राजमहल किंवा राजेरजवाडे म्हटले की, आलिशानची झळ असलेले भल्ल मोठं घर असंच सामान्य माणूस सहज बोलून जातो. मात्र जेव्हा ते प्रत्यक्षात तो पाहतो तेव्हा त्याला आपण खरंच स्वर्गात आलोय का असे वाटू लागतो. परंतु इतिहासाच्या पानांवर हेच राजमहल, राजेरजवाडे सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. दिल्ली असो किंवा राजस्थान मधील पॅलेस येथे टूरिस्ट लोक आवर्जून भेट देतातच. मात्र वास्तूकलेच्या अविस्मरणीय ठेवा असलेल्या मैसूर पॅलेसला तुम्ही कधी भेट दिली आहे का? किंवा मैसूर पॅलेससंदर्भातील काही गुढ गोष्टी तुम्हाला कधी ऐकलात किंवा माहिती आहेत का? चला तर जाऊयात मैसूर पॅलेसच्या (Mysore Palace) सफरीवर.
बंगळुरु पासून चार तासांवर मैसूर पॅलेस उभारण्यात आलेला आहे. भारतातील सर्वाधिक सुंदर महालांपैकी एक असलेला मैसूर पॅले कला आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. या महलात प्रवेश करताच तेथील इतिहास खुप काही सांगून जातो. कारण तेथील वास्तूकला हिच त्याची खऱी ओळख आहे. सध्या दिसणाऱ्या राजवाड्याचा पाया हा महाराजा कृष्णराजेंद्र चतुर्थ वाडिया यांनी घातला होता.
मैसूर पॅलेसचा इतिहास
मैसूर पॅलेसला अंबा विलास महल अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. महाराजा कृष्णराजेंद्र चतुर्थ वाडिया यांनी तो ईसवी सन 1897 मध्ये उभारला होता. तेव्हा त्याचा उभारणीसाठी चंदनाची लाकडं लावण्यात आली होती. मात्र एका दुर्घटनेत तो कोसळला गेला. त्यानंतर येथे दुसर महल तयार करण्यात आला. कृष्णराजा वाडियार चतुर्थ आणि त्यांची आई कम्पानन जमन्नी देवी यांनी ब्रिटीश वास्तूकार हेनरी इर्विन (Henry Irwin) यांना दुसरा मैसूर पॅलेस उभारण्याती जबाबदारी सोपविली होती. त्यामुळे 1912 मध्ये दुसरा महल उभा राहिला होता.
महल तयार करण्यासाठी त्यावेळी 41.47 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मैसूर महल हा 245 फूट लांब आणि 156 फूट रुंद आहे. पॅलेसच्या आतमध्ये असलेला सोन्याचा घुमट हा जमिनीपासून 145 फूट उंचीवर आहे. त्याच्या रोषणाईसाठी तब्बल 97 हजार बल्ब लावण्यात आले आहेत.
हे देखील वाचा- स्वतःच्याच करोडोंच्या मालमत्तेची माहिती महिलेला नव्हती; घर विकणार होती, तेव्हाच सापडला दडलेला खजिना

–मैसूर पॅलेसची वास्तूकला
मैसूर महलात यापूर्वी रोमन आणि द्रविड स्थापत्य कलेचा संगम पाहण्यास मिळायचा. या महलात असलेल्या घुमटसाठी गुलाबी रंगाचे स्टेली नावाच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. महलाच्या आतमध्ये एक मोठा दुर्ग आहे त्याचा घुमट हा सोन्याने तयार करण्यात आला आहे. सकाळच्या वेळेस जेव्हा सूर्याची किरणे या सोन्याच्या घुमटावर पहतात तेव्हा चहूबाजूंना सोन्याची झळाळीची सावली पडते आणि लख्ख प्रकाश दिसतो. या राजवाड्यात 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या बाहुल्यांचा संग्रह देखील आहे.
