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात खंडणी वसूल, सट्टेबाजी, बिल्डरांना धमकी आणि ड्रग्जचा उद्योग वाढवून बक्कळ रक्कम मिळवत आहे. या रक्कमेचा उपयोग कोणत्याही घटनेला अंतिम रुप देण्यासंदर्भात केले जाऊ शकतात.

Reward on Dawood Ibrahim
Reward on Dawood Ibrahim

दाउदवर आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बक्षीस आधीपासूनच घोषित
दाउद इब्राहिमला वर्ष २००३ मध्ये युएनएससीने ग्लोबल टेररिस्ट घोषित केले होते. त्याच्या अटकेसाठी २.५ कोटी डॉलरचे बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले होते. ही कारवाई भारत आणि अमेरिकेच्या प्रस्तावावर करण्यात आली होती. ज्याचा पाकिस्तानाने विरोध केला आहे. भारतने दाउदच्या विरोधात १९९३ च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटात सहभागी होण्यासह मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल, आंतरराष्ट्रीय स्मगलिंग आणि हत्यांमध्ये सहभाग असल्यासंबंधित पुरावे युएनएससीच्या विरोधात सादर केले होते.(Reward on Dawood Ibrahim)

हे देखील वाचा- ऑस्ट्रेलियात स्वस्तिकवर का घातलीय बंदी? जाणून घ्या हिटलरचे हिंदू धर्मासोबत होते कनेक्शन?

दाउदचा नवा फोटो मिळवण्यास भारतीय यंत्रणा फेल
एनआयएने गुरुवारी बक्षीसांची लिस्ट जाहीर केल्यानंतर दाउदसह त्याच्या टोळ्यांमधील सर्वांचे फोटो सुद्धा जाहीर केले आहेत. जेथे दाउदच्या गँगमधील लोकांचे नवे फोटो यंत्रणेने जाहीर केले आहेत. पण दाउदचा तोच २९ वर्ष जुना फोटो आहे. जो १९९३ मध्ये मुंबई बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिसांनी जारी केला होता. म्हणजेच २९ वर्षानंतर सुद्धा भारतीय यंत्रणांना दाउदच्या जवळपास पोहचताच आले नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.