फोटोग्राफीच्या जगात निकॉन एक प्रसिद्ध नाव आहे. निकॉन ही एक अशी कंपनी आहे जे विविध प्रकारचे कॅमेरे घेऊन येतात. दरम्यान, कंपनीला फार मोठा फटका सुद्धा सहन करावा लागला होता. विरोधक कंपनी कॅनन आणि मिनॉल्ट यांच्याकडून त्यांना मोठी टक्कर मिळाली होती. मात्र कंपनीची एक रणनिती कामी आली आणि मार्केटमध्ये ती टिकली. तर जाणून घेऊयात निकॉन कंपनीच्या यशाबद्दलच्या प्रवासासंदर्भात अधिक.(Nikon Success Story)
निकॉनची सुरुवात २५ जुलै १९१७ मध्ये कोयाटा ईवास्की यांनी सुरु केली होती. सुरुवातीच्या काळात कंपनीचे नाव ऑप्टिकल इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेड असे ठेवण्यात आले होते. परंतु १९९८ मध्ये त्याचे नाव बदलून निकॉन असे ठेवले गेले,
महायुद्धाच्या दरम्यान जेव्हा दुसऱ्या कंपन्या डबघाईला जात असताना त्यांनी स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा निकॉन अधिक वेगाने पुढे जात होता. दुसऱ्या महायुद्धात कंपनीच्या व्यवसायाने वेग पकडला होता. हेच कारण होते की, युद्धादरम्यान अशा काही गोष्टींची मागणी वाढली ज्यामुळे युद्ध जिंकण्यास मदत मिळाली. मागणी वाढत असल्याचे पाहता कंपनीने पेरिस्कोप, बॉम्ब साइट्स, लेंन्स आणि बायनॉकुरचा सप्लाय करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान कंपनीचा व्यवसाय ऐवढा वाढला गेला की, फॅक्ट्रीची संख्या वाढून १९ वर आली होती आणि कर्मचाऱ्यांचा आकडा २३ हजारांच्या पार गेला होता.
युद्धानंतर कंपनीने सिंगल लेंन्स रिफ्लेक्स कॅमेरा उतरवला. तो वेगाने प्रसिद्ध झाला आणि मित्सुबशीकडून त्यांना आर्थिक मदत मिळाली. पुढील काही वर्ष कंपनीसाठी फार कठीण होती. जापानमध्ये भुंकप आला होता. प्रोडक्शनवर त्याचा परिणाम झाला होता. कंपनीला फार मोठे नुकसान झाले होते. निकॉनने पुन्हा त्याच वेगाने कंपनीला पुढे नेण्याची रणनिती आखली.
कंपनीला पुन्हा एकदा वेगाने नेण्यासाठी त्यांनी हाय क्वालिटी कॅमेरे आणले. हे असे कॅमेरे होते जे खास रुपात सुरुवातीला फोटोग्राफी ते एक्सपर्ट पर्यंतच्या लोकांसाठी कामी आले. यामध्ये काही लेन्स, सनग्लासेज आणि आयग्लास फ्रेमचा वापर केला गेला होता.
अशा प्रकारे हे प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर निकॉनची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख बनली. कंपनीने व्यवसाय वाढवण्यासाठी काही नवे प्रोडक्ट्स ही तयार करण्यास सुरुवात केली. ८० च्या दशकात सेमीकंडक्टरची निर्मिती सुरु झाली. त्याचसोबत कलर फिल्म स्कॅनर आणि कलर प्रिंटर सुद्धा लॉन्च केले गेले.(Nikon Success Story)
हेही वाचा: २० लाख रुपये आणि ११ लोकांसह सुरु झाली होती एसर कंपनी
दरम्यान, सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठीची कल्पना यशस्वी ठरली नाही. कंपनीला फार मोठा झटका लागला. १९९८ मध्ये आर्थिक नुकसान झाला. ऐवढेच नाही तर जगात त्यावेळी आर्थिक मंदी सुरु होती आणि याचा परिणाम सुद्धा त्यावर झाला. यापासून शिकवण घेत निकॉनने कॅमेऱ्यावर पुन्हा फोकस केला आणि याच्या नव्या तंत्रज्ञानासह सादर करण्यास सुरुवात केली होती. अशातच कंपनीने पुन्हा वेग पकडली. निकॉनने सीएसआरसाठी काम केले. स्कॉलरशिप प्रोग्राम सुरु केले. स्कॉलरशिप प्रोग्राम सुरु केले. पुरस्थिती परिसरात पुन्हा निर्मिती करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली आणि पर्यावरणासंबंधित काही प्रोजेक्ट्स सुरु केले.