देशभरात १ जुलै पासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टिक पासून तयार करण्यात येणारे इअर बड्स, प्लास्टिक फ्लॅग्स, कँन्डी स्टिक, प्लास्टिकच्या पिशव्या, कप, प्लास्टिकमध्ये असलेले पॅकेजिंग या सारख्या गोष्टींवर ही बंदी आहे. यामागे काही कारणं आहेत. मुख्य कारण असे की. सिंगल युज प्लास्टिकला अगदी सहजपणे नष्ट केले जात नाही. यामुळे प्रदुषण होते. त्याचसोबत पर्यावरणात विषारी रसायन जाऊन मिळतात जी व्यक्तींना आणि पशुंना सुद्धां हानिकारक ठरु शकतात.(Plastic Cafe)
पण हे तर प्लास्टिक बद्दल झाले. अशातच भारतातील एक रेस्टॉरंट आहे तेथे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे प्लास्टिक घेऊन जाता येते. या प्लास्टिकच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या आवडीचे जेवण मिळते. पण कसे शक्य आहे? याबद्दलच आपण आज अधिक जाणून घेऊयात भारतातील असे एक अनोखे रेस्टॉरंट जेथे तुम्हाला प्लास्टिक द्या आणि पोटभर जेवा ही कॉन्सेप्ट सुरु केल्याचे कळणार आहे.
जूनागढ येथील प्लास्टिक कॅफे
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्ट्सनुसार, गुजरात मधील जुनागढ येथे हे अनोखे प्लास्टिकचे कॅफे सुरु करण्यात आले आहे. त्याचे नाव प्राकृतिक प्लास्टिक कॅफे असे ठेवण्यात आले आहे. येथे देशभरातील प्लास्टिक संबंधित समस्येवर तोडगा काढण्यात आला आहे. येथे तुम्हाला प्लास्टिक द्यायचे आणि जेवण मिळवायचे आहे. म्हणजेच तुम्ही जे काही ऑर्डर कराल त्याचे पैसे मात्र द्यायचे नाही. त्याबदल्यात तुम्हाला ठरवण्यात आलेल्या मर्यादेपर्यंत प्लास्टिक द्यायचे आहे. या कॅफेची सुरुवात २० जुन रोजी करण्यात आली होती.
कसे काम करते हे कॅफे?
या कॅफेमध्ये लोक आपल्या घरातील प्लास्टिक घेऊन येतात. त्यानंतर लोकांनी आणलेल्या प्लास्टिकचे वजन केले जाते आणि त्यानुसार जेवण मिळते. म्हणजेच जेवढ्या अधिक वजनाचे प्लास्टिक तेवढी तुम्हाला अधिक खाणं मिळणार आहे. कॅफेमध्ये फक्त ऑर्गेनिक फळ-भाज्यांचा वापर केला जातो. त्याचसोबत सस्टेनेबल भांड्यामध्ये हे खाणं शिजवले जाते आणि वाढले ही जाते.(Plastic Cafe)
हे देखील वाचा- जगातील विचित्र रेस्टॉरंट! जेथे खाल्ल्यानंतर भींत चाटायला लावतात
सखी मंडळांच्या महिलांकडून चालवले जाते हे कॅफे
प्राकृतिक प्लास्टिक कॅफे हे सर्वोदय सखी मंडळांच्या महिलांकडून चालवले जाते. ही संस्था शेतकऱ्यांकडून थेट ऑर्गेनिक फळ-भाज्या खरेदी करतात. या व्यतिरिक्त प्रशासनाकडून कॅफेच्या उभारणीसाठी मदत करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार दिल्लीतील नजफगढ आणि छत्तीसगढ येथे सुद्धा अशाच प्रकारचे कॅफे आहे. जेथे प्लास्टिकचा कचरा देऊन खाणं खरेदी करता येते.