लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा वादाच्या भोव-यात अडकले आहेत. राहुल गांधी यांच्यावर यावेळी राजकीय व्यक्तींबरोबरच भारतीय उद्योग क्षेत्रातील मान्यवरही टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी चीनी बनावटीच्या एका ड्रोनची माहिती दिली आहे. भारतापेक्षा चीनी तंत्रज्ञान उत्तम असून भारतामध्ये नरेंद्र मोदी सरकार या प्रगत तंत्रज्ञानाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.(Rahul Gandhi)
सोबतच चीन, भारतापेक्षा खूप पुढे गेला आहे, आता आपल्यालाही भारतातच अशा तंत्रज्ञानाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे लागेल, असा सल्लाही दिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारत सध्या विकासाच्या मार्गावर आहे. येथील तंत्रज्ञानाला जगातून मान्यता मिळत आहे, मात्र ही प्रगती राहुल गांधी यांना दिसत नाही का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे. शिवाय भारतीय उद्योग क्षेत्रातूनही या व्हिडिओवर नापसंतीचा सूर आला आहे. इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी भारत पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे औद्योगिक केंद्र आहे, हे राहुल गांधी यांना माहित आहे का, असा प्रश्नच सोशल मिडियाच्या माध्यमातून विचारला आहे. (Rahul Gandhi)
सोबतच त्यांनी राहुल गांधी यांना भारताच्या प्रगतीचे पुरावेही दिले आहेत. भारत जागतिक स्तरावर दुसरा सर्वात मोठा स्टील उत्पादक, दुसरा सर्वात मोठा सिमेंट, तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल उत्पादक, सर्वात मोठा 2 वॅट उत्पादक असल्याचे पै यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. याशिवाय अन्य भारतीय उद्योजकांनाही राहुल गांधी यांच्या पोस्टवर नाराजी व्यक्त करुन भारतीय तंत्रज्ञानाची ओळख, राहुल गांधी यांनी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे. (Political News)
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी पुन्हा एकदा त्यांच्या चीनी प्रेमानं टिकेच्या भोव-यात सापडले आहेत. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असतांना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणावर प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी आपला मोबाईल दाखवत त्यांनी आम्ही चीनमध्ये बनवलेले उत्पादने वापरतो, असे सांगितले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ उठला होता. हा टिकेचा सूर कमी होतो न होतो तोच, राहुल गांधी यांच्यावर पुन्हा टीका करण्यात येत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी चीनी बनावटीचे ड्रोऩ सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांनी सोशल मिडियावर ड्रोनसह एक मोठा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी जो ड्रोन दाखवला आहे, तो चीनी बनावटीचा असल्याचे सांगून राहुल गांधी त्या ड्रोनमधील विशेष गोष्टी सांगत आहेत. शिवाय या ड्रोनचे तंत्रज्ञान भारतीय बनावटीच्या ड्रोनपेक्षा खूप प्रगत असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे. (Rahul Gandhi)
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी सांगत आहेत, रशिया-युक्रेन युद्धात या छोट्या ड्रोनमुळे मोठे रणगाडे नष्ट होत आहेत. ड्रोननं युद्धात क्रांती केली आहे. मात्र आपल्याकडे या गोष्टींवर लक्ष देण्यात आलेले नाही. शिवाय पंतप्रधान मोदी ‘टेलीप्रॉम्प्टर’ वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेवर भाषणे देतात, पण त्यांना ही गोष्ट समजत नसल्याची टिकाही त्यांनी पंतप्रधान मोदी यंच्यावर केली आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी चीनी तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे. भारताला मजबूत औद्योगिक व्यवस्थेची गरज आहे. भारतात प्रचंड प्रतिभा आहे. भारतीय तरुण या ड्रोनचे सर्व घटक बनवू शकतात. फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे, पण भारतीय सरकार या तरुणांना प्रोत्सहन देत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.(Political News)
==============
हे देखील वाचा : Saudi Arabia : सौदीत आणखी एक स्वप्नातील शहर
==============
राहुल गांधी यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर आला, आणि त्यांच्यावर एकच टीका चालू झाली. दरवेळी राहुल गांधी यांच्यावर भाजपा आणि मित्र पक्षातील नेते टीका करतात, मात्र यावेळी या नेत्यांसह राहुल गांधी यांना उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही भारतीय तंत्रज्ञान प्रगतीचा आरसा दाखवला आहे. इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी तर राहुल गांधी या व्हिडिओमध्ये कुठला ड्रोन वापरत आहेत, सदर ड्रोन भारतीय आहे की चीनी आहे, याचा तपासणी करा, असे आवाहन केले आहे. हा चीनी ड्रोन असेल, तर तो राहुल गांधी यांना कुणाच्या माध्यमातून मिळाला, हे तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय पै यांनी भारतामधील औद्योगिक प्रगतीचा आढावा घेत राहुल गांधी यांना “बनावट कथा” थांबवाव्यात असा खोचक सल्लाही दिला आहे. पै यांनी गेल्या दशकात भारताच्या उत्पादन क्षेत्रातील अनेक कामगिरीची यादी दिली. भारत जगात दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक, तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक आहे. गेल्या दहा वर्षात भारताची मोठी प्रगती झाली आहे, त्यामुळे बनावट कहाणी सादर करुन भारताला खाली खेचण्याचा प्रयत्न थांबवा, असाही सल्ला पै यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
सई बने…