राजस्थान मधील जालौर मध्ये अस्पृश्यतेसंदर्भात एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी देशभरातून विरोध केला जाऊ लागला आणि सोशल मीडियात सुद्धा लोकांनी आपली मतं मांडली. सोशल मीडियात लोकांनी आपला राग तर व्यक्त केलाच पण याच दरम्यान मनुस्मृतिचा सुद्धा उल्लेख केला आहे. ट्विटवर एक हॅशटॅग ट्रेंन्ड करत होता. त्यामध्ये लोकांनी आपली मतं मांडत मनुवादामुळे त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असे ही म्हटले होते. अशातच प्रश्न असा उपस्थितीत होतो की मनुस्मृति (Manusmriti) काय आहे आणि जेव्हा दलितांसंबंधित मुद्दे येतात तेव्हा मनुस्मृतिची चर्चा का केली जाते? जाणून घेऊयात अधिक.
मनुस्मृति काय आहे?
मनुस्मृति हा एक धार्मिक ग्रंथ मानला जातो. यामध्ये धर्म आणि राजकरणाबद्दल सांगण्यात आले आहे. मनुस्मृति समजाच्या संचालनासाठी जी व्यवस्था आहे त्यांचा संग्रह करण्यात आला आहे. यामध्ये लिहिण्यात आलेल्या श्लोकांची संख्या एक लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. हळूहळू ही संख्या कमी झाली. सध्या २६९४ श्लोकच त्यात आहेत. जे १२ अध्यायात विभागले गेले आहेत. यामध्ये सृष्टीचा उदय, हिंदू संस्कार विधी, श्राद्ध विधी व्यवस्था, विविध आश्रम व्यवस्था, विवाह संबंधित नियम आणि महिलांसंबंधित नियम सांगण्यात आले आहेत.
जातीसंदर्भात काय लिहिले आहे?
खरंतर जाती व्यवस्थेसंदर्भातच याबद्दल अधिक बोलले जाते. मनुस्मृतिमध्ये असे म्हटले आहे की, भगवान ब्रम्ह यांनी संसाराची रचना केली होती. त्यांनी एकोहम-बहुष्याम च्या विचाराच्या कारणास्तव सृष्टीची रचना केली होती. त्याचसोबत यामध्ये असे ही सांगण्यात आले आहे की, ब्रम्हांच्या मुखातून ब्राम्हण शब्द निघाला ज्याचे कार्य अध्ययन करणे, यज्ञ करणे असा आहे. तर क्षत्रिण वर्ण हा ब्रम्हांचा भुवयांमधून निघाला ज्याचे काम रक्षण करणे आहे. वैश्य हा ब्रम्हाच्या पोटातून निघाला ज्याचे काम संपूर्ण समाजाचे पोट भरणे आणि समाजिक कार्य, कृषी करणे. शुद्र हा ब्रम्हाच्या पायांमधून उत्पन्न झाला ज्याचे काम स्वच्छता ठेवले. परंतु काही श्लोकांमध्ये शुद्रांच्या कामासंदर्भात करण्यात आलेल्या वर्णनाचा बहुतांश लोक विरोध करतात.
महिलांसाठी काय लिहिले आहे?
मनुस्मृतिमध्ये महिलांचे कार्य, त्यांचे कर्म आणि त्यांनी आयुष्य जगण्याच्या पद्धतीबद्दल सांगितले आहे. जे आजच्या युगाला ठीक नसल्याचे मानले जाते. अशातच मनुस्मृतिचा खुप विरोध केला जातो. कारण महिलांचे स्वातंत्र्य, त्यांची वागणूक या संदर्भात अशा काही गोष्टी आहेत ज्या आज मान्य केल्या जाऊ शकत नाहीत. जसे की पाचव्या अध्यायाच्या १५२ व्या श्लोकात लिहिले आहे की, स्त्रीने पिता, पती आणि पुत्रापासून कधीच वेगळे राहू नये. यांच्यापासून वेगळी झालेली स्री स्वातंत्र्यपणे राहणारी आपल्या पती आणि पित्यासह संपूर्ण कुळाला कलंकित करते.
हे देखील वाचा- चुकूनसुद्धा वाचू नका ही ३ रहस्यमयी पुस्तके, वाचाल जाल सैतानाच्या ताब्यात!
बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, मुलीने नेहमीच आपल्या पितांच्या संरक्षणात राहिले पाहिदे. लग्नानंतर तिने पतीचे संरक्षक व्हावे आणि पतीच्या निधनानंतर आपल्या मुलांच्या दयेवर निर्भर राहिले पाहिजे. कोणत्याही स्थितीत एक महिला स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही.