Home » सुर्योदयापूर्वी उठून ‘हे’ काम करायचा अकबर

सुर्योदयापूर्वी उठून ‘हे’ काम करायचा अकबर

अकबरला एका सुज्ञ शासकांपैकी एक मानले जायचे. तर काही इतिहासकार त्याला निरंकुश शासक होता असे मानतात.

by Team Gajawaja
0 comment
Mughal history
Share

अकबरला एका सुज्ञ शासकांपैकी एक मानले जायचे. तर काही इतिहासकार त्याला निरंकुश शासक होता असे मानतात. दुसऱ्या बाजूला काही इतिहासकार म्हणतात की, मुघलांमध्ये अकबर असा शासक होता ज्याने दरबारातील लोकांना शिस्त लावली आणि अशा प्रशासनाची स्थापना केली ज्यामध्ये प्रजेचे भलं होईल. (Mughal history)

मुघल प्रशासन व्यवस्थितीत काम करतयं का याची देखरेख बादशाह अकबर स्वत: करायचा. त्यासाठी तो १६ तासांपेक्षा अधिक वेळ काम ही करायचा. दरबारी इतिहासकार अबुल फजल यांच्या मते, अकबरची एक सवय होती, त्याचे तो नेहमीच पालन करायचा. ही सवय त्याने आपल्या दरबारातील लोकांसह प्रशासनातील उच्चाधिकाऱ्यांना सुद्धा लावली होती. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये म्हणून तो स्वत: सुर्योदयापूर्वी दोन तास आधी उठायचा.

अबुल फजल यांनी बादशाह अकबर याच्या दिनचर्याबद्दल उल्लेख केला आहे. त्यांनी असे म्हटले की, अकबर सुर्योदयापूर्वी दोन तास आधी उठायचा आणि स्नान-ध्यान करुन सुर्याच्या पहिल्या किरणासह प्रजेला झरोखा दर्शन द्यायचा. त्या वेळेपर्यंत बहुतांश स्री-पुरुष, व्यापारी, शेतकरी आणि अन्य व्यवसायी बादशाहच्या दर्शनासाठी एकत्रित जमायचे.

Mughal history

Mughal history

झरोखा दर्शनानंतर बादशाह अकबर दीवान-ए-आम मध्ये साडे चार तास प्रजेच्या तक्रारी ऐकायचा. मुघल भारताचा इतिहास या पुस्तकाच्या मते, अकबर तक्रारी ऐकायचा पण त्याचे निवारण सुद्धा करण्याचे आदेश द्यायचा. सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर तो दीड तास दीवान-ए-आम मध्ये दरबाऱ्यांसोबत बसायचा आणि प्रशासनासंदर्भातील कामे पूर्ण करायचा.(Mughal history)

दीवान-ए-आम मधील बैठकीनंतर अकबर हरमचे निरिक्षण करायचा आणि राजमहलातील अन्य अधिकऱ्यांसोबत बातचीत करायचा. यानंतर तो दुपारी नमाज पठण करायचा आणि भोजनानंतर काही वेळ आराम करायचा. दुपारी उठल्यानंतर तो पशूंचे निरिक्षण करण्यासाठी जायचा.

या सर्व गोष्टी केल्यानंतर तो दीवान-ए-खासमध्ये लागणाऱ्या दरबारात जायचा आणि तेथे राज्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण कामांबद्दल चर्चा करायचा. संध्याकाळी पुन्हा नमाज पठणानंतर तो विद्वानांसोबत बातचीत करायचा आणि त्यानंतरचा थोडा वेळ मनोरंजनात घालवायचा. रात्रीच्या अखेरच्या नमाजानंतर तो शयनागारमध्ये जायचा. अशी दिनचर्या तो दररोज करायचा आणि दरबारातील इतरांकडून ही करुन घ्यायचा.

हेही वाचा- एक राजा… त्याच्या १०० राण्या…….!

अकबराच्या काळाला हिंदी साहित्याचा सुवर्ण काळ असे म्हटले जाते. अकबराच्या दरबारात नवरत्ने होती. त्यांची नावे- अबुल फजल, फैजी, तानसेन, राजा बीरबल, राजा टोडरमल, राजा मानसिंह, अब्दुल रहीम खान-ऐ-खाना, फकीर अजिओं-दिन, मुल्लाह दो प्याज़ा. अबुल फजल यांनी अकबरनामाच्या आणि आइने अकबरी सारखी प्रसिद्ध पुस्तकांची रचना केली. तर अकबराच्या दरबारातील तानसेनची गणना भारतातील महान गायक, मुघल संगीताचा संगीतकार आणि उत्तम संगीततज्ञानाच्या रुपात केली जाते. या व्यतिरिक्त दरबारात अकबर-बिरबालाची जोडी ही प्रसिद्ध होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.