उद्या आपण वर्षातला सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव साजरा करणार आहोत. उद्या भारताचा ७८ वा स्वातंत्र्यात दिवस आहे. १५० वर्ष भारतावर राज्य करत आपल्या देशाला लुबाडणाऱ्या, अमानुष अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशनच्या तावडीतून देशाला याच दिवशी ७८ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १५ ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपल्या भारतामध्ये १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन मोठे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.
आज भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जाते. भारतात सर्वाधिक तरुणांची लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताचे येणारे भविष्य हे अतिशय उज्ज्वल आणि प्रभावी असेल असे अनेक जाणकार सांगताना दिसतात, मात्र आपण आज पाहिले तर दुर्दैवाने याच तरुणाईतील अनेकांना आपल्या देशाचे दोन राष्ट्रीय उत्सव असलेल्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांमधील फरक माहित नाही. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होताना पाहिले जाते.
भारतात या दोन खास दिवशी तिरंगा फडकवला जातो. पण, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यात फरक आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला फडकवलेल्या ध्वजातील फरक जाणून घ्या.
ब्रिटिशांच्या तावडीतून १५० वर्षांनी भारत मुक्त झाला आणि एका नव्या युगाची, एका नव्या भारताची सुरुवात झाली. मोठ्या संघर्षाने अनेकांच्या बलिदानाने आणि मोठ्या संघर्षाने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. यावर्षी भारत ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले पण ते १९५० पर्यंत प्रजासत्ताक राष्ट्र नव्हते.
२६ जानेवारी हा या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. त्यामुळेच या खास दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. सन १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना ही भारताला लोकशाही बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यास सुरुवात झाली. हे संविधान तयार झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली.
स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात. तर स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी, देशाचे राष्ट्रपती टीव्हीवरून ‘राष्ट्राला संबोधित’ करतात.
======
हे देखील वाचा : जाणून घ्या उद्याच्या स्वातंत्र्य दिवसाची ‘ही’ माहिती
======
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे राष्ट्रपती दिल्लीतील ‘कर्तव्य पथ’वर ध्वज फडकवतात. या कार्यक्रमात भारताचा सांस्कृतिक, सामाजिक वारसा, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेद्वारे परेड आणि एअर शोचे प्रदर्शन केले जाते. 26 जानेवारी रोजी मुख्य समारंभाला प्रमुख पाहुणे येतात.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज फडकवण्याआधी तो खांबाला बांधून ठेवला जातो. खांबाच्या टोकाला थोडा खाली ध्वज बांधला जातो. पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी दोरी खेचतात तेव्हा तिरंगा वर सरकतो आणि मग तो फडकवला जातो. त्याला ध्वजारोहण असे म्हणतात.
तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झेंडा खांबाच्या टोकाला बांधला जातो. जेव्हा राष्ट्रपती दोरी खेचतात तेव्हा झेंडा फडकू लागतो. त्याला झेंडावंदन किंवा झेंडा फडकवणे म्हटले जाते.