पॅलेसमध्ये राजांसाठी दीवान-ए-खास आणि सामान्य जनतेसाठी दीवान-ए-आम अशा खोल्या ही तयार करण्यात आल्या आहेत. मैसूर पॅलेसच्या आतमध्ये मुख्य भवन आणि बगीचा सुद्धा आहे. मैसूर पॅलेसच्या (Mysore Palace) मध्यभागी जाण्यासाठी तुम्हाला गजद्वाराजवळून जावे लागते.
-पॅलेसच्या आतमध्ये असलेली प्रशस्त खोली
मैसूर पॅलेसच्या (Mysore Palace) आतमध्ये एक प्रशस्त खोली आहे, ती पाहून असे वाटते येथे मोठ्या संख्येने लोक एकत्रित जमायची. या खोलीत काही स्तंभ आहेत ते एकमेकांपासून काही अंतरावर उभारण्यात आले आहेत. स्तंभांसह छतावर सुंदर नक्शीकाम करण्यात आले आहे. ही खोली अत्यंत सुंदर आणि भव्य असल्याने येथे आल्यावर मन प्रसन्न होते. तसेच येथील भिंतीवर अनेक चित्र सुद्धा लावण्यात आली आहेत. ही चित्र प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांनी काढलेली आहेत. चित्रांच्या खाली त्यांचे नाव सुद्धा लिहिलेले दिसते.
मैसूर पॅलेसच्या पहिल्या मजल्यावर देवघर आहे. येथे अनेक देवी-देवतांची चित्र आहेत. त्याचसोबत महाराजा आणि महाराणी यांच्याकडून पूजा, यज्ञ करतानाची सुद्धा काही चित्रे येथे पहायला मिळतात. तर दुसऱ्या मजल्यावरील मागील बाजूस महाराजा, महाराणी आणि युवराज यांच्या झोपण्यासाठी 3 सिंहासन तयार करण्यात आली आहेत.
हे देखील वाचा- जेव्हा लोकांनी Egyptian Mummies खायला सुरुवात केली, नेमके काय घडले असेल?

-मैसूर पॅलेसमधील पाहण्यासाठी आकर्षक गोष्टी कोणत्या?
मुख्य प्रवेश द्वारा आणि जुना मैसूर महल, दसऱ्यावेळी केला जाणारा बाहुल्यांचे प्रदर्शन, गजद्वार, देवी चामुंडी, राजाचे सिंहासन, दसऱ्यावेळी होणारे कार्यक्रम, कल्याण मंडप, दसऱ्याच्या पर्वावेळी दूर्गा पूजेचे पेंटिंग, वाडियार वंश, कुस्तीचे मैदान, महलाच्या आतमधील दुर्गात असलेले मंदिर.
-मैसूर पॅलेसच्या प्रवेशाची वेळ
मैसूर पॅलेस पाहण्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. या महलात पर्यटकांना प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहे. त्यानुसार वारहा आणि अंबा विलास दरवाजा जो महलाच्या दक्षिण भागात आहे. जयराम बालाराम दरवाजा जो महलाच्या उत्तर भागात स्थित आहे.
–पॅलेसमध्ये होणारे विविध ध्वनी आणि लाइट शो
-पॅलेसमध्ये 45 मिनिटांचा एक ध्वनी आणि लाइट शो आयोजित केला जातो. जे मैसूर पॅलेसचा 400 वर्षांपूर्वीचा इतिहास दाखवतो.
-सोमवार ते बुधवारी संध्याकाळी 7 ते 8 आणि शनिवारी 8.15 ते 9.15 कन्नड कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
-गुरुवार ते शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान इंग्रजी भाषेत ध्वनी आणि लाइट शो असतो. याची तिकिट प्रौढांसाठी 90 रुपये तर लहान मुलांसाठी 40 रुपये आहे.
-संध्याकाळी 15 मिनिटांसाठी संपूर्ण महल हा रोषणाईने जगमगतो.