बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना आजारपण येते. अशातच लहान मुलांना ताप आल्यानंतर त्यांची अधिक चिडचिड करतात आणि ते रडतात. लहान मुलांमध्ये अशावेळी थकवा, भूक कमी लागणे, उलटी होणे आमि डिहाइड्रेशन सारखी लक्षण दिसून येतात. अशातच काही जण लहान मुलांना ताप आल्यानंतर पॅरासिटामोल औषध देणे योग्य मानतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलांना पॅरासिटामोल (Paracetamol) देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? जाणून घेऊयात त्याचबद्दल अधिक.
पॅरासिटामोल काय आहे?
एनएचएसच्या मते, पॅरासिटामोल एक औषध असून जी डोकेदुखी, पोटदुखी आणि तापासून दिलासा देते. पॅरासिटामोल एक सामान्य औषध आहे, मात्र मुलांमधील ताप कमी करण्यासाठी याचा अधिक वापर करु नये. असे केल्याने लहान मुलांच्या आरोग्याला नुकसान पोहचू शकते.
पॅरासिटामोल देण्यापूर्वी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
-डॉक्टरचा सल्ला
मुलांना पॅरासिटामोल देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या. असे केल्याने तुम्ही वजन आणि वयाच्या हिशोबाने मुलाला योग्य प्रमाणात औषध देऊ शकतात.
-योग्य प्रमाणात द्या
जर औषध दिल्यानंतर सुद्धा ताप उतरत नसेल तर काही लोक अधिक प्रमाणात पॅरासिटामोल देतात. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे असे करण्यापासून दूरच रहा,
-तापमान तपासून पहा
जर तुम्ही मुलाला ओरल ड्रग देत असाल तर मुलाचे तापमान किती आहे ते तपासून पहा. जर तापमान १०० डिग्री फारेनहाइटपेक्षा अधिक आहे तरच पॅरासिटामोल द्या.
-ओव्हरडोस देण्यापासून दूर रहा
जर मुलं दोन औषध एकत्रित घेत असेल तर त्याबद्दल डॉक्टरचा सल्ला घ्या. काही वेळेस खोकला सर्दीच्या औषधांमध्ये सुद्धा पॅरासिटामोलचा डोस असतो. अशातच मुलांना पॅरासिटामोलचा ओव्हरडोस देण्यापासून दूर रहा.(Paracetamol)
-वजनानुसार डोस
पॅरासिटामोलचे प्रमाण हे मुलाच्या वजनावर निर्भर करते. जर तुमच्या मुलाचे वजन ५ किंवा त्यापेक्षा कमी असेल तर पॅकेजिंगवर दिलेल्या सुचनेनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या.
-उगाचच देऊ नका
पॅरासिटामोलचा वापर केवळ तापासाठी नव्हेच तर दुखण्यासाठी केला जातो. जर मुलाला ताप असेल तर मात्र त्याला ती झेपत नसेल तर उगाचच देणे टाळा.
-कधी पर्यंत द्याल
जर ३ दिवस पॅरासिटामोल देऊन सुद्धा ताप कमी होत नसेल तर लगेच डॉक्टरांकडे जा. असे असू शकते की, कोणतेही संक्रमण झाले असेल तर त्यावर लगेच उपचार करता येऊ शकतात.