उत्तर प्रदेशात सध्याच्या दिवसात एकाच वेळी काही लेडी डॉनचा शोध घेतला जात आहे. अशातच अतीक अहमद याची पत्नी शाइस्ता परवीन हिचा तपास केला जात आहे. त्याचसोबत आणखी एक मोस्ट वॉन्टेड लेडी डॉन दीप्ति बहल हिचा ही तपास सुरु आहे. पोलिसांनी तिच्यावर ५ लाखांचे बक्षीस लावले आहे. दीप्ति बहल हित्या विरोधात काही गुन्हे दाखल आहेत. (Most wanted lady don)
खास गोष्ट अशी की, दीप्ति बहल ही बागपत मधील एका महाविद्यालयाची मुख्याध्यापिका होती. परंतु ती गेल्या ४ वर्षांपासून फरार आहे. असे सांगितले जात आहे की, तिने पीएचडी सुद्धा केली आहे. पण सध्या ती पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेंड आहे. तिच्या विरोधात काही गुन्ह्यांची नोंद सुद्धा करण्यात आली आहे त्याचा तपास ही केला जात आहे.
कोण आहे दिप्ति बहल?
लेडी डॉनच्या रुपात कुख्यात झालेली दीप्ति बहल ही लोनी येथील राहणारी आहे. बाइक बॉट घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी ती एक आहे. ती मास्टरमाइंड संजय भाटी याची पत्नी आहे. हिने बाइक टॅक्सी वेंचरला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली नोएडातून एक अभियान सुरु केले होते. तपास यंत्रणा त्याच घोटाळ्यासंदप्भात संपूर्ण राज्यात तपासणी करत आहेत.
मेरठ क्राइम ब्रांचने असा अंदाज लावला आहे की, ४५०० कोटी रुपयांचा हा घोटाळा करण्यात आलेला आहे. या संदर्भात देशभरात २५० हून अधिक केस दाखल करण्यात आले आहेत. जवळजवळ ४० वर्षीय दीप्ति २०१९ मध्ये घोटाळ्याबद्दलची पहिली केस दाखल झाल्यापासूनच गायब झाली आहे. पोलिसांनी आपल्या तपासात असे सांगितले की, दीप्ति बहल ही लग्नापूर्वी बागपत मध्ये एका शिक्षिकेच्या रुपात काम करायची. तपासात असे समोर आले की, ती मुख्याध्यापिकेच्या पदावर सुद्धा होती. ही सर्व माहिती अशावेळी समोर येत आहे जेव्हा दीप्तिने चौधरी चरण सिंह युनिव्हर्सिटीतून एमए आणि पीएचडी सुद्धा केली आहे.
बाईक बॉट योजना काय आहे?
या योजनेंतर्गत ग्राहकांना मोठी लालूच देण्यात आली. मोटारसायकलींनी त्यांच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आश्वासन दिले. गुंतवणूकदारांना बाईकसाठी 62,100 रुपये देण्यास सांगण्यात आले. कंपनी 5,175 रुपये प्रति महिना EMI आणि 4,590 रुपये प्रति बाइकचे निश्चित मासिक भाडे ऑफर करते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने हा करार केला. जेणेकरून ग्राहकाला समजेल की त्याचे पैसे सुरक्षित आहेत.
नंतर, ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी, कंपनीने सांगितले की ‘Bike Bot – Bike Taxi संचालित GIPL’ सारख्या जाहिराती लवकरच जोडल्या जातील आणि ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकर पैसे जमा करावेत. अशा जाहिरातींवर सुमारे 2 लाख गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले.(Most wanted lady don)
पण परतावा न मिळाल्याने 2019 मध्ये सुमारे दोन लाख गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे जाऊन भाटी आणि त्यांच्या फर्मविरोधात तक्रार दाखल केली. सीबीआय या संपूर्ण प्रकरणात नोएडातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहे.
कंपनी 2010 मध्ये सुरू झाली
आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यूपी पोलीस 2019 मध्ये झालेल्या या घोटाळ्याचा गंभीरपणे तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांना कळले की दिप्तीचा पती संजय भाटी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी 20 ऑगस्ट 2010 रोजी गरवित इनोव्हेटिव्ह प्रमोटर्स लिमिटेड (जीआयपीएल) नावाने एक रिअल इस्टेट कंपनी सुरू केली होती.
TOI च्या अहवालानुसार, ऑगस्ट 2017 मध्ये, संजय भाटी यांनी त्यांच्या फर्मद्वारे ‘Bike Bot-GIPL’s bike Taxi’ योजना सुरू केली आणि दीप्ती यांना कंपनीमध्ये अतिरिक्त संचालक बनवण्यात आले. (Most wanted lady don)
हे देखील वाचा- समलैंगिक लग्नासंबंधित मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
तर 2020 मध्ये, EOW ने यापूर्वी दीप्तीच्या अटकेसाठी 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मार्च २०२१ मध्ये तपास यंत्रणांनी त्यांचे लोणी येथील निवासस्थान ताब्यात घेतले. याआधी तिच्या मेरठ येथील घराची झडती घेतली असता ती सुमारे 10 वर्षांपूर्वी शहर सोडून गेल्याचे आढळून आले. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बाईक बॉट घोटाळ्यातील सर्व खटले एकत्र एकत्र करण्याचे आदेश दिले होते. ग्रेटर नोएडामध्ये नोंदवलेल्या सर्व 118 प्रकरणांमध्ये आणि देशभरात 150 हून अधिक प्रकरणांमध्ये दीप्तीचे नाव आहे. आरोपपत्रात 31 लोक आणि 13 कंपन्यांचा मनी लाँड्रिंगसाठी वापर करण्यात आला आहे.