Home » नियमित आवळा सेवन केल्यास होतात ‘हे’ फायदे

नियमित आवळा सेवन केल्यास होतात ‘हे’ फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Amla Benefits
Share

तुरट, आंबट, गोड अशा चवींनी युक्त आवळा हा सगळ्यांनाच आवडतो. तोंडाला चव आणणारा आवळा हा आपल्या सर्वांच्या घरामध्ये सर्रास वापरला जातो. आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचे पाचक आदी अनेक गोष्टी आवळ्यापासून बनवल्या जातात. आपल्या आरोग्यासाठी आवळा हे वरदान मानले गेले आहे. आवळा हा आपल्या शरीरासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचा पदार्थ आहे.

चवीला चांगला वाटणारा हा पदार्थ आपले आरोग्य राखण्यातही पुढे आहे. आवळ्याचे अनेक फायदे आहेत. दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी फळ म्हणून उपयोग करतात. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. आवळा खाल्ल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. आवळ्यामध्ये अँटी-हायपरलिपिडेमिया, अँटिडायबेटिक, अँटिकॅन्सर आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. अशा या अनेक गुणधर्मांची युक्त असलेल्या बहुगुणी आवळ्याचे फायदे जाणून घेऊ.

आवळा खाण्याचे फायदे

हृदय निरोगी ठेवते
आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करतात. आवळा रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतो. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढते
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा विविध आजार आणि संसर्गांपासून आपले रक्षण देखील करतो.

Amla Benefits

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
आवळा चेहऱ्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात. शिवाय जर मुरुमांची समस्या दूर करते. तसेच केसाच्या समस्येवरदेखील आवळा उत्तम आहे. आवळ्यातील पोषक घटकांमुळे केस मजबूत होतात. तसंच केस अकाळी पांढरे होण्यास प्रतिबंध करते.

वजन कमी होते
वजन कमी करण्यासाठी आवळा फायदेशीर आहे. आवळ्यातील फायबरमुळे लवकर पोट भरल्यासारखं वाटत राहते. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त कॅलरी सेवन करत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

दृष्टी सुधारते
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. नियमित आवळा खाल्ल्यास दृष्टी तर सुधारते शिवाय मोतीबिंदूचा धोका कमी होतो.

रक्तातील साखरेवर नियंत्रण
एका अभ्यासानुसार आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यातील पॉलिफेनॉल इन्सुलिनचं उत्पादन सुधारतात आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. जे मधुमेहींसाठी उपयुक्त आहे.

कॅन्सरचा धोका कमी
याव्यतिरिक्त आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, क्वेर्सेटिन आणि इलॅजिक ऍसिड असतं, जे जळजळ कमी करते आणि कर्करोग टाळण्यास मदत करतं.

चयापचय सुधारण्यास मदत
आवळ्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्यानं चयापचय सुधारते. तसेच संक्रमण आणि जीवाणूजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासदेखील मदत करतं. तसंच पचनक्रिया सुरळीत होते.

श्वसन आरोग्य
आवळा श्वसनाच्या विकारांवर फायदेशीर ठरतो. हे खोकला, क्षयरोग, घशाचे संक्रमण आणि फ्लू कमी करण्यास मदत करते.

ॲनिमियावर उपचार करते
आवळा हा लोहाचा समृद्ध स्रोत आहे. या लोहाच्या अर्थात रक्ताच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. मात्र आवळ्याच्या नियमित सेवनामुळे हा धोका देखील कमी होतो.

========

हे देखील वाचा : या दिवाळीत नक्की करून बघा ‘हे’ विविध प्रकारचे लाडू

========

रक्त शुद्ध करणारे
मधासोबत आवळ्याचे सेवन केल्यास हा आवळा रक्त शुद्ध करण्याचे काम करतो.

लघवीचे प्रमाण वाढवणारा
आवळा लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. आवळा खाल्ल्यानंतर लघवीची वारंवारता वाढविण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थांचे उच्चाटन सुधारते.

आम्लपित्त कमी होते
आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.