२८ फेब्रुवारीचा दिवस इतिहासात प्रिझम इफेक्टच्या शोधात लिहिला गेला. १९८६ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या दिवसाला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. हे वर्ष अधिक खास आहे. भारताला जी-२० च्या अध्यक्षता मिळल्यानंतर हे वर्ष आता ग्लोबल साइंस फॉर ग्लोबल वेलबींगच्या रुपात साजरा केला जात आहे. प्रिझम इफेक्टचा शोध लावणारे डॉ. सीवी रमन यांना १९३० मध्ये या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाला. हा विज्ञात क्षेत्रात भारताला मिळणारा पहिला नोबेल पुरस्कार होता. त्यांचा शोध काही दृष्टीने फार महत्वाचा आहे. आज ही जगभरातील काही लॅब्समध्ये याच शोधाचा वापर केला जात आहे.(National Science Day)
कसा लागला शोध?
डॉ. सीवी रमन यांनी याची शोध एका प्रवासादरम्यान केली होती. १९२१ मध्ये ते पाण्याच्या जहाजाने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्रिटेनला जात होते. त्यांचे लक्ष पाण्याच्या निळ्या रंगावर पडली. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न उपस्थितीत राहिला की, आकाश आणि पाण्याचा रंग निळाच का असतो? प्रवासावरुन परतताना त्यांनी काही उपकरण आपल्यासोबत आणली. या उपकरणांच्या मदतीने समुद्र आणि आसपासचे रंग समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाहिले की, जेव्हा सुर्याची किरणे एखाद्या पारदर्शी गोष्टीवरुन जातात तेव्हा त्याचा काही हिस्सा वेगळा होतो आणि त्यामुळेच समुद्राचा रंग निळा दिसतो. प्रकाशाचे रंग विस्तारणे आणि दुभंगण्याच्या प्रभावाला प्रिझम इफेक्ट नावाने ओळखले गेले.
आंतराळाच्या मिशनमध्ये प्रिझम स्पेक्ट्रोस्कोपीची कमाल
आज ही वैज्ञानिक प्रिझम इफेक्टचा वापर काही क्षेत्रांमध्ये करतात. जेव्हा भारताकडून आंतराळ मिशन चंद्रयानने चंद्रावर पाणी असल्याची घोषणा केली तेव्हा याच्या मागे प्रिझम स्पेक्ट्रोस्कोपीचा कमाल होता. फॉरेंसिक सायन्ससह काही क्षेत्रांमध्ये प्रिझम इफेक्टचा वापर केला जात आहे. काही वैज्ञानिकांनी प्रिझम इफेक्टच्या आधारावर नवे शोध ही लावले. (National Science Day)
सर चंद्रशेखर वेंकट रमन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तमिळनाडू मधील तिरुचिरापल्ली मध्ये झाला होता. त्यांचे वडिल चंद्रशेखर मॅथ्स आणि फिजिक्सचे लेक्चरर होते. येथूनच त्यांना विज्ञानाला समजण्याची प्रेरणा मिळाली. बालपणापासूनच त्यांचे मन विज्ञान आणि त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी आयएएसची परिक्षा दिली आणि प्रथम स्थान मिळवले. ६ मे १९०७ रोजी त्रिलोकसुंदरी यांच्यांसोबत त्यांचा विवाह झाला.
हे देखील वाचा- कागद नव्हे तर ‘या’ गोष्टीपासून तयार केल्या जातात भारतीय नोटा
विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांनी शासकीय नोकरी सोडली आणि १९१७ मध्ये कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्सच्या प्रोफेसरच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. शिक्षकाच्या रुपातच त्यांनी कलकत्ताच्या इंडियन एसोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स मध्ये आपला रिसर्च सुरु ठेवला आणि एसोसिएशन मध्ये स्कॉलर झाले. त्यांनी आपला रिसर्च असाच पुढे सुरु ठेवला.