Home » प्रॉपर्टीत भाडेकरुला ठेवण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

प्रॉपर्टीत भाडेकरुला ठेवण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

काही मोठ्या शहरात काहीजणांकडे जेव्हा गरजेपेक्षा अधिक घर किंवा दुकान असते तेव्हा ते भाड्याने देतात. असे केल्याने रिकाम्या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासह ती वापरली जाते.

by Team Gajawaja
0 comment
Property Gift Deed
Share

Property Renting Tips : काही मोठ्या शहरात काहीजणांकडे जेव्हा गरजेपेक्षा अधिक घर किंवा दुकान असते तेव्हा ते भाड्याने देतात. असे केल्याने रिकाम्या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासह ती वापरली जाते. याशिवाय कमाई करण्याचे हे एक माध्यम देखील आहे. पण तुम्हाला माहितेय का, एखाद्या प्रॉपर्टीमध्ये सातत्याने एक व्यक्ती भाड्याने राहत असल्यास तर 12 वर्षांनी त्यावर आपला हक्क असल्याचा दावा करू शकतो. खरंतर, हक्क मिळवण्याची प्रक्रिया फार कठीण आहे. पण तरीही तुमची प्रॉपर्टी वादाच्या कचाट्यात अडकू शकते. यामुळे काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही प्रॉपर्टीच्या वादाच्या स्थितीपासून दूर राहू शकता.

घर, बंगला किंवा जमीन अचल संपत्ती असल्याने ती कोणतीही चोरी करू शकत नाही. पण त्यावर आपला ताबा मिळवू शकतो. असे ज्यावेळी होते जेव्हा तुम्ही ती प्रॉपर्टी एखाद्याला भाड्याने देता. तुमची अशी संपत्ती ज्यावर एखादा व्यक्ती 12 वर्ष राहिल्यानंतर आपला त्या खोलीवर ताबा असल्याचा दावा करू शकतो. प्रॉपर्टीच्या अशा ताब्याला एडवर्स पोजेशन असे म्हटले जाते.

एडवर्स पोजेशन कसे काम करते?
ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत एखादा व्यकती 12 वर्षांपर्यंत प्रॉपर्टीवर एडवर्स पोजेशन ठेवत असल्यास काही नियमांसह तो खोलीवर दावा करू शकतो. कोर्ट देखील या प्रकरणी काही करू शकत नाही. अशातच ज्याच्या हातात प्रॉपर्टी आहे तो ती विक्री करू शकतो. यामुळे मालकाला आपल्या प्रॉपर्टीवर पाणी सोडावे लागू शकते. (Property Renting Tips)

या स्थितीपासून असे राहा दूर
एडवर्स पोझेशन शासकीय संपत्ती आणि काही नियमांवर लागू होत नाही. पण तुम्ही तुम्हाला एखाद्या खासगी संपत्तीला गमावू पाहत नसाल तर कोणतेही घर किंवा भाड्याने देण्याआधी रेंट अॅग्रीमेंट तयार करून घ्या. तुम्ही 11 महिन्यांसाठी अॅग्रीमेंट करत असाल तर पुढे वाढवायचे झाल्यास तरीही ते 11 महिन्यांसाठीच करा. अथवा वेळोवेळी तुम्ही दुसरा भाडेकरूही पाहू शकता.


आणखी वाचा :
भारताच्या स्कॉटलंडला पाहिलंत का ?
सौदी अरेबियामध्ये दारू पिण्याविरुद्ध कडक कायदे
घरात पैसा टिकत नाही? करा हे उपाय

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.