रामनगरी अयोध्येत १५ लाखांहून अधिक दीव्यांची रोषणाई करण्यात आली. देशभरात दिवाळीचा सण अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. अशातच काही ठिकाणी उत्तर भारताप्रमाणे दिवाळीची मजामौज करण्यात येत नाही. फटाके सुद्धा फोडले जात नाही ना घराला रोषणाई केली जाते. गणपती आणि देवी लक्षमीची पूजा सुद्धा करत नाहीत. केरळ मध्ये या गोष्टी केल्या जात नाही. येथे दिवाळी साजरी न करण्यामागे काही कारणे आहेत. त्याचबद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात. (Kerala Diwali)
अशी मान्यता आहे की, केरळचा राजा आणि असुर महाबली याचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाला होता. येथए असुर महाबळीची पुजा करण्याची परंपरा आहे. मात्र दिवाळीच्या दिवशी मृत्यू झाल्याने ते हा सण साजरा करत नाहीत. हे एक मोठे कारण आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अशी काही कारणे आहेत ज्यामुळे दिवाळी केरळात साजरी होत नाही.
तसेच काही परंपरांमध्ये उत्तर भारत हा वेगळा आहे. जसे दक्षिण भारतात असुरांसंबंधित लोकांची भावना ही सकारात्मक आहे, तर या उलट उत्तर भारतात मान्यता आहे.दिवाळीचा सण हा असुर रावणावर रामाने मिळवलेल्या विजयाच्या आनंदात साजरा केला जातो. त्यामुळे दक्षिण भारतात दिवाळी साजरी केली जात नाही.
केरळात दिवाळी साजरी न करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे तेथील ऋतू. उत्तर भारतात मान्सून संपल्यानंतर लगेच हिवाळा सुरु होत असल्याने दिवाळी साजरी केली जाते. मात्र केरळात असे होत नाही. येथे ना हिवाळ्याची सुरुवात होत ना ही मान्सूनचा ऋतू संपतो. पाऊस पडत असल्याने येथे दिवे लावले जात नाही ना फटाके फोडले जातात. (Kerala Diwali)
हे देखील वाचा- दिवाळीच्या दिवशी कुठे आणि कशी काढाल रांगोळी, जाणून घ्या वास्तू संदर्भातील नियम
उत्तरच्या तुलनेतल दक्षिण हिंदूंच्या मान्यतांमध्ये सुद्धा फरक आहे. जसे उत्तर भारतात भगवान रामाची पूजा केली जाते. तसे केरळात होत नाही. केरळात श्रीराम ऐवजी कृष्णाची पूजा केली जाते. याच फरकामुळे येथे दिवाळीबद्दल लोकांमध्ये उत्साह दिसून येत नाही. तसेच दक्षिण भारतात द्रविड कल्चरची अधिक छाप दिसून येते. याची पायमुळं ही दक्षिण संबंधित जोडली गेली आहेत. त्यामुळे येथे असे सण साजरे केले जातात ज्यांचा संबंध दक्षिणेशी आहे. जसे की, महाराजा बली संदर्भातील ओणम.