Overeating Risk : जेवल्यानंतरही तुम्हाला भूक लागते का? अथवा दिवसभर पोटभर खाल्ले तरीही भूक लागल्यासारखे वाटते? कधीकधी असे वाटणे सर्वसामान्य बाब आहे. पण दररोज सातत्याने भूक लागत असल्यास वेळीच लक्ष दिले पाहिजे. कारण वारंवार भूक लागण्यामागे काही कारणे असू शकतात. यापैकीच एक कारण म्हणजे एखाद्या आजार उद्भवण्याची शक्यता असू शकते.
वारंवार भूक लागण्यामागील कारणे
मधुमेह
वारंवार भूक लागण्यामागील कारण टाइप 2 मधुमेह असू शकतो. यामुळे रक्तातील ग्लूकोज पूर्णपणे शरिरात फैलावत नाही आणि वारंवार भूक लागते. यामुळे दररोज सातत्याने अधिक भूक लागल्याची स्थिती उद्भवत असल्यास डॉक्टरांना तातडीने भेटा.
तणाव
अत्याधिक तणावामुळे अधिक भूक लागू शकते. तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होते. यावेळी शरिरात काही हार्मोन्स रिलीज होतात, जे तुमची भूक वाढवतात. अशातच सतत खाण्याची इच्छा होत राहते. यामुळे तणावाखाली असताना अत्याधिक प्रमाणात खाण्याच्या सवयीपासून दूर रहावे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
अधिक व्यायाम करणे
जी लोक अधिक व्यायाम करतात त्यांना वारंवार भूक लागते. खरंतर, अधिक व्यायाम केल्याने कॅलरीजही अधिक खर्च होतात. यामुळेच सतत भूक लागते. याशिवाय अधिक वेळ व्यायाम केल्याने शरिरातील मेटाबॉलिज्मचा वेग वाढला जातो आणि पचनक्रिया सुधारली जाते.
रिफाइंड कार्बोहाइड्रेट
रिफाइंड कार्बोहाइड्रेटच्या सेवनाने भूक वाढली जाते. मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास भूक अधिक वाढली जाते. खरंतर मैद्यापासून तयार करण्यास आलेल्या पदार्थांमध्ये फायबर, व्हिटमिन आणि मिनिरल्स फार कमी असतात. यामुळे खाल्लेले पदार्थ लगेच पचतात आणि भूक लागते. (Overeating Risk)
अपूर्ण झोप
झोपेसंबंधित समस्या असल्यास सातत्याने भूक लागू शकते. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा संपूर्ण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यावेळी झोप पूर्ण होत नाही तेव्हा सतत काहीतरी खाण्याचे मन करते. ही सवय वेळीच सुधारली पाहिजे. अन्यथा आरोग्यासंबंधित काही गंभीर समस्या उद्भवू शकतात.