भारतात जेव्हा मुघल शासनाची सुरुवातझाली तेव्हा एकामागोमाग एका रियासतांवर त्यांनी ताबा मिळवला. सैन्य मोठे असल्याने त्यांना त्याचा अधिक फायदा झाला. जसाजसा त्यांचे बळ वाढले तशी त्यांची भीती ही पसरु लागली होती. काहींनी तर आपली सल्तनत अगदी सहज त्यांना दिली. मात्र असे काही योद्धे राहिले जे त्यांच्या समोर झुकले नाहीत. राणी दुर्गावती सुद्धा त्यांच्यापैकी एक आहे. त्यांनी निडरपणे आणि स्वाभिमानाने मुघलांना आव्हान दिले. १५ व्या शतकात तत्कालीन मुघल बादशाह अकबरने संपूर्ण भारतात वेगाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. पण मध्य भारतातील गोंडवाना साम्राज्य जिंकणे त्याच्यासाठी सोप्पे नव्हते. कारण त्याच्या मार्गात होती रणांगिणी राणी दुर्गावती (Rani Durgavati).
यामुळे नाव पडले राणी दुर्गावती
राणी दुर्गावती यांचा जन्म ५ ऑक्टोंबर, १५२४ रोजी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कालिंजरचा राजा किर्तीसिंह चंदेल यांच्या घरी झाला. त्या दिवशी दुर्गाष्टमी होती. हेच कारण होते की, त्यांचे नाव दुर्गा ठेवले गेले. त्या आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांना लहानपणापासूनच आपल्या लोकांशी आदर आणि आपुलकी होती. त्या त्यांच्या स्वाभिमासाठी लढल्या. ज्या चंदेल वंशात राणी दुर्गावती यांचा जन्म झाला होता त्याच चंदेलांनी भारतात महमूद गजनी यांना रोखण्याचे काम केले होते. पुरुष प्रधान समाजात राणी दुर्गावती यांनी परंपरा मोडली आणि इतिहासात वीरांगणेच्या रुपात आपले नाव कोरले.
जेव्हा साम्राज्याची कमान सांभाळली
वयाच्या १८ व्या वर्षात गढा-कटंगाचे गोंड राजा संग्राम शाह यांचा मुलगा दलपत शाह यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. १५४५ मध्ये राणी दुर्गावती यांनी मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव वीर असे ठेवले. पाच वर्षानंतर म्हणजेच १५४८ मध्ये त्यांचे पति दलपत शाह यांचा मृत्यू झाला. आता राणी दुर्गावती (Rani Durgavati) यांच्याकडे साम्राज्याची कमान संभाळण्यासह मुलाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी होती.
राणी दुर्गावती यांनी वीर नारायण यांना सिंहासनावर बसवले आणि सम्राज्याची कमान स्वत: सांभाळली. त्यांच्या नेतृत्वात राज्य ऐवढे समृद्ध झाले की, लोक सोन्याची नाणी हत्तींच्या रुपात कर देऊ लागले होते. राणी दुर्गावती यांनी रानीताल, चेरीताल आणि अधारताल सारख्या जलाशयांची निर्मिती केली. त्यांनी राज्याची सीमा मजबूत केली. त्यांच्याजवळ २० हजार घोडेस्वार आणि १ हजार युद्धातील शस्रे आणि एक मोठे पायदळ सैन्य होते.
हे देखील वाचा- केशरी वस्त्रांतील ‘ती’ समोर येते आणि आपल्या भावना व्यक्त करते!!!
जेव्हा मुघलांना आव्हान दिले
फारसी कागदपत्र तारीख-ए-फरिश्ता मध्ये असे म्हटले गेले आहे की, कशा पद्धतीने राणी दुर्गावती यांनी मुघलांना आव्हान दिले होते. १५६२ मध्ये अकबरने मालवाला मुघल साम्राज्यात सामील केले. हाच तो काळ होता जेव्हा अकबर वेगाने आपली सल्तनतचा विस्तार करत होता. आता अकबराची नजर गोंडवानावर होती. १५६४ मध्ये मुघल गवर्नर आसफ खान यांनी गोंडवानावर हल्ला केला. मुघलांच्या तुलनेत कमी सैन्य होते तरीही राणी दुर्गावती यांनी मोर्चा सांभाळला.
मुघल गवर्नर आसफ खान याचा खरा उद्देश गुप्चचरांच्या माध्यमातून त्यांचे सैन्य आणि खजिन्याची माहिती एकत्रित करायची होती. लवकरत त्याने सीमावर्ती गावांमध्ये छापेमारी करण्यास सुरुवात केली. अखेर १५६४ मध्ये त्याच्या राज्यावर पूर्णपणे हल्ला केला. राणी दुर्गावती यांचे मुघलांसोबत तीन वेळा युद्ध झाले. अखेर युद्धात जिंकणे सोप्पे नसल्याचे त्याला वाटत होते. तेव्हा त्याने मंत्र्याने राणी दुर्गावती यांचा जीव घेण्यास सांगितले तेव्हा मंत्र्यांनी असे न केल्याने त्याने कट्यार काढली आणि त्याच्यावर वार केले. २४ जून १५६४ रोजी राणींना वीरगति मिळाली.