सध्या G20 देशांची बैठक ही इंडोनेशियातील बाली शहरात होत आहे. खरंतर इंडोनेशियात प्रत्येक ठिकाणी हिंदू संस्कृतीचे दर्शन होते. ०९-१० च्या शतकापर्यंत हा देश हिंदू आणि बौद्ध देश होता. दरम्यान, येथील लोकांनी मुस्लिम धर्माचा स्विकार केला पण त्यांच्या मान्यता बदलल्या नाहीत. ते आज ही हिंदू संस्कृतीवर गर्व करतात आणि त्या आठवणीत ही ठेवतात. तर इंडोनेशियाची लोकसंख्या ही २३ कोटी आहे. हा जगातील सर्वाधिक चौथा लोकसंख्या असलेला देश असून तेथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या ही आहे. (Ramayana in Indonesia)
वर्ष १९७३ मध्ये येथील सरकारने आंतरराष्ट्रीय रामायण सम्मेलनाचे आयोजन सुद्धा केले होते. ते आयोजन फार वेगळेच होते, कारण एखाद्या मुस्लिम राष्ट्राकडून पहिल्यांदाच अन्य धर्मातील धर्मग्रंथांचा सन्मान करण्याचे आयोजन केले होते. इंडोनेशियात आज ही रामायणाचा ऐवढा सखोल प्रभाव आहे की, देशातील काही परिसरात रामायणाचे अवशेष आणि दगडांवरील नक्षीकामांमध्ये रामकथेतील चित्र अगदी सहज दिसून येतात.
पण भारत आणि इंडोनेशियातील रामायणात थोडे अंतर आहे. भारताती रामाची नगरी ही अयोध्या तर इंडोनेशियात ती योग्या नावाने आहे. येथे राम कथेला ककनिन, किंवा काकावीन रामायण अशा नावाने ओळखले जाते. भारतीय रामायणाचे रचनाकर्ते आदिकवी ऋषि वाल्मिकी आहेत तर इंडोनेशियात याचे रचनाकर्ते कवि योगेश्वर आहेत.
इंडोनेशियातील रामायण २६ अध्यायांचा एक विशाल ग्रंथ आहे. या रामायणात प्राचीन लोकप्रिय चरित्र दशरथला विश्वरंजन असे म्हटले गेले आहे. त्यामध्ये त्यांना एक शैव सुद्धा मानले आहे. म्हणजेच ते शंकराचे उपासक आहेत. इंडोनेशियातीर रामायणाचा आरंभ भगवान राम जन्मापासून होतो तर विश्वामित्रासह राम आणि लक्ष्मण यांच्या प्रस्थानात समस्त ऋषिगणांकडून मंगलाचरण केले जाते आणि दशरथाच्या घरी या जेष्ठ पुत्राच्या जन्मासह हिंदेशियाचे वाद्य यंत्र गामलान वाजवले जाते.(Ramayana in Indonesia)
इंडोनेशियातील रामायणात नौसेनेच्या अध्यक्षाला लक्ष्मण असे म्हटले जाते. तर सीतेला सिंता असे म्हटले जाते. हनुमान तर इंडोनेशियातील सर्वाधिक लोकप्रिय पात्र आहे, हनुमानाची लोकप्रियतेचा अंदाज अशा गोष्टीवरुन लावला जातो की, आज सुद्धा प्रत्येक वर्षी या मु्स्लिम लोकसंख्या असलेल्या देशात स्वातंत्र्याचा आनंद म्हणजेच २७ डिसेंबरला मोठ्या संख्येने राजधानी जकार्ता मधील रस्त्यांवर तरुण हनुमानाचा वेश धारण करुन परेडमध्ये सहभागी होताता. तर हनुमानाला इंडोनेशियात अनोमान असे म्हटले जाते.
हे देखील वाचा- ‘आवळा नवमी’ कशी साजरी केली जाते?
गेल्या वर्षातच इंडोनेशियातील सरकारने भारतातील काही ठिकाणी इंडोनेशियातील रामायणावर आधआरित रामलीला दाखवण्याची मागणी केली होती. इंडोनेशियातील शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अनीस बास्वेदन भारतात आले होते आणि त्यांनी भारतीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. त्यावेळी इंडोनेशियाला असे वाटते की, प्रत्येक वर्षाला कमीत कमी दोन वेळा भारतात आपली प्रचलित रामायणाचे भारतातील काही शहरात आयोजन केले जावे.