बेंगळुरू येथे आत्महत्या करणा-या एआय इंजिनीअर अतुल सुभाषला न्याय मिळावा म्हणून सोशल मिडियावर मोठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या सर्व मोहीमेचा रोख भारतीय कायद्यांवर आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असायला हवा. पण महिला आणि पुरुषांमध्ये भेद करणा-या कायद्याचा फायदा घेत काही महिला पुरुषांना जेव्हा टार्गेट करतात, तेव्हा त्यांच्याकडे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उटलण्यापलिकडे काहीच मार्ग नसतो. त्यामुळे अशा कायद्यावर अधिक संशोधन व्हावे आणि खोटा गुन्हा, खोटी तक्रार करणा-याला सर्वात आधी शिक्षा व्हावी अशी मागणी सोशल मिडियाच्या मार्फत करण्यात येत आहे. या मोहिमेला पाठिंबा म्हणून देशातील मान्यवर वकिल मंडळीही पुढे आली आहेत. (Men Protection Acts)
भारतीय कायद्यात अधिक सुधारणा होत, खोट्या तक्रारी किंवा खोटा खटला दाखल करणा-याला कमीत कमी दहा वर्ष आणि जास्तीत जास्त वीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आवश्यक करावी, असी मागणी करण्यात येत आहे. खोट्या तक्रारी करणारे आणि भारतातील नागरिक म्हणून घेण्यास आवश्यक असलेली कोणतीही बनावट कागदपत्र करणा-यांवर अशा स्वरुपाची शिक्षा झाली तर अशा अनेक अतुल सुभाष यांचे जीव वाचू शकतील. शिवाय खोटी तक्रार करणा-यांना मदत करणारे आणि बनावट कागदपत्र बनवून देणा-यांनाही अशीच कडक शिक्षा झाली तर कुठल्याही भारतीय नागरिकाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा आता सोशल मिडियाच्या मार्फत व्यक्त होत आहे. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीनं 9 खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. एका तक्रारीमधून त्यांची सुटका होते न होते तोच पुन्हा त्यांच्यावर दुसरी तक्रार होत असे. चौकशीअंती या तक्रारी खोट्या असल्याचे सिद्ध झाले, मात्र दरम्यानच्या काळात सुभाष आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. आपल्यामुळे आपल्या वृद्ध आईवडिलांचीही बदनामी होत असल्याची भावना सुभाष यांच्यामनात होती. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नीवर सोशल मिडियातून टिका करण्यात येत आहे. आणि अतुल सुभाष यांच्यासारख्याच पत्नीपिडित पतींसाठी कायद्यात संशोधन व्हावे अशी मागणी होत आहे. (Latest News)
दुर्दैवानं आत्महत्या केल्यानंतर अतुल सुभाष यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली आहे. अर्थात ही गोष्ट आधी झाली असती तर एका संवेदनशील व्यक्तीचा जीव वाचू शकला असता, पण अतुल सुभाष नाही, तर त्यांच्यासारख्याच अन्य पत्नीपिडीत पतींचा छळ थांबवा अशी मागणी सोशल मिडियात जोर पकडू लागली आहे. याला निमित्त झालं आहे, ते भारतीय कायद्यात महिलांसाठी दिलेले विशेष अधिकार. याच विशेष अधिकारांचा वापर करत काही महिला आणि त्यांचे वकील हे महिलेच्या पतीला अक्षरशः रस्त्यावर आणतात. त्यासोबत त्याच्या कुटुंबाचीही फरफट होते. यामुळेच प्रथम खोटी तक्रार दाखल करणे हा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांनी अशा अनेक अतुल सुभाष यांना वाचवण्यासाठी नार्को पॉलीग्राफ ब्रेनमॅमिंग कायदा आणावा अशी मागणी केली आहे. उपाध्याय यांच्या मते, पाश्चात्य देशात खोटी तक्रार, खोटी साक्ष देण्यासाठी गुन्ह्यापेक्षाही जास्त कडक शिक्षा आहे. मात्र भारतात खोटी तक्रार, खोटी साक्ष, खोटा तपास, खोटा खटला आणि खोटे शपथपत्र दाखल करणे हे गंभीर गुन्हे म्हणून नोंद झाले तर ही परिस्थिती बदलणार आहे. (Men Protection Acts)
या प्रकरणी प्रत्येकाला नार्को पॉलीग्राफ ब्रेनमॅपिंग टेस्टचे बंधन असेल तर अशाप्रकारच्या खोट्या तक्रारी कधीच येणार नाहीत. अनेक बलात्काराच्या तक्रारी या खोट्या असतात. त्यामुळे अनेक तरुणांची आय़ुष्य बरबाद झाली आहेत. मात्र त्यातील खोटी तक्रार करणा-यांना मामुली दंडाव्यतिरिक्त कुठलिही शिक्षा होत नाही. यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार दाखल केल्यावर, मी ही तक्रार केली आहे, ती खरी आहे, गरज भासल्यास यासंदर्भात नार्को पॉलीग्राफ ब्रेनमॅपिंग टेस्ट करण्यास मी तयार आहे असे प्रतिज्ञापत्र आवश्यक करावे, अशी मागणीही अश्विनी उपाध्याय यांनी केली आहे. अमेरिका, सिंगापूर, जापान, ऑस्ट्रेलिया, रशिया, चीन, न्यूझिलंड येथे खोट्या साक्ष देण्यासाठी गुन्ह्यापेक्षा जास्त शिक्षा आहे. 20 वर्षाची शिक्षा फक्त खोटी साक्ष देण्यासाठी होते, त्यामुळे तिथे आरोपीला पकडल्यावर तो पहिल्यांदा आपला गुन्हा कबूल करतो. अन्यथा गुन्ह्यासोबत त्याला खोटी साक्ष दिल्याच्या आरोपातही शिक्षा सुनावली जाते. असाच कायदा भारतात लागू करावा अशी मागणी अश्विनी उपाध्याय यांनी केली आहे. सोबत भारतातील 800 जिल्ह्यात नार्को पॉलीग्राफ ब्रेनमॅपिंग लॅब बनवण्याची मागणी आहे. यातून खोटी कागदपत्रे बनवण्याच्या घटनांही अटकाव येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अटकाव येणार आहे. (Latest News)
========
हे देखील वाचा : भारताचं लाल सोनं म्हणजे रक्तचंदन !
========
अतुल सुभाष हे मुळचे बिहारचे होते. ते बेंगळुरु येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये DGM म्हणून कार्यरत होते. ते AI आणि ML मध्ये तज्ञ होते. अतुल सुभाषचे 2019 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर पत्नीने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ करण्यापर्यंतचे अनेक गुन्हे दाखल केले. यासाठी तीन कोटीची पोटगी मागण्यात आली. दोन वर्षात अतुल यांनी 120 वेळा कोर्टात हजेरी लावली आहे. अतुल यांची पत्नीही मोठ्या कंपनीमध्ये कामाला होती, असे असूनही तिला पोटगीपोटी दरमहा 40 हजार रुपये मिळत होते. मात्र मुलासाठी तिला दरमहा 2 लाख रुपयांची गरज होती, आणि यासाठी ती अतुलचा छळ करीत असल्याचा आरोप आहे. अतुलची आत्महत्या ही दुःखद घटना आहे, मात्र त्यामुळे समाजातील अन्य अतुलवर झालेल्या अन्यायकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर पकडत आहे. (Men Protection Acts)
सई बने