जर तुमच्या पीएफ खात्यात पैसे नसतील तर खाते बंद होते. त्याला निष्क्रिय पीएफ खाते असे म्हटले जाते. असे अशावेळी होते जेव्हा लोक निवृत्त होतात आणि त्याच्या पीएफ खात्यात पैसे जमा होत नाहीत. त्यानंतर याच खात्यावर व्याज मिळणे सुद्धा बंद होते. अशातच हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, तुमचे पीएफ खाते सुद्धा बंद झाले असेल तर त्यावर कोणत्या कालावधी पर्यंत व्याज मिळेल. तसेच किती वर्षानंतर व्याज मिळणे बंद होईल. या व्याजाच्या बद्दल माहिती घेणे फार महत्वाचे असते कारण ते टॅक्स फ्री असते. (PF Account Interest)
येथे समजून घेण्याची गोष्ट अशी की, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा पीएफ खात्यावरील व्याज मिळत राहते जरी पीएफचा पैसे जमा झाले असतील किंवा नसतील. मात्र हे नेहमीच असे होत नाही. असे समजा तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्ती होणार आहे पण त्याआधीच तुम्ही नोकरीवर राजीनामा दिला. त्याचसोबत राजीनाम्याच्या ३६ महिन्याच्या आतमध्ये पीएफ खात्यामधून पैसे काढलेले नाहीत तेव्हा तुमचे ईपीएफ खाते निष्क्रिय होईल. जेव्हा एकदा हे खाते निष्क्रिय होते किंवा बंद होते त्यावर व्याज मिळणे ही बंद होते.
कधी मिळत नाही व्याज
-जर कर्मचारी ५५ वर्षाचा झाल्यानंतर निवृत्त होत असेल आणि पुढील तीन वर्षात पीएफचे पैसे काढले जात नाही
-जर पीएफ मेंबर हा विदेशात निघून गेलाय आणि तेथेच राहतोय
-जर ईपीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीएफ खात्यावर व्याज दिले जात नाही
-वयाच्या ५८ व्या वर्षाआधीच नोकरीवरुन राजीनामा दिल्यास किंवा सेवानिवृत्ती घेतली, मात्र तीन वर्षापर्यंत पीएफ खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तर खाते बंद होते आणि व्याज ही मिळत नाही
हे देखील वाचा- लहान मुलांसाठी इंन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना ‘या’ काही गोष्टी ठेवा लक्षात
कधीपर्यंत मिळते टॅक्सवर सूट
निवृत्त होईपर्यंत किंवा सर्विस पूर्ण होई पर्यंत पीएफ खात्यात जमा झालेल्या रक्कमेवर कोणताही टॅक्स लागत नाही. मात्र तुम्ही नोकरीवरुन राजीनामा दिल्यास, निवृत्त झाल्यास, सर्विस पूर्ण झाल्यास तुमच्या ईपीएफ खात्याच्या व्याजावर टॅक्स लागण्यास सुरुवात होते. जर तुमचे ईपीएफ खाते निष्क्रिय किंवा बंद झाले असेल तर त्यामधील जमा रक्कम ही टॅक्सच्या अंतर्गत येते.(PF Account Interest)
जर ५ वर्ष सातत्याने नोकरीपूर्वी पीएफ खात्यातील पैसे काढले गेल्यास ईपीएफ मधील शिल्लक रक्कमेच्या व्याजावर टॅक्स लावला दातो. खरंतर ईपीएफ मेंबरशिप मिळण्याच्या सुरुवातीच्या ५ वर्षात एका पेक्षा अधिक संस्थांमध्ये काम केले जाते तर नोकरी नियमित असल्याचे मानले जाते. जर कर्मचारी गेल्या कंपनीचा ईपीएफ बॅलेंन्स सध्याच्या संस्थेमध्ये ट्रांन्सफर करु इच्छित असेल तर असे मानले जाते की, कर्मचाऱ्याने टॅक्सच्या उद्देशार्थ ५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सातत्याने सर्विस केली आहे. अशा स्थितीत पीएफ मधील शिल्लक रक्कमेवर टॅक्स लावला जात नाही.