Mistakes in relationship : रिलेशनशिपमध्ये सर्वकाही गोष्टी प्रेमाने होत नाही. आजकाल रिलेशनशिपची वाख्या बदलली गेली आहे. अशातच पार्टनवर प्रेम करण्यासह त्याच्या भावनांचा सन्मान करणेही अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. बहुतांशजण अनहेल्दी रिलेशनशिपच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात, जणेकरुन आपले नाते मोडू नये. भारतात बहुतांश विवाहीत कपल समाज आणि मुलांच्या भीतीपोटी नाते काहीही करून टिकवण्याचा प्रयत्न करतात. लग्नाचे नाते आयुष्यभर टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण पुढील काही संकेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी सुरळीत सुरू नसल्याचे संकेत देतात. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….
पार्टनरला पुरेसा वेळ न देणे
रिलेशनशिपमध्ये गोष्टी बिघडण्यामागे कारण म्हणजे पार्टनरला पुरेसा वेळ न देणे. काही कपल्सला एकमेकांशी काय बोलायचे असा देखील प्रश्न पडतो. घरात एकत्रित राहूनही एकटे असल्याचे काहींना वाटते. अशातच तुमच्या पार्टनरमध्ये हे संकेत दिसत असल्यास समजून जा तुमच्या नात्यात दूरावा येऊ शकतो.
वेळोवेळी राग करणे
रिलेशनशिपमध्ये वाद-भांडण होणे सामान्य बाब आहे. पण वारंवार लहान गोष्टींवरुन पार्टनरला सुनावणे अत्यंत चुकीचे आहे. अशातच नाते मोडले जाऊ शकते. एखाद्याच्या भावनांचा सन्मान करणार नसाल तर तसे नाते दीर्घकाळ टिकवून काहीही फरक नाही. ते अखेर मोडले जाऊ शकते.
खोटं बोलण्याची सवय
पार्टनर नेहमीच खोटं बोलत असेल तर त्याचे खोटं बोलणे सतत सहन करून घेऊ नका. तुमचे खोटे आयुष्य तुमच्या भवितव्यासाठी धोक्यासाठी ठरू शकते. नाते आनंदी ठेवायचे असल्यास नात्यात विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशातच पार्टनर तुमच्यासाठी खोट बोलून काही करत असेल तर वेळीच सावध व्हा. (Mistakes in relationship)
केवळ स्वत: बद्दल विचार करणे
नवरा-बायकोचे नाते निस्वार्थाचे असावे असे म्हटले जाते. पण पार्टनर प्रत्येक प्रसंगी त्याच्याबद्दलच विचार करत असेल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे. पार्टनरच्या अशा वागणूकीकडे दुर्लक्ष करू नका.
लगेच रिस्पॉन्स न देणे
उत्तम नात्यात एकमेकांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.पण अचानक पार्टनर तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागल्यास नाते कालांतराने मोडले जाऊ शकते. याशिवाय पार्टनर तुम्हाला तुमच्या मेसेज किंवा फोनला लगेच रिस्पॉन्स देण्याऐवजी वेळ लावत असेल तर समजून जा नात्यात काहीतरी गडबड आहे.