Parenting Tips : कधीकधी पालकांच्या घरातील वागण्याचा मुलांवर अज्ञातपणे परिणाम होतो. यामुळे पालकांना कळले पाहिजे की, त्यांच्या चुका मुलं पाहून करू शकतात. अशातच पालकांनी अशा कोणत्या सवयी आहेत ज्या बदलल्या पाहिजेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….
अहंकारापासून दूर राहा
अहंकार अत्यंत वाईट गोष्ट आहे. यामुळे व्यक्तीच्या आयुष्याचा ऱ्हास होऊ शकतो. यामुळे लोक सेल्फीश होतात. आजूबाजूच्या गोष्टींचा त्यांना विसर पडतो. अशा व्यक्ती मुल आणि परिवाराप्रति अधिक काळजी घेत नाहीत. याचा परिणाम मुलांवर होतो. यामुळे पालकांनी अहंकारापासून दूर राहिले पाहिजे.
अधिक अपेक्षा न करणे
मुलांकडून अधिक अपेक्षा करू नका. यामुळे नेहमीच लक्षात ठेवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतो. प्रत्येक मुलाची एक स्वतंत्र ओखळ, आवड, कला-कौशल्य असतात. अशातच मुलांची आवड कशामध्ये आहे हे पालकांनी पाहावे.
तुलना करणे
काही पालक आपल्या मुलांची दुसऱ्या मुलांसोबत करतात. अशातच मुलांच्या मनात स्वत: बद्दलचा आत्मविश्वास कमी होतो. याचा परिणाम मुलांवर नकारात्मक होतो. मुलं स्वत: ला एकटी समजू लागतात आणि इतर चारचौघांमध्ये मिक्स होण्यासही घाबरतात. (Parenting Tips)
फूड खाण्यासाठी दबाव टाकणे
पालकच नेहमी जंक फूड खात असतील तर मुलही तेच खातील. यामुळे मुलांना हेल्दी राहण्यास शिकवायचे असल्यास तुम्ही स्वत:पासून हेल्दी फूड खाण्यास सुरूवात करा. याशिवाय कोणतेही फूड खाण्यासाठी मुलांवर दबाव टाकू नका. यामुळे मुलं चिडचिड करतात.
अधिक काळजी घेणे
काही पालक आपल्या मुलांप्रति अधिक काळजी घेतात. याचा परिणाम मुलांच्या विकासावर होतो. मुल मानसिक रुपात एखादे काम करण्यास स्वत: ला सक्षम मानत नाहीत. यामुळे काही गोष्टी मुलांना स्वत: हून शिकण्याची पालकांनी संधी दिली पाहिजे.