नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. या महिन्यात बहुतांश पुरुष मंडळी आपले केस किंवा दाढी कापत नाहीत. जर तुम्ही त्यांना यामागील कारण विचारल्यास ते म्हणतील नो शेव नोव्हेंबर (No Shave November) सुरुयं. पण मजेशीर गोष्ट अशी की, काही लोक अशी सुद्धा आहेत जे ट्रेंन्ड नुसार नो शेव नोव्हेंबर सेलिब्रेट करतात. मात्र त्यामागील नेमके कारण काय हे त्यांना माहिती नसते. तर नो शेव नोव्हेंबर (No Shave November) साजरा करण्याबद्दलचा नक्की उद्देश काय या संदर्भात आपण आज जाणून घेऊयात.
कशी झाली या कॅम्पेनची सुरुवात?
खरंतर No Shave November हे एक कॅम्पेन कॅन्सरच्या विरोधात चालवले जाते. या कॅम्पेनला खासकरुन प्रोस्टेट कॅन्सरच्या प्रति जागृकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरु केले होता. कारण पुरुषांमध्ये होणारा हा कॅन्सर आहे. वर्ष २००७ मध्ये अमेरिकेतील शिकागो मध्ये राहणाऱअया मैथ्यू हिल याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या आठ मुलांनी कॅन्सर प्रति जागृकता निर्माण करण्यासाठी या कॅम्पेनची सुरुवात केली होती.वर्ष २००९ मध्ये त्या लोकांनी मिळून ‘मैथ्यू हिल फाउंडेशन’ नावाची संस्था सुरु केली. या कॅम्पेनच्या माध्यमातून कॅन्सरसंदर्भात जागृकता आणि कॅन्सर पीडितांची मदत केली जाते.
या कॅम्पेनच्या माध्यमातून केली जाते कॅन्सरशी झुंज देणाऱ्यांची मदत
नोव्हेंबर महिन्यात केस किंवा दाढी करण्याचा जो काही खर्च वाचवला जातो आणि तो मैथ्यू हिल फाउंडेशनला दान म्हणून दिला जातो. या संस्थेला मिळालेल्या दानाची रक्कम ही अशा संस्थांना दिली जाते जे कॅन्सरपासून बचाव, उपचार किंवा शोध आणि जागृकतेसाठी काम करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हळूहळू No Shave November ची कॉन्सेप्ट जगभरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र तरीही बहुतांश जणांना यामागील खरं कारण माहिती नाही.
हे देखील वाचा- लग्नात वधूला रडावेच लागते! नाहीतर उडवली जाते खिल्ली, ‘या’ गावाची आहे अचब प्रथा
मोवेंबर असे सुद्धा एक कॅम्पेन
नो शेव नोव्हेंबर प्रमाणेच मोवेंबर नावाचे सुद्धा एक कॅम्पेन चालवले जाते. ते २००४ मध्ये सुरु करण्यात आले होतो. मिशी आणि नोव्हेंबर हा शब्द मिळून मोवेंबर असे या कॅम्पनचे नाव ठेवण्यात आले होते. मोवेंबर कॅम्पेन अंतर्गत पुरुषांचे आरोग्य आणि त्यांच्या लाइफस्टाइल बद्दल जागृकता निर्माण केली जाते. यामध्ये लोक आपली मिशी वाढवून कॅम्पेनला पाठिंबा देतात.