Home » अद्भुत, विलक्षण आणि इच्छापूर्ती करणारे मध्यप्रदेशातील शारदा देवी मंदिर

अद्भुत, विलक्षण आणि इच्छापूर्ती करणारे मध्यप्रदेशातील शारदा देवी मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Maa Sharda Temple
Share

मध्यप्रदेशमधील सतना जिल्ह्यामधील शारदा देवीचे मंदिर हे शक्तीपीठांपैकी एक आहे. नवरात्रीच्या उत्सवात येथे लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात.  पण त्याबरोबरच अन्यवेळीही मैहर येथील या शारदा देवी मंदिरात (Maa Sharda Temple) भक्तांचीगर्दी असते. 

तमसा नदीच्या काठावर त्रिकुटा पर्वतरांगाच्या मध्ये 600 फूट उंचीवर असलेले हे मंदिर नैसर्गिकरित्या समृद्ध अशा कैमूर आणि विंध्य पर्वतरांगांच्या कुशीत वसले आहे.  हे शारदादेवी मंदिर (Maa Sharda Temple)  इच्छापूर्ती म्हणूनही प्रसिद्ध आहे.  

मैहर म्हणजे माईचा हार. देवी सतीचा हार या ठिकाणी पडल्याची गाथा सांगण्यात येते, त्यामुळेच मैहर देवी शारदा मंदिर 108 शक्ती पिठांपैकी एक आहे.  या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका म्हणजे मंदिराचे दरवाजे रात्री बंद केल्यावर येथे शारदा देवीचे परमभक्त येऊन देवीची आरती आणि पूजा करतात अशी धारणा आहे. सकाळी मंदिर उघडल्यावर देवीवर ताजी फुले मिळतात. त्यामुळेच अत्यंत जागृत शक्तीस्थळ म्हणून शारदा देवी मंदिराची ओळख आहे.  

मध्यप्रदेशच्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्याच्या जवळ त्रिकूट पर्वतावर असलेल्या या शारदादेवी शक्तीपीठ मंदिरात जाणं म्हणजे भाविकांची परीक्षा असते. मंदिरात जाण्यासाठी 1065 पायऱ्या चढाव्या लागतात.  

पूर्ण भारतात शारदा मातेचे (Maa Sharda Temple) हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.  या भागातील दोन वीर बंधू आल्हा आणि ऊदल यांनी या मंदिराचा शोध घेतला. आल्हा यांनी याच स्थानावर 12 वर्षे शारदादेवीची तपस्या केली.  

आल्हा हे शारदा देवीचा उल्लेख शारदामाई असा उल्लेख करीत असत, त्यामुळे स्थानिक काव्यामध्ये या मंदिराचा उल्लेखही शारदामाई असाच आढळतो. अत्यंत प्राचीन असलेल्या या शारदा देवी मंदिरात आदिगुरु शंकराचार्यही देवीची आराधना करीत असल्याचा उल्लेख आहे.  

ही शारदा मातेची मुर्ती विक्रम संवत 559 मध्ये असल्याचे बोलले जाते. मैहर पर्वताचा उल्लेख काही ग्रंथामध्ये महेंद्र पर्वत असाही करण्यात आला आहे.  शारदादेवी मंदिर, आणि त्याचे प्राचीन महत्त्व सांगणारे अनेक शिलालेखही या परिसरात आढळतात.  या भागात आलेल्या प्रत्येक राजांनी मंदिरात सुधारणा केली.  बांधकाम केले. त्यामुळे अत्यंत प्राचीन इतिहास असूनही मंदिर आजही अत्यंत देखणे आणि प्राचिन स्थापत्यकेलेची साक्ष देणारे आहे.  

====

हे देखील वाचा – भारतातील ‘तो’ प्रदेश, जिथे उलट्या दिशेने चालते घड्याळ

====

या मंदिराबाबत सर्वात प्रचलित आख्यायिका सांगितली जाते ती बुंदेलखंण्ड येथील महोबामधील बीर योद्धे आल्हा यांची. जगनिक नावाच्या एका कवींनी आल्हाखण्ड नावचे एक काव्य लिहिले आहे. हे काव्य येथे पोवाड्यासारखे गायले जाते. त्यातून आल्हा यांच्या वीरतेची आणि शारदा देवीवरील त्यांच्या भक्तीची गाथा भक्तांना समजते.  

वीर आल्हा यांना शारदा देवीचा (Maa Sharda Temple) आशीर्वाद मिळाला होता. त्यांनी पृथ्वीराज चौहान यांनाही एका युद्धात पराभूत केले होते. तब्बल 52 युद्ध त्यांच्या नेतृत्वात झाली आणि त्यात आल्हा विजयीही झाले. हे आल्हा आजही अदृश्य रुपाने मंदिरात येतात, ब्रह्म मुहूर्तावर देवीची पुजा करतात, अशी धारणा या भागात आहे.  

मैहर येथील या शारदा मंदिरात जाण्यासाठी भक्तांना 1065 पायऱ्या चढाव्या लागतात. येथेच भक्तांची खरी परीक्षा होते. पहिल्या 485 चढतांना फार दमछाक होत नाही. मात्र दुसऱ्या वळणावरील 232 पायऱ्या चढतांना दमछाक होते. मात्र प्रत्येक ठिकणी यात्रेकरुंना आराम करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.  

शेवटच्या टप्प्यातील पायऱ्या उभ्या असल्याने भाविकांना वारंवार थांबावे लागते. ही सर्व प्रवास साधारणा तास, दीड तासांचा असतो. या सर्व पायऱ्या भाविकांना थकवणाऱ्या असल्या तरी देवीला भेटण्याची ओढ आणि वाटेत असलेली उत्तम विश्रामस्थळे यामुळे ही चढण सुसह्य होते.  

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारदा देवी मंदिरापर्यंत अत्यंत सहजपणे जायचे असेल, तर रोपवेचीही व्यवस्था आहे. या रोप वे मधून मंदिरात गेल्यास संपूर्ण पर्वताचे सुंदर दृष्य बघता येते. सकाळी सात ते सायंकाळी सातवाजेपर्यंत ही रोपवेची सेवा चालू असल्यामुळे मंदिरात सायंकाळीही मोठी गर्दी असते.  

====

हे देखील वाचा – आईच्या हत्येचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान परशुरामांनी स्थापन केले ‘हे’ शिवलिंग

====

शारदा देवीच्या मंदिरात (Maa Sharda Temple) नवरात्रीमध्ये मोठा उत्सव असतो. साधारण तीन किलोमीटरची रांग देवीच्या दर्शनासाठी असते. या शारदा मंदिर परिसरात अन्यही काही मंदिरे आहेत, जिथे भाविक दर्शनासाठी जातात. त्यामध्ये आल्हा ऊदल आखाडा प्रमुख आहे. येथील तलावात वीर आल्हा आणि ऊदल शारदा देवीच्या दर्शनाला जातांना स्नान करायचे असे मानण्यात येते.  

मैहर मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर पन्नी नावाचा मोठा धबधबा आहे, हा परिसर अत्यंत सुंदर असल्यामुळे पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते. बडा अखाडा मंदिर हे सुद्धा भाविकांसाठी आकर्षणाचे स्थळ आहे. भगवान शंकराच्या या मंदिरात 108 शिवलिंग आहेत.  

मैहर शारदा मंदिराला भेट देणारे भाविक या अन्य स्थळांनाही भेट देऊन नतमस्तक होतात. या सर्व परिसरात भाविकांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आल्यामुळे या भागात कायम भाविकांची गर्दी असते.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.