तबब्ल ५० वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्रावर माणसाला पाठवण्याची तयारी आपल्या पहिल्या टप्प्यात पार पडली आहे. अमेरिकेतील स्पेस एजेंसी नासाने नुकत्याच आपला प्रोजेक्ट आर्टेमिस-१ लॉन्च केला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून नासाने फ्लोरिडातील केप केनवरल येथून आतापर्यंतचे सर्वाधिक मोठे रॉकेट लॉन्च केले आहे. ओरियन नावाच्या या आंतराळात कोणताही व्यक्ती नाही. पण नासाचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास तर व्यक्तीला सुद्धा अशाच पद्धतीने यानाच्या माध्यमातून चंद्राच्या धरतीवर पाठवले जाईल. नासासाठी हे मिशन अगदी आव्हानात्मक होतो. पण तिसऱ्या प्रयत्नात मात्र यश मिळाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता मात्र तांत्रिक कारणास्तव ते रद्द करावे लागले होते. (NASA Artemis)
या कारणास्तव आर्टेमिस असे नाव ठेवले
नासाने आपल्या मून मिशनचे नाव आर्टेमिस ठेवले आहे. ग्रीक लोककथांमध्ये आर्टेमिसला अपोलोची जुळी बहिण असल्याचे सांगण्यात आले होते. डिसेंबर मध्ये अपोलो १७ मिशनला ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. ही अखेरची संधी होती जेव्हा मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवले होते. १९७२ मध्ये अपोलो मिशन दरम्यान जेव्हा आंतराळवीर जिन सरनेन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते तेव्हा असे वाटले होते की, आता चंद्रावर पुन्हा परतण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. पण ५० वर्ष लागली. या वर्षात काही आव्हाने सुद्धा समोर आली. काही आव्हानांवर तोडगा ही काढला गेला आणि काहींची अद्याप उत्तरे मिळणे शिल्लक आहे. आता नासा या दिशेने वेगाने आपली पावलं टाकत आहे. याच कारणास्तव स्पेस एजेंसी नासा पुढील १० वर्षात काही कठीण मिशन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
आता किती आव्हाने आहेत?
वैज्ञानिकांसाठी सर्वाधिक मोठी चिंतेची बाब अशी की, ओरियनचे पुन:प्रक्षेपण. जेव्हा ओरियन पृथ्वीवरील वातावरणात प्रवेश करेल तेव्हा हिट शील्ड ऐवढे अधिक तापमान सहन करु शकतो की नाही. या मिशनचे आतापर्यंतचे सर्वाधिक मोठे आव्हान हेच असणार आहे. ओरियन जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा त्याचा वेग ३८ हजार किमी प्रति तास असणार आहे. या दरम्यान त्याचा सामना ३००० सेंटीग्रेड तापमानासह होणार आहे. जे त्याला झेलावे लागणार आहे. हे आव्हान ठरवेल की, व्यक्तीसाठी हे मिशन किती सुरक्षित आहे. दरम्यान, वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की आतापर्यंत या मिशन संदर्भातील ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्यामध्ये सर्वकाही ठीक आहे.(NASA Artemis)
हे देखील वाचा- चंद्रग्रहण आणि भुकंपामध्ये संबंध असतो?
नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर बिल नेलसन यांनी असे म्हटले की, मून मिशनसाठी गेल्या दोन लॉन्चिंगमध्ये जेवढ्या समस्या आल्या त्या सोडवण्यात आल्या आहेत. रॉकेट योग्य पद्धतीने लॉन्च व्हावे यासाठी तांत्रिक रुपात त्यामध्ये काही बदल करण्यात आले होते. नासाच्या खुप प्रयत्नानंतर हे मिशन एका स्तरापर्यंत यशस्वी झाले आहे. मात्र आता विमान पुन्हा येईल त्याच्या रिपोर्टवरुन पुढचे काही स्पष्ट होईल.