देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या आता देशाच्या नागरिकाची कमान सांभाळत आहेत. त्याचसोबत ३०० एकर जमिनीवर पसलेल्या खास इमारतीमध्ये काही बदल सुद्धा करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे राष्ट्रपती बदल्यानंतर येथील सचिवालयातील स्टाफ सुद्धा बदलतो. राष्ट्रपती भवनातील किचनमधील काही गोष्टींमध्ये सुद्धा बदल केला जातो. खासकरुन जेवणासाठी लागणाऱ्या सामग्रीमध्ये. हा बदल राष्ट्रपतींच्या खाण्यापिण्याची आवडीनुसार होतो. हे यावेळी सुद्धा झाले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का यंदाच्या राष्ट्रपतींच्या किचनमध्ये काय नवं खाद्यपदार्थ बनवले जात आहे? तर जाणून घेऊयात राष्ट्रपती भवनातील किचनचे प्रमुख कोण आहेत आणि त्याची काळजी कशाप्रकारे घेतली जाते त्याबद्दल अधिक.(President kitchen)
प्रत्येक नव्या राष्ट्रपतींसह येथील खाण्याच्या मेन्यूमध्ये त्यांच्या पसंदीच्या मसाल्यांचा वापर केला जातो. द्रौपदी मुर्मू यांना उडिया डिश पाखला अत्यंत आवडते. त्या शाकाहारी आहेत आणि आपल्या खाण्यात त्या कांदा-लहसूणच अजिबात वापर करत नाहीत. म्हणजेच त्या सात्विक खाणं खातात. अशातच राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी जे खाणं बनवले जाईल त्यामध्ये खुप बदल झालेला असेल. खरंतर पाखला भातापासून तयार होणारी अशी डिश आहे जी प्रत्येक उडिया व्यक्तीला आवडते. राष्ट्रपतीना साजन साग आणि आलू भर्ता सुद्धा खाण्यास आवडते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुद्धा शाकाहारी होते. दरम्यान, त्या आधीचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे खाण्याचे शौकिन होते. त्यांना मासे फार आवडायचे.
भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक बड्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात भोजनाचे आयोजन केले जाते. ही परंपरा दीर्घकाळापासून चालत आली आहे. परंतु खास बाब अशी की, ३४० खोल्या आणि तीन लाख स्क्वेअर मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या राष्ट्रपती भवनाचे किचन कसे असेल. कशा पद्धतीने पाहुण्यांसाठी जेवणाची तयारी केली जाते?
एडविन लुटियन यांच्या द्वारे जवळजवळ ९० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे भवन खासकरुन मोठे कार्यक्रम आणि भोजनाच्यावेळी साक्षीदार ठरते. येथे दोन किचन आहेत. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रपतींचे खासगी किचन आणि दुसरे म्हणजे राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खाण्यापिण्याची सोय करण्यासाठीचे किचन.
पहिले किचन हे लहान आहे पण दुसरे किचन फार मोठे आहे. जे आकार-प्रकार आणि स्टाफच्या क्षमतेनुसार पंचतारांकित हॉटेलमध्ये असणाऱ्या किचनला सुद्धा मात देते. ऐवढ्या मोठ्या किचनमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. सध्या मॉन्टी सैनी हे राष्ट्रपती भवनाच्या या किचनचे हेड आहेत. ते ४५ लोकांच्या किचन टीमला लीड करतात. काही काळापूर्वी जेव्हा फ्रांन्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांचे स्वागतासाठी भोजनाचे आयोजन केले होते तेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवनातील मेन्यूमधील खाद्यपदार्थांचे कौतुक केले होते.
हे देखील वाचा- प्रायव्हेट मेंबर बिल म्हणजे काय? संसदेत कशा प्रकारे सादर केले जाते
राष्ट्रपती भवनातील या किचनचे काही सेक्शन आहेत. त्यामध्ये मुख्य किचन, बेकर्स, हलवाई, कॉन्टिनेंटल आणि ट्रेनिंग एरियाचा समावेश आहे. हे पूर्णपणे वातानुकूलित आहे. याची स्वच्छता सुद्धा एक खास टीमकडून जाते. हेच किचन राष्ट्रपती भवनातील सर्व कार्यक्रम-सोहळे, बैठका, रिसेप्शन आणि कॉन्फ्रेंन्समध्ये खाण्यापिण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी सांभाळतात.
80 च्या दशकात स्वयंपाकघरांचे आधुनिकीकरण होऊ लागले
स्वातंत्र्यानंतर, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, सी राजगोपालाचार्य यांनी पाहुण्यांचे शानदारपणे स्वागत करण्याची परंपरा पुढे नेली. पण तोपर्यंत इथलं स्वयंपाकघर इंग्रजी पद्धतीचं होतं. भारताच्या राष्ट्रपतींनी येथे आपली जागा घेतल्यावर, त्यांनी त्यांच्या आवडीनुसार स्वयंपाकघरातील पदार्थांच्या मेनूमध्ये बदल केला.(President kitchen)
स्वयंपाकघर पूर्णपणे आधुनिक होऊ लागले. नव्वदच्या दशकात राष्ट्रपती भवनाच्या स्वयंपाकघराने पंचतारांकित हॉटेल्सच्या जेवणालाही टक्कर देण्यास सुरुवात केली. असे म्हणता येईल की,ते आजच्या फॉर्ममध्ये जगातील कोणत्याही सर्वोत्तम हॉटेलच्या किचनसोबत स्पर्धा करु शकतात. गेल्या काही दशकांमध्ये राष्ट्रपती भवनाच्या स्वयंपाकघर विभागानेही लोकांचे स्वागत करण्याची आणि जेवण देण्याची अनोखी शैली विकसित केली आहे.