Home » Kharmas : सावधान खरमास सुरु होतोय !

Kharmas : सावधान खरमास सुरु होतोय !

by Team Gajawaja
0 comment
Kharmas
Share

भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम असलेला खरमास या डिसेंबर महिन्यापासून सुरु होत आहे. वर्षातून दोन वेळा येणारा खरमास डिसेंबर १६ पासून सुरु होत आहे.  याला धनु खरमास म्हणतात.  यानंतर ३० दिवस सर्व शुभ कार्ये करण्यास मनाई असते. १६ डिसेंबर २०२५ ते १४ जानेवारी २०२६ दरम्यान चालणा-या या खरमासमध्ये देशभर अनेक धार्मिक उत्सव साजरे करण्यात येणार आहेत.  भारतातील प्रमुख मंदिरांमध्ये खरमासनिमित्त खास होम-हवन आणि पूजा आयोजित करण्यात येणार आहेत. खरमासाचा प्रत्येक दिवस धार्मिक कार्यासाठी शुभ मानला जातो.  त्यामुळे या दरम्यान देशभरात मोठ्या प्रमाणात धार्मिक यात्रा होणार आहेत. (Kharmas)

१६ डिसेंबरपासून खरमास सुरु होत आहे.  सूर्य मीन किंवा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. भगवान विष्णू हे खरमासाचे देव मानले जातात.  म्हणून या महिन्यात जप, तपस्या करणे, तीर्थस्थळांना भेट देणे आणि दान करणे हे शुभ मानले जाते.  असे असले तरी या काळात गृहप्रवेश, मुंडन, लग्न इत्यादी शुभ कार्यांना मनाई असेत. तसेच नवीन प्रकल्प हाती घेतले जात नाहीत. जेव्हा सूर्य आपल्या गुरूच्या सेवेत असतो तेव्हा या ग्रहाची शक्ती कमी होते. याव्यतिरिक्त, सूर्य गुरुची शक्ती कमी करतो. त्यामुळेच या दोन्ही या खरमासच्या काळात दिला जातो.  ग्रहांचा राजा सूर्य १६ डिसेंबर रोजी पहाटे ४:२७ वाजता त्याचा मित्र म्हणून ओळखल्या जाणा-या गुरूच्या राशी मीन राशीत संक्रमण करेल. सूर्य देव वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होईल.  खरमास सुरु होत असल्यामुळे डिसेंबरमध्ये लग्नासाठी फक्त चार शुभ दिवस आहेत.  त्यानंतर थेट फेब्रुवारीमध्ये लग्नाचे मुहूर्त आहेत. (Social News)

धार्मिक कार्यासाठी हा खरमास शुभ असतो. खरमास दरम्यान, दररोज सूर्याला जल अर्पण करणे आणि गायत्री मंत्र किंवा आदित्य हृदय श्रोताचा जप करणे शुभ मानले जाते.  शिवाय रविवार व एकादशीला भगवान विष्णूची पुजाही करणे शुभ मानले जाते.  या खरमासच्या काळात तीर्थयात्रा करतांना पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचा सल्ला दिला जातो.  मंदिरामध्ये या खरमासच्या काळात भगवगीता आणि रामायण पाठ आयोजित केले जातात. (Kharmas)

डिसेंबर महिन्यातील प्रत्येक दिवस हा खास आहे.  १ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती आहे.  द्वापर युगात, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला गीतेचे ज्ञान दिले असे सांगितले जाते. या दिवसाला मोक्षदा एकादशी म्हणतात आणि गीता जयंती साजरी केली जाते.  २ डिसेंबर रोजी भौम प्रदोष व्रत आहे.  हा दिवस मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आणि प्रदोष व्रत पाळले जाईल. हा दिवस मंगळवार असल्याने त्याला भौम प्रदोष व्रत म्हटले गेले आहे. (Social News)

४ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती आहे.  तसेच दत्तात्रेय जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि त्रिपुरा भैरवी जयंती असल्यामुळे या दिवशी सर्वच मंदिरांमध्ये मोठा उत्सव करण्यात येणार आहे.  या दिवशी माता अन्नपूर्णादेवीचाही उत्सव काही ठिकाणी साजरा करण्यात येतो.  ७ डिसेंबर रोजी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे.  या तिथीला अखुर्थ संकष्टी चतुर्थी म्हणतात.  १५ डिसेंबर रोजी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफाळा एकादशी आहे.  १६ डिसेंबर रोजी धनु संक्रांती, सूर्य संक्रमण करेल आणि धनु राशीत प्रवेश करेल, यालाच धनु संक्रांती म्हणतात. या दिवशी खरमास देखील सुरू होईल आणि पुढील एक महिना लग्न, लग्न, गृहप्रवेश, नवीन काम सुरू करणे यासारखे कोणतेही शुभ कार्यक्रम केले जाणार नाहीत.  १७ डिसेंबर रोजी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी बुध प्रदोष व्रत, प्रदोष व्रत आहे.  १८ डिसेंबर रोजी मासिक शिवरात्री साजरी केली जाईल. (Kharmas)

=======================

हे देखील वाचा : Hindu Village : मुस्लिम राष्ट्रात असूनही ‘हे’ आहे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव

=======================

शिवाय पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला उपवास करणे शुभ मानले जाते.  १९ डिसेंबर रोजी पौष अमावस्या आहे.  तर २४ डिसेंबर रोजी विघ्नेश्वर चतुर्थी, विनायक चतुर्थी व्रत आहे.  २७ डिसेंबर रोजी गुरु गोविंद सिंग जयंती आहे.  दहावे आणि शेवटचे शीख गुरू, गुरु गोविंद सिंग जी यांची जयंती यादिवशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.  ३० डिसेंबर रोजी पौष पुत्रदा एकादशी आहे.  यामुळे अवघ्या डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरे होणार आहेत. (Social News)

सई बने… 

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.