जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधत प्रसिद्ध हॉलिवूड गायक निक जोनास यान त्याला असणा-या मधुमेहाच्या (Diabetes)आजाराबाबत सोशल मिडीयावर पोस्ट जाहीर करुन काळजी घेण्याच आवाहन केल आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि अमेरिकन गायक निक जोनास देखील मधुमेहाच्या समस्येतून जात आहे. निक जोनासने मधुमेहाची सुरुवातीची 4 लक्षणे सांगितली असून या आजाराबाबत वेळीच सावधानता बाळगावी, असे आवाहन आपल्या चाहत्यांना केले आहे. मधुमेह या आजाराने जागतिक पातळीवर चिंता वाढवली आहे. कोरोनानंतर तर मधुमेहाच्या(Diabetes) रुग्णामध्ये झपाट्यानं वाढ झाल्यानं ही चिंता अधिक वाढली आहे. अगदी वृद्धच नाही तर तरुणांनाही या समस्येने ग्रासले आहे. मधुमेहामुळे शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. जागतिक मधुमेहाच्या दिनी निक जोनासन तो मधुमेहग्रस्त असल्याचे जाहीर करतानाच या रोगाच्या विळख्यापासून वाचवण्यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
सर फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या जन्मदिनी जागतिक मधुमेह दिन असतो. सर फ्रेडरिक बॅंटिंग यांनी इन्सुलिन हार्मोनचा शोध लावला.चार्ल्स हर्बर्टने त्यांना या कामात मदत केली होती. जागतिक मधुमेह दिनाची सुरुवात सर्वप्रथम इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनने केली. सन 1991 पासून, संपूर्ण जगभरात तो साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली. मधुमेहाची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा परिणाम कमी करण्यासाठी हे पहिले पाऊल उचलण्यात आले. याच मधुमेहांनं आता चांगलेच हातपाय पसरले आहेत. मधुमेहामुळे(Diabetes) केवळ सामान्य लोकच नाही तर अनेक सेलिब्रिटीही या समस्येतून जात आहेत. निक जोनास त्यापैकीच एक. अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती असलेल्या निकला केवळ 13 वर्षांचे असताना मधुमेहाचा त्रास जाणवू लागला. त्यापासून निक मधुमेहानं त्रस्त असून त्याच्यावर उपाचार चालू आहे. भारतात तर मधुमेहांनं त्रस्त असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, प्रत्येक घरात एक मधुमेहाचा रुग्ण आढळतो.
WHO च्या अहवालानुसार 1980 मध्ये जगात मधुमेहाचे 108 दशलक्ष रुग्ण होते. परंतु 2014 मध्ये ही संख्या 422 दशलक्ष झाली. तेव्हापासून मधुमेहाच्या(Diabetes) रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मधुमेहामुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. पण मधुमेहानं मृत्यूही होऊ शकतो. 2019 मध्ये 2 दशलक्ष लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे झाला. कारण मधुमेहाचा पहिला परिणाम किडणीवर होतो. किडणीचा त्रास जाणवत असताना मधुमेह झाला तर याचा घातक परिणाम शरीरावर होतो. तसेच मधुमेहामुळे अनेकदा अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आदीं शारिरिक समस्याही जाणवू शकतात.
==========
हे देखील वाचा : Vegan Food च्या नावाखाली कच्चे शाकाहारी भोजन आरोग्यासाठी धोकादायक?
==========
भारतासाठी मधुमेह (Diabetes)म्हणजे धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात येते. कारण मधुमेहाच्या रुग्णांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीननंतर भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 77 दशलक्ष लोक मधुमेहाने त्रस्त आहेत आणि यामध्ये 12.1 दशलक्ष लोक 65 वर्षांपेक्षा कमी आहेत. या आकड्यांवरुन 2045 पर्यंत हा आकडा 27 दशलक्ष पार करेल, असे सांगण्यात येते. भारतात पुरुष आणि महिलांमध्ये मधुमेहाचा फैलाव सम प्रमाणात झाला आहे. काही वर्षापर्यंत मधुमेह वयाची पन्नाशी पार केल्यावर होत असे. मात्र अलिकडच्या काही वर्षात मधुमेह तरुण वर्गालाही त्रस्त करीत आहे.
त्यामुळेच आता मधुमेहाबाबत(Diabetes) सरकारी पातळीवरही अधिक जागरुकता घेण्यात येत आहे. यावर्षी मधुमेह दिनाचे औचित्य साधत मधुमेहाचे घातक परिणाम किती आहेत, आणि त्यापासून कसा बचाव होऊ शकतो याची माहिती होण्यासाठी शालेय पातळीवर प्रयत्न करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मधुमेहाप्रती सावधानता बाळगताना पहिला भाग येतो तो भोजनाचा. रोजच्या आहारात अगदी थोडीशी काळजी घेतली तरी मधुमेहाला आपण लांब ठेवू शकतो, याचीच माहिती या सर्वादरम्यान देण्यात येणार आहे.
दरम्यान मधुमेहाचे(Diabetes) प्रमाण कोरोनाची लाट आली त्यानंतर अचानक वाढले. मात्र यामुळे घाबरण्यापेक्षा रोजच्या आहारात आवश्यक असलेली काळजी घेतली तर मधुमेह कधीच होऊ शकत नाही. थोडा व्यायाम आणि पोषक जेवण आपल्याला उत्तम आरोग्य देऊ शकते. मधुमेह ज्यांना आहे, त्यांनी रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही अशा आहाराचे सेवन करावे. यात फळांचा मोठा वाटा आहे. फळांमध्ये असलेले फायबर्स पचनशक्ती वाढवतात आणि मधुमेहाला दूर ठेवतात. फळांमध्ये टरबूज, अननस, आंबा, चिकू आणि केळी ही फळे मात्र खाऊ नये असे आवाहन करण्यात येते. अननसाच्या अति सेवनाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. 100 ग्रॅम आंब्यामध्ये सुमारे 14 ग्रॅम साखर असते. केळ्यामध्ये साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. चिकूमध्येही गोडाचे प्रमाण अधिक असल्यानं या पाच फळांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येते. मधुमेहापासून दूर राहण्यासाठी पोषक आहार आणि योग्य व्यायाम हा कायमस्वरुपी उपाय आहे. यामुळेच मधुमेहासारख्या घातक रोगाला कायमस्वरुपी दूर ठेवता येऊ शकते.
सई बने