Home » Maha Khumbh Mela : महाकुंभमेळ्याला हायटेक सुरक्षेचे कवच

Maha Khumbh Mela : महाकुंभमेळ्याला हायटेक सुरक्षेचे कवच

by Team Gajawaja
0 comment
Maha Khumbh Mela
Share

नवीन वर्ष (New Year) सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवघी राहिला आहे. या नव्या वर्षात भारतात जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा होणार आहे. उत्तर प्रदेशमधील तिर्थराज प्रयाग येथे महाकुंभमेळा या नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच होत आहे. बारा वर्षांनी होणारा हा महाकुंभमेळा पूर्ण कुंभमेळा म्हणूनही ओळखला जाणार आहे. कारण यावेळी प्रयागराजमध्ये बारावेळा बारावर्षांनी हा कुंभमेळा साजरा होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेश सरकारनं अभूतपूर्व अशी तयारी केली आहे. (Maha Khumbha Mela)

13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणा-या या महाकुंभमेळ्यासाठी 45 करोड भाविक येण्याची शक्यता आहे. आत्तापासूनच लाखो साधू या प्रयागराज नगरीमध्ये दाखल झाले आहेत. अतिप्राचिन काळापासून स्थापन झालेल्या 13 आखाड्यातील हे साधू आपल्या आखाड्यानुसार भव्यदिव्य मंडप आणि यज्ञस्थान उभारण्यात गुंग झाले आहेत. याशिवाय अलिकडे मान्यता मिळालेला 14 वा किन्नर आखाडाही प्रयागराज स्थळी दाखल झाला आहे. या सर्व साधू संतांमुळे संपूर्ण प्रयागराज परिसर भगवामय झाला आहे. (Social News)

अशावेळी या भागातील सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळेच प्रयागराज प्रशासनानं आखाड्यातील प्रमुख साधू संताना वॉकॉटीकीची सुविधा देण्यात आली आहे. तसेच महाकुंभमेळ्यातील सुरक्षा अभेद्य असावी यासाठी ड्रोन तैनात कऱण्यात आले आहेत. हे ड्रोन फक्त आकाशात नसून तर पाण्याखालीही तैनात कऱण्यात आले आहेत. प्रयागराजमध्ये 2700 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आला आहे. येथून चोवीस तास प्रयागराजमधील प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नव्या वर्षात भारतात होणा-या महाकुंभमेळ्यासाठी अभेद्य अशी सुरक्षा यंत्रणा उभारण्यात येत आहे. महाकुंभमेळ्यात एका दिवसाला करोडोंच्या संख्येत भाविक येणार आहेत. (Maha Khumbha Mela)

एवढ्या मोठ्या संख्येने भाविक येत असले तर गोंधळ, चेंगराचेंगरी होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळण्यासाठी पावलापावलावर यंत्रणा सज्ज कऱण्यात आली आहे. संपूर्ण प्रयागराजमध्ये विशेष काळजी घेण्यात येत आहे. महाकुंभमेळ्यासाठी परदेशातूनही भाविक येणार आहेत. या सर्वांना हा महाकुंभमेळा सुखद आठवणींचा राहावा यासाठी विशेष अधिकारी तैनात कऱण्यात आले आहेत. या अधिका-यांकडे कोणीही मदत मागितली तर ते या भाविकांना मदत करण्यासाठी हजर रहाणार आहेत. यासंदर्भात अधिक माहिती महाकुंभमेळ्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अँपमध्ये देण्यात आली आहे. महाकुंभाच्या सुरक्षेसाठी 50 हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत. महाकुंभमेळ्यासाठी सुरक्षतेचे जे 7 थर तयार करण्यात आले आहेत त्यात ते तैनात असतील. फक्त महाकुंभमेळा भागातच सुरक्षा नाही तर सीमाभागावरही विशेष काळजी घेण्यात येत आहे. (Social News)

घुसखोरी आणि कोणत्याही दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सीमेवर नजर ठेवली जात आहे. याशिवाय सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जात आहे. सोबत हॉटेल, ढाबे, रेल्वे स्थानक, बसस्थानकांवर तपासणी करण्यासाठी पाहणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्वात महाकुंभमेळा भागात आकाशातूनही बंदोबस्त असणार आहे. संभाव्य हवाई धोका टाळण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. सोशल मिडियावर व्हिडिओ करण्यासाठी जर कोणाला ड्रोन वापरायचे असतील तर त्यांना पोलीसांची प्रथम परवानगी काढावी लागणार आहे. अन्यथा या ड्रोनला जप्त करण्याचे अधिकार संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. यासोबत सोशल मिडियावरही पोलीसांचे एक पथक नजर ठेवणार आहे. (Maha Khumbha Mela)

=======

हे देखील वाचा : Maha Kumbh Mela : समुद्रमंथनाचा साक्षीदार

Sriram Krishnan : डोनाल्ड ट्रम्पचा श्रीराम !

=======

यासाठी शैक्षणिक संस्थांमधील तरुणांना डिजिटल योद्धा म्हणून प्रशिक्षित करून मेळ्याच्या परिसरात तैनात केले गेले हे. याशिवाय जत्रेच्या आवारात सर्व संबंधित विभागांची शिबिर कार्यालये उघडण्यात आली आहेत. महाकुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी पोलीस मोठ्या संख्येत असले तरी 14 हजारांहून अधिक होमगार्ड तैनात केले आहेत. हे होमगार्ड वाहतूक व्यवस्था आणि संतांचे आखाडे यासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय महाकुंभमेळ्यात मोठ्या संख्येनं वृद्ध व्यक्ती येतात, त्यांना संगम स्नान करण्यासाठी हे होमगार्ड मदत करणार आहेत. या सर्वांकडे आवश्यक अशी वाहनेही देण्यात आली आहेत. महाकुंभमेळा परिसरात असे 20 कॅम्प होमगार्डचे असणार आहेत आणि त्यात 24 तास होमगार्ड भाविकांना सेवा देण्यासाठी तत्पर राहणार आहेत. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.