Home » आईच्या हत्येचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान परशुरामांनी स्थापन केले ‘हे’ शिवलिंग

आईच्या हत्येचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान परशुरामांनी स्थापन केले ‘हे’ शिवलिंग

by Team Gajawaja
0 comment
Parashurameshvara Temple
Share

श्रावण महिना सुरु होणार आहे. त्यामुळे या महिन्यात येणाऱा प्रत्येक सोमवार, प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीला विशेष महत्व आहे. या दरम्यान भगवान शंकरांच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशातच आम्ही तुम्हाला परशुरामेश्वर पुरामहादेव मंदिराबद्दल सांगणार आहोत, जे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याजवळ आहे. या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी श्रावण महिन्यात मोठी गर्दी सुद्धा होते. प्रत्येक महिन्यात येथे चार दिवसांच्या मेळ्याचे आयोजन केले जाते. याला कावड मेळा असे म्हटले जाते. या दरम्यान लाखोंच्या संख्येने कावड घेऊन येणारे हरिद्वार येथून अनवाणी चालत येत गंगेचे पाणी घेऊन येतात. त्यानंतर महादेवावर जलाभिषेक करतात. परंतु आईच्या हत्येचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान परशुरामांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्याबद्दलच अधिक जाणून घेऊयात.(Parashurameshvara Temple)

परशुरामांनी केली होती या शिवलिंगाची स्थापना
महादेांचे हे मंदिर बागपत जिल्ह्यातील मुख्यालयापासून २५ किली दूर पुरा गावात हिंडन नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणी ऋषी जमदग्नि हे आपली पत्नी रेणुका हिच्यासोबत राहत होते. तर परशुरामांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेवरुन आपली आई रेणूका हिचे धड शिरापासून वेगळे केले होते. त्यानंतर या पश्चातापाचे प्रायश्चित करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली होती. येथे त्यांनी घोर तपस्या केली होती. परशुरामांच्या तपाला प्रसन्न होत शंकरांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांच्या आईला पुन्हा जीवंत केले. तसेच भगवान शंकरांनी परशुरामांना एक कुऱ्हाड सुद्धा दिली, त्याने त्यांनी २१ वेळा क्षत्रियांचा संहार केला होता. पुरा नामक ठिकाण आणि परशुरांनी या ठिकाणी शंकराची पिंडी स्थापन केलेल्या या मंदिराला परशुरामेश्वर पुरा महादेव मंदिराच्या नावाने ओळले जाते.

Parashurameshvara Temple
Parashurameshvara Temple

महाराणीने केले होती मंदिराची उभारणी
कालांतराने ते ठिकाण एका खंडहर झाले आणि शंकराची पिंड सुद्धा त्यामध्ये पुरली गेली. असे म्हटले जाते की, एकदा लणडोराची राणी फिरण्यासाठी निघाली होते. तेव्हा तिचा हत्ती तेथेच थांबला होता. खुप प्रयत्न केले तरीही तो पुढे जायलाच तयार होत नव्हता. यावर राणीला फार मोठे आश्चर्य वाटले आणि तिने त्या ठिकाणी खोदकाम करण्याचे आदेश दिले. जेव्हा तेथे खोदकाम सुरु केले तेव्हा तेथे शंकराची पिंडी मिळाली. त्यानंतर महाराणीने तेथे भव्य मंदिराची उभारणी केली.(Parashurameshvara Temple)

हे देखील वाचा- गटारी नव्हे , ही आहे दिव्याची अमावास्या… 

आज सुद्धा हे मंदिर भाविकांचे मोठे श्रद्धा स्थान आहे. प्रत्येक वर्षी श्रावणातील शिवरात्रीच्या वेळी येथे चार दिवस कावड मेळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी कावड मेळा २५ जुलै पासून सुरु झाला असून तो २८ जुलै पर्यंत असणार आहे. या दरम्यान, कावड घेऊन येणाऱ्यांची फार मोठी गर्दी होते. त्यासाठी प्रशासनाकडून फार मोठी व्यवस्था ही केली जाते. कोरोनानंतर पहिल्यांदाच बागपत येथे संपूर्ण मंदिरात मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच जवळजवळ ३० लाख भाविक येण्याची अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, या मंदिराबद्दल असे ही म्हटले जाते की तुम्ही जी काही इच्छा येथे व्यक्त करता ती पूर्ण होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.