Home » वजन कमी करण्यास ‘हे’ ड्रायफ्रुटस आहे लाभदायक

वजन कमी करण्यास ‘हे’ ड्रायफ्रुटस आहे लाभदायक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dry Fruits
Share

वजन कमी करणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. प्रत्येकालाच एक उत्तम सुडोल असे शरीर पाहिजे. वजन वाढण्यामुळे अनेक शारीरिक समस्या आणि व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आजच्या काळामध्ये वजन कमी करण्याला आणि पर्यायाने व्यायामाला अतिशय महत्व प्राप्त आहे आहे. वजन कमी करण्यासाठी लोकं योग, जिम, डाएट आदी अनेक गोष्टींची मदत घेतात.

काही लोकं या सर्व गोष्टींवर भरमसाठ पैसा खर्च करू शकत नाही. त्यामुळे थोडे रिसर्च करून, सोशल मीडिया, इंटरनेट, जवळच्या लोकांचा सल्ला घेऊन, ऐकिवात येणाऱ्या गोष्टींच्या मदतीने घरच्या घरी व्यायाम करत खाण्यापिण्यात बदल करतात आणि वजन कमी करण्याच्या मार्गावर मार्गस्थ होतात. वजन कमी करणे अतिशय म्हणजे अतिशय कष्टाचे काम असते. त्यासाठी अनेक महिने मेहनत घेतल्यावर थोडा थोडा परिणाम दिसायला सुरुवात होते.

यासाठीच जर तुम्हाला देखील वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु करायचे आहे, तर तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये थोडे बदल करत काही गोष्टी प्रकर्षाने खाऊ शकतात. ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला माहित आहे का की ड्रायफ्रुटस खाल्ल्याने देखील वजन कमी करण्यास मोठी मदत होते. आश्चर्य वाटले ना मात्र हे खरे आहे. सामान्यतः आपल्याकडे ड्रायफ्रुटस हे वजन वाढीसाठी खाल्ले जातात. मात्र सगळे नाही काही विशिष्ट ड्रायफ्रुटस नक्कीच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतात, चला जाणून घेऊया या ड्रायफ्रुटसबद्दल.

बदाम
बदाम हे प्रथिने आणि निरोगी चरबीचा एक उत्तम स्रोत आहे. ज्यामुळे भूक कमी होते आणि तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. त्यामध्ये फायबर देखील असते. जे पाचक आरोग्यासाठी महत्वाचे मानले जाते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकते. रोज ३-४ बदाम खाल्ल्याने वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो आणि स्मरणशक्तीही चांगली राहण्यास मदत मिळते. जर बदाम रात्रभर भिजवून सकाळी खाल्ले तर त्यातील फायदेशीर अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण जास्त वाढते. भिजवलेल्या बदामात फायबरचे प्रमाण जास्त असते.

Dry Fruits

पिस्ता
प्रोटीन आणि हेल्दी स्नॅक्स म्हणून पिस्ता हे ड्रायफ्रूट्स ओळखले जाते. इतर सर्व ड्रायफूट्सच्या तुलनेत पिस्त्यामध्ये खूपच कमी कॅलरीज असतात. यासाठीच जेवण कमी घेण्यासाठी आणि पर्यायाने वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळची भूक भागवण्यासाठी पिस्त्याचा आहारात जरूर समावेश करून घ्या. कॅलरीची शरीरातील मात्रा कमी करून रक्तातील साखरेचा स्तर कमी करण्यासाठीही सुद्धा पिस्ता अतिशय फायदेशीर आहे.

काजू
काजू अत्यंत हेल्दी ड्रायफ्रूट आहे. मात्र असे असले तरी काजूचे जास्त प्रमाणात सेवन कोलेस्ट्रॉल वाढीचे कारण ठरू शकते. यासोबतच काजू उष्ण देखील असतात. मात्र काजूमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते. यासाठी काजू योग्य प्रमाणात खाल्ल्यास, हाडांना मजबूत ठेऊन शरीराची सूज कमी करते. साधारण २-३ काजू रोज खाणे सोयीचे ठरते.

अक्रोड
ओमेगा – ३ फॅटी अ‍ॅसिडचे अधिक प्रमाण असणारे ड्रायफ्रूट म्हणजे अक्रोड. मेंदूच्या विकासासाठी अक्रोड उत्तम मानले जाते. यामध्ये प्रोटीन आणि फायबर अधिक प्रमाणात असते, जे भूक कमी करून भूकेवर नियंत्रण ठेवण्यास अधिक उपयुक्त ठरते. अधिक काळासाठी पोट भरलेले राहाते. अक्रोड खाल्ल्याने कमी कॅलरी पोटात जाते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, वजन वाढत नाही. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्यातील पाणी काढून टाका आणि मग खाल्ले तरी उत्तम.

खजूर
खजुरामध्ये फायबरचे अधिक प्रमाण असते. रोज २ खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवले आणि सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. खजुरामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असून हृदयासाठी याचा चांगला उपयोग होतो.

बेदाणे / मनुका
बेदाणे हादेखील फायबरचा उत्तम सोर्स आहे. पचनक्रिया अधिक चांगली करण्यासाठी याचा उपयोग होतो. पचनक्रिया योग्य असेल तर वजनवाढ होत नाही. बेदाण्यात असणारे अँटीऑक्सिडंट हे शरीराचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

======

हे देखील वाचा : घरी ‘हे’ व्यायाम करा आणि पोटाचा घेर करा कमी

======

चिया सीड्स
भिजवलेल्या चिया बियामध्ये प्रथिने, ओमेगा -3 आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून त्याचे सेवन केले तर ते तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिड हृदयासाठी फायदेशीर आहेत.

अंजीर
अंजीर भिजवून खाल्ल्याने त्यात असणारे फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारख्या फायदेशीर पोषक तत्वांची मात्रा शरीरात वाढते. रात्री झोपताना अंजीर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून टाका. अंजीरमध्ये असणारे फायबर तुमचे चयापचन सुरळीत करण्यास मदत करेल. तर यात असणारे पोटॅशियम तुमच्या हाडांना मजबूत बनवेल. टाईप-2 डायबिटीज असलेले लोक भिजवलेले अंजीर खाऊन रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.