Home » NPS च्या नियमांत बदल, पैसे काढण्यापूर्वी करावे लागणार ‘हे’ काम

NPS च्या नियमांत बदल, पैसे काढण्यापूर्वी करावे लागणार ‘हे’ काम

नॅशनल पेंन्शन स्किम मधून पैसे काढणे किंवा ती बंद करण्यासाठीच्या काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. पेंन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने फंड विड्रॉल आणि स्किममधून एक्झिट करण्यासाठी इंस्टेंट बँक अकाउंट वेरिफिकेशन करणे अनिवार्य केले आहे.

by Team Gajawaja
0 comment
NPS Rules
Share

नॅशनल पेंन्शन स्किम मधून पैसे काढणे किंवा ती बंद करण्यासाठीच्या काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. पेंन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने फंड विड्रॉल आणि स्किममधून एक्झिट करण्यासाठी इंस्टेंट बँक अकाउंट वेरिफिकेशन करणे अनिवार्य केले आहे. या बदलावाच्या कारणास्तव PFRDA हे सुनिश्चत करणार आहे की, ग्राहकांच्या खात्यात कोणत्या वेळी पैसे काढण्याची रक्कम जमा होईल. (NPS Rules)

या नियमांअंतर्गत ग्राहकांच्या बँक खात्याचे वेरिफिकेशन पेनी ड्रॉप मेथडच्या माध्यमातून केले जाणार आहे. ईटीच्या रिपोर्ट्सनुसार या संबंधित PFRDA च्या 25 ऑक्टोंबरच्या सर्कुलेशननुसार वेरिफिकेशन प्रोसेससाठी नाव मॅच करणे, विड्रॉवल आणि विड्रॉल रिक्वेस्ट गरजेचे आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांच्या बँक खात्याचा तपशील बदलण्यासाठी पेनी ड्रॉप वेरिफिकेशन अनिवार्य रुपात यशस्वी झाले पाहिजे.

नियमात झाले असे बदल
पेंन्शन रेग्युलेटरी अथॉरिटीने स्पष्ट केले आहे की. जर CRA पेनी ड्रॉपच्या वेरिफिकेशनमध्ये अयशस्वी झाल्यास तर एनपीएस मधून एक्झिट किंवा पैसे विड्रॉल, ग्राहकांच्या बँक खात्याच्या डेटामध्ये बदलासंबंधित कोणताही अर्ज स्विकार केला जाणार नाही.

पेनी ड्रॉप फेलियर प्रकरणी संबंधित नोडल ऑफिससह एका निर्धारित प्रोसेस अंतर्गत ग्राहकाच्या बँक अकाउंटच्या डिटेल्स बद्दल निर्णय घेतली. तर CRA पेनी ड्रॉप सक्सेसफूल न झाल्यास ग्राहकाला त्याच्या मोबाईल क्रमांकावर आणि ईमेवर सूचना दिली जाईल.

NPS मधून एक्झिट करण्यासाठीचे नियम
PFRDA च्या नियमांनुसार जर एनपीएस मध्ये सब्सक्राइबर द्वारे जमा करण्यात आलेली रक्क आणि व्याज एकूण मिळून पाच लाखांपेक्षा कमी असेल तर सर्व रक्कम काढता येऊ शकते. मात्र त्यापेक्षा अधिक असेल तर 40 टक्के पेंन्शनसाठी ठेवली जाईल आणि अन्य 60 टक्के रक्कम एकत्रित काढता येऊ शकते. (NPS Rules)

एनपीएस खाते कोण सुरु करू शकते?
एनपीएस खाते सुरु करण्यासाठी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. त्याचसोबत तुमचे वय 18-70 वर्षे असणे गरजेचे असून केवायसीच्या काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.या स्किममध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंथली पेंन्शनची सुविधा नागरिकाला मिळते. हे खाते तुम्ही तुमच्या नावे अथवा पत्नीच्या नावाने सुद्धा सुरू करू शकता.

या व्यतिरिक्त खासगी नोकरी करणारी व्यक्ती सुद्धा एनपीएस खाते सुरु करून अतिरिक्त टॅक्सचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये केंद्रीय कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी, प्रायव्हेट सेक्टरचे कर्मचारी आणि सामान्य नागरिक खाते सुरु करू शकतात. तुम्ही घरबसल्या ही खाते सुरु करू शकता. एनपीएसला पेंन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण कडून चालवले जाते. त्यामुळे ही गुंतवणूक अगदी सुरक्षित आहे.


हेही वाचा- आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे हे असे शोधून काढा


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.