मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली गेली आङे. एनआयएला धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर देशातील विविध शहरांमध्ये अलर्ट केले गेले आहे. एनआयने याची माहिती मुंबई पोलिसांना सुद्धा दिली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, NIA ला जो मेल पाठवला गेला तो पाकिस्तानी सर्वरचा वापर करुन पाठवला गेला होता.(Mumbai Terror Attack Threat)
दोन दिवसांपूर्वी एनआयएच्या ईमेल आयडीवर एक ईमेल पाठवला गेला. त्यात दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मेसेज लिहिला होता. ईमेल पाठवणाऱ्याने स्वत:ला तालिबानी असल्याचे म्हटले आणि दावा केला की, तालिबान संघटनेचे प्रमुख नेते सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशावर हा ईमेल पाठवला गेला आहे.
धमकी दिल्या गेलेल्या ईमेलची माहिती मिळताच मुंबई पोलिसांना या बद्दल कळवण्यात आले. यामागील मुळ सोर्स कोणता आहे याचा तपास ही सुरु केला गेला. त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वरवरुन आल्याची माहिती मिळाली. तर देशातील विविध शहरांमध्ये याच कारणास्तव अलर्ट जाहीर केला गेला.
कोण आहे सिराजुद्दीन हक्कानी
सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानमधील सर्वाधिक खुंखार गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या वापसीनंतर त्याला देशाचा कार्यकारी गृहमंत्री बनवले आहे. त्याचसोबत तो तालिबान मध्ये नंबर २ च्या नेत्याचा दर्जा आहे. तालिबान मध्ये हक्कानी नेटवर्कचा फार दबदबा आहे. अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने हक्कानीच्या लोकेशन बद्दल सुचना देण्यासाठी १० मिलियन डॉलरचे बक्षिस ही लावले आहे. (Mumbai Terror Attack Threat)
गेल्या महिन्यात ही दिली गेली धमकी
यापूर्वी जानेवारी महिन्यात मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली गेली होती. एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करत शहरातील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्याने फोनवर असे म्हटले होते की, १९९३ च्या हल्ल्याप्रमाणे विविध ठिकाणी हल्ले करत मुंबईला हादरवून टाकले होते. २ महिन्यामध्ये हा हल्ला करणार असल्याचे म्हटले होते.
हे देखील वाचा- ‘मुंबई ही कोणाच्या बापाची नाही’, कर्नाटकातील मंत्र्यांच्या दाव्यावर फडणवीसांची तीव्र प्रतिक्रिया
त्याचसोबत जानेवारी मध्येच मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धमकीचा फोन कॉल आला होता. या कॉलमध्ये अज्ञात व्यक्तीने शाळा उडवण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांनी या बद्दल असे म्हटले होते की, शाळेतील लँन्डलाइवर फोन आला होता. अज्ञात व्यक्तीने शाळा उडवण्याचा दावा केला होता